पोस्ट्स

फेब्रुवारी, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

26जानेवारी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून केलेला १२ जणांचा (मुंबईकर आणि पुणेकर मंडळी) TTMM ट्रेक, किल्ले सोनगिरी/ पळसदरीचा किल्ला

🚩🚩सादर जय शिवराय🚩🚩 नमस्कार मंडळी🙏 26 जानेवारी च्या निमित्ताने आम्ही मुलांसाठी एक साधा सोपा ट्रेक शोधत होतो. मुले पण तयार होती ट्रेक करण्यासाठी बरेच दिवसांनी त्यांनी कोणताही ट्रेक केला नव्हता, परंतु शाळेतून खबर आली 26 जानेवारीला मुलांचा खास प्रोग्राम आहे म्हणून मुलांना शाळेत जावे लागले. किल्ले सोनगिरी साधा सोपा ट्रेक म्हणून मुद्दामून ठेवणीत ठेवला होता. हा ट्रेक आम्ही TTMM (टी टी एम एम म्हणजे तू तुझं मी माझं आणि वाजवी खर्चामध्ये पब्लिक ट्रान्सपोर्ट वापरून पूर्ण केलेला ट्रेक) या तत्त्वावर करायचे ठरवले होते तरीही या ट्रेक साठी मुंबईतून चार् जण आणि पुण्याकडून आठ जण असे ट्रेकर मंडळी आले होते. तसे आपले TTMM तत्वावर आधारित भरपूर ट्रेक झाले आहेत, ते लेख स्वरूपात आणि व्हिडिओ स्वरूपात उपलब्ध आहेत ह्याची नोंद घ्यावी. किल्ले सोनगिरी हा पळसदरी स्टेशनच्या बाजूलाच असणारा किल्ला आहे. पळसदरी स्टेशन हे कर्जतच्या पुढील पहिलेच स्टेशन खोपोली कडे जाताना लागते. हा ट्रेक ट्रेन नी केल्यास फार वेळ वाचतो आणि अवघ्या साठ रुपयांमध्ये जाऊन येऊ शकता. जाताना फक्त ट्रेनचे वेळापत्रक बघून घ्या, वेळ वाया जाणार नाही, ...