Range Trek कलावंतीण दुर्ग, प्रबळगड आणि इर्षाळगड (मुंबईकर आणि पुणेकर ट्रेकर मंडळींनी मिळून केलेला TTMM ट्रेक)
🚩🚩सादर जय शिवराय🚩🚩 नमस्कार मंडळी🙏 बरेच दिवस ह्या लांबच्या पल्ल्याच्या ट्रेकचा प्लॅन रेंगाळत होता कारण, कोणी तयार होत नव्हते कारण हा अत्यंत कठीण आणि किचकट अशा प्रकारचा, आपल्या शारीरिक आणि बौद्धिक तकतीची परीक्षा घेणार होता, थोडाफार नाही भरपूरच क्रॉस कंट्री कॅटेगरी मध्ये मोडणारा असा वेगळाच अनुभव देणारा होता. हा ट्रेक आम्ही TTMM (टी टी एम एम म्हणजे तू तुझं मी माझं आणि वाजवी खर्चामध्ये पब्लिक ट्रान्सपोर्ट वापरून पूर्ण केलेला ट्रेक) या तत्त्वावर करायचे ठरवले होते तरीही या ट्रेक साठी मुंबईतून तीन जण आणि पुण्याकडून नऊ जण असे ट्रेकर मंडळी आले होते. तसे आपले TTMM तत्वावर आधारित भरपूर ट्रेक झाले आहेत, ते लेख स्वरूपात आणि व्हिडिओ स्वरूपात उपलब्ध आहेत ह्याची नोंद घ्यावी. ह्या ट्रेकसाठी श्री संतोष देशमुख आणि मी दोघेच उत्सुक होते, बाकी कोणाकडून प्रतिसाद मिळत नव्हता म्हणून वाटत होते की परत प्लॅन रद्द होतो की काय पण शेवटी देशमुख साहेब बोलले की मी ५-६ ट्रेकर पुण्यावर घेऊन येतो. ऐन वेळेवर मुंबई मधून २ जण अजून तयार झाले. पुणेकर डायरेक्ट गाडीने येणार होते आणि आम्ही मुंबईवरून दुचाकीने त्यामुळे वा...