Range Trek कलावंतीण दुर्ग, प्रबळगड आणि इर्षाळगड (मुंबईकर आणि पुणेकर ट्रेकर मंडळींनी मिळून केलेला TTMM ट्रेक)


🚩🚩सादर जय शिवराय🚩🚩

नमस्कार मंडळी🙏

बरेच दिवस ह्या लांबच्या पल्ल्याच्या ट्रेकचा प्लॅन रेंगाळत होता कारण, कोणी तयार होत नव्हते कारण हा अत्यंत कठीण आणि किचकट अशा प्रकारचा, आपल्या शारीरिक आणि बौद्धिक तकतीची परीक्षा घेणार होता, थोडाफार नाही भरपूरच क्रॉस कंट्री कॅटेगरी मध्ये मोडणारा असा वेगळाच अनुभव देणारा होता.

हा ट्रेक आम्ही TTMM (टी टी एम एम म्हणजे तू तुझं मी माझं आणि वाजवी खर्चामध्ये पब्लिक ट्रान्सपोर्ट वापरून पूर्ण केलेला ट्रेक) या तत्त्वावर करायचे ठरवले होते तरीही या ट्रेक साठी मुंबईतून तीन जण आणि पुण्याकडून नऊ जण असे ट्रेकर मंडळी आले होते. तसे आपले TTMM तत्वावर आधारित भरपूर ट्रेक झाले आहेत, ते लेख स्वरूपात आणि व्हिडिओ स्वरूपात उपलब्ध आहेत ह्याची नोंद घ्यावी.

ह्या ट्रेकसाठी श्री संतोष देशमुख आणि मी दोघेच उत्सुक होते, बाकी कोणाकडून प्रतिसाद मिळत नव्हता म्हणून वाटत होते की परत प्लॅन रद्द होतो की काय पण शेवटी देशमुख साहेब बोलले की मी ५-६ ट्रेकर पुण्यावर घेऊन येतो. ऐन वेळेवर मुंबई मधून २ जण अजून तयार झाले.

पुणेकर डायरेक्ट गाडीने येणार होते आणि आम्ही मुंबईवरून दुचाकीने त्यामुळे वाहनाच प्रश्न सुटला होता.

आम्ही पहाटे ३ वाजता कलावंतीण दुर्गच्या पार्किंग मध्ये भेटलो, थोडा आराम केला, सामान बांधले. ३.३० वाजता हळू हळू अंधारात चाल सुरू केली. मंद सुखद वारा यामुळे कधी कलावंतीण गाठला हे कळले देखील नाही, ५.४५ ला आम्ही वरती पोहोचलो. सूर्योदय झाला नव्हता, हा माझा दुसरा अनुभव एका डोंगर माथ्यावरून सूर्योदय बघण्याचा. थोड्यावेळाने सूर्योदय झाला फोटो काढून झाले. आजूबाजूचे डोंगर जणू सोन्याने माखले होते. थोड धुक होते म्हणून जास्त लांबचे डोंगर दिसत नव्हते. तरी पेब, चंदेरी, म्हैसमाळ, माथेरान दृष्टिक्षेपात होते. मग आम्ही प्रबळगडाकडे कूच केली. प्रबळ साठी पूर्ण डोंगर न उतरता कलावंतीणदुर्ग च्या पायथ्यावरून एक शॉर्ट कट पायवाट आहे ती आम्ही धरली.

कलावंतीण चढताना आपल्याला प्रबळमाची वरून वाटते की कलावंतीण हा उंच आणि प्रबळ हा कमी उंचीचा आहे. कातळात कोरलेल्या पायऱ्या अगदी खढा चढ पण सोपा करून जातात. पण कलावंतीण हा छोटा आणि सहज करण्याजोगा सुळका आहे तर प्रबळ हा उंच आणि दुर्गम असा चढ आहे ते चढताना प्रामुख्याने जाणवते आणि दमछाक होते.

प्रबळ गडाच्या अर्ध्या डोंगरावरून पायवाट आहे तीच आम्ही धरली अवघ्या १५ मिनिटामध्ये आम्ही मुख्य प्रबळ गडाच्या मार्गावर आलो. सकाळचे सुखद थंड वातावरण मनाला आनंद देणारे होते म्हणून वातावरणाचा फायदा करून आम्ही पण झट पट चाल चालू ठेवली. हा मार्ग रोजच्या वाटेने जाणारा होता म्हणून काही चिंता नव्हती. पण अत्यंत दुर्ग आणि मोठे निखळलेले दगड चालणे कठीण करत होते. अर्ध्यावर गेल्यावर गडाचा गणेश दरवाजा/ मुख्य दरवाजा ढासळलेल्या स्थितीत आढळतो. हा भूभाग रायगड मध्ये असल्या कारणाने सगळे बांधकाम चिऱ्याच्या दगदातले आहे.

हा टप्पा पार करत लवकरच आम्ही कलावंतीण व्ह्यू पॉइंट वर पोहचलो. परत कलावंतीणदुर्ग चे निखळ सौंदर्य डोळ्यात भरून घेतले. नंतर नाश्ता केला आणि पुढे मार्गस्थ झालो. वाटेत आम्हाला जुन्या राजवाड्याचे अवशेष आणि गणपती मंदिर लागले आम्ही कुठेही जास्त वेळ दवडला नाही.

पुढे काळ्या बुरुजाकडे मोर्चा वळवला, चालताना मला माथेरानची आठवण झाली कारण सगळी रानटी कडू लिंबाची झाडे होती आणि ति ही गर्द, सूर्याची सावली देखील खाली जमिनीवर पडत नव्हती. मार्ग सुखकर होता.

काळ्या बुरुजेकडे जायच्या आधी म्हणजे मंदिरापासून अर्धा किलोमीटरवर उजव्या हाताला एक छोटी चिंचोळी पायवाट जाते ती आम्ही घेतली, कुठेही बोर्ड नाही लिहिला आहे ह्याची नोंद घ्या.

आम्ही प्रबळ गडावरील पूर्वेकडील दरवाज्यावर पोहोचलो, तिथे एक दळणाचे जात पण पडलेले आहे बहुदा कुणी गावकऱ्यांनी नेण्याकरता मुख्य गडावरून उचलले असावे पण वजन असल्या कारणाने तिकडेच सोडले असावे.

आता पुढचा मार्ग कठीण होता, कारण पायवाट नव्हतीच. उतार पण सरळसोट होता. मुख्य म्हणजे जिथे पाय टाकायचो ते दगड आणि माती घासरायचे, फार कठीण परिस्थिती होती. १०फुटावर गेलेल्या माणसाची खूण दिसत नव्हती, करणं पालापाचोळा जमून जमीन दिसेनाशी झाली होती.

इथे प्रामूख्याने मला सांगावेसे वाटते की, आपण गूगल मॅप किंवा सक्षम ट्रेकिंग aap ची मदत घ्यावी कारण आपण डोंगर उतरत असतो साधारण ३-४ डोंगर आणि दऱ्या आपण पार करतो पण गर्द झाडीमुळे जास्त लांबचे जमिनीवरचे किंवा डोंगरावरचे काहीही दिसत नाही. ही फार जिकरीची बाब आहे. हा भाग भुल भुलय्या आहे तेव्हा सांभाळून विचार करून मार्ग निवडावा.

ह्या डोंगरामध्ये बिबटे, ससे, कोल्हे, रान-डुक्कर, साप असे सगळ्या प्रकारचे हिंस्त्र प्राणी आढळतात तेव्हा का ट्रेक भल्या पहाटे चालू करा म्हणजे जंगल पॅच दिवसा पार होईल.

आपण सतत उतरताना डाव्या बाजूला चालत असतो, आपल्याला अर्धा डोंगर उतरायचा आहे आणि प्रबळगड प्रदक्षीणा मार्ग लागतो त्याला गाठायचे आहे. हा एक T junction आहे.

आता दाट जंगल कमी होते आणि आपण डाव्या बाजूच्या डोंगरावरून अजुन पुढील डाव्या बाजूचा रस्ता धरतो. सगळ्यात शेवटी परत दाट अशा जंगलाच्या जाळीतून आपण मार्गक्रमण करत असतो. परत हा भाग भुलभुलय्या आहे तेव्हा सांभाळून विचार करून मार्ग निवडावा.

सरते शेवटी आपल्याला डाव्या हातावर काळा बुरुज दिसायला लागतो. आता चिंता मिटते कारण या आधी १० फुटावरचे गर्द झाडी असल्यामुळे दूरच काहीच दिसत नव्हत.

आपल्याला आता पुढे पठार चालू होते आणि आपण काळ्या बुरुजासमोर पोहोचतो. अजून डाव्या बाजूचा कल आपण सोडत नाही. सरळ न चालता आपण सतत डाव्या बाजूला सरकत असतो.

थोड्याच वेळात आपल्याला इर्षाळगड दिसायला लागतो, आता कुठे जिवात जीव आला.

सावलीमध्ये दुपारचे जेवण १२ वाजता आटोपून घेतले, आत्तापर्यंत सगळा प्रवास झाडीतून झाला होतो म्हणून उन्हाचा त्रास झाला नाही. पाणी संपत आले होते. आता खरी परीक्षा चालू होणार होती.

समोर इर्षाळगडाची डोंगर धरेवरील पायवाट दिसू लागली, पण तो ओके बोके पडलेल्या डोंगर माथ्यावरून होती, आता साधारण १.३ वाजला होता. लांबचा पल्ला गाठायचा होता. सूर्य कडाडत होता, वारा गायब झाला होता. रण रणत्या उन्हात वाट काढायाची होती, आता मात्र सकाळपासून चालून जीवावर आल होते.

इथेपर्यंत पोहोचता पोहोचता जंगलात आम्हाला कोणताही हिंस्त्र प्राणी दिसला नाही हे आमचे नशीब. पण वाटेत हिंस्त्र प्राण्याच्या१०-१२ विष्टा भरपूर प्रमाणात दिसल्या तेव्हा सांभाळून.

उन्हाचा उकाडा आणि डोंगर माथा वाफेच्या इंजिनाची आठवण करून देत होते. जेवढे पाणी पीत होतो त्या पेक्षा जास्त बाष्पीभवनामुळे उडून जात होते. गॉगल लावला, टोपी घातली, गमच्छा पण बांधला पण त्रास काही कमी होईना.

कसे बसे सगळी ताकत एकवटून आम्ही सगळे जमेल तसे पुढे चालत होतो कारण एकच दुसरा पर्याय नव्हता आणि लवकरात लवकर इर्षाळगड गाठायचा होता ते ही अंधार पडायच्या आत.

त्यात एक चूक झाली, आमचे २ ग्रुप झाले, अर्धे पुढे गेले आणि अर्धे मागे राहिले. पण मागे राहिले ते इर्षाळगडाच्या पायथ्यापाशी थांबले, पाणी संपले होते, त्यात उन्हाचा मार, एकपण झाड नाही, सावली नाही, तसेच ३० मिनिट रस्ता शोधत होतो, आता ४ वाजले होते शेवटी गावातली गुराखी मंडळी भेटली ते बोलले की इर्षाळवाडीत जा तिथे पाणी भेटेल.

गावात एक विहीर आहे भरपूर पाणी पिले. अर्धी पुणेकर मंडळी गडावर गेली होती. मुंबईकर खाली होते, आम्ही सगळ्यांनी मिळून ठरवले की बस झाले आता परत फिरू.

फक्त १०% मार्ग बाकी राहीला होता, नेढ समोर होते, म्हणून अर्धवट ट्रेक सोडताना दुःख होत होत. हे शल्य जीवाला लागत होते पण नाईलाज होता कारण dehydration फार जाणवत होते. विहिरीतले थंड २ लिटर पाणी प्यायलावरपण तहान संपत नव्हती.

शेवटी आम्ही तिघ जणांनी पुणेकर मंडळींचा निरोप घेतला आणि परतीचा प्रवास चालू केला.

डोंगर उतरलो, मोरबे गावात पोहोचलो, वाटेत रिक्षा भेटली, त्याने चौक पर्यंत २० पर सीट सोडले, पुढे st बस मिळाली २० रुपयात शेदूंग नक्यापर्यंत पोहोचलो. पुढे ठाकूरवाडी साठी १५०रुपयांत रिक्षा मिळाली. ६ वाजता कलावंतीण पार्किंग मध्ये पोहोचलो.

पुणेकरांनी प्रत्येकाने ५लिटर पाणी बरोबर घेतले होते, मुंबईकरांनी ३लिटर पाणी, ३ लिटर पाणी कमी पडते म्हणून उन्हाळ्यात range ट्रेक करत असाल तर जास्तीत जास्त पाणी बरोबर बाळगा ही विनंती. पाण्यात electrol, tang, रसना कितीही घातले तरी तहान भागात नाही.

पहिल्यांदाच दिवसभरची २७ किलोमीटर ची पायपीट झाली होती, जीव मरगळून पडला होता, पण पुढे ३ तास दुचाकी चालवायची होती ते पण जीवावर आले होते.

ठाकूरवाडी साठी ३ ST बस आहेत पनवेल वरून, सकाळीं, दुपारी आणि संध्यकाळी, २० रुपयांमध्ये पनवेल गाठू शकता.

राहिलेला इर्षाळगड पुढच्या रविवारी लागलीच करून घेतला, त्याचा व्हिडिओ पुढे येईल.

ह्या ट्रेक मध्ये सहभागी झालेल्या सर्व मंडळीचे आभार, कारण हा ट्रेक तुमच्या सहकर्याशिवाय पूर्ण झाला नसता. ह्या संपूर्ण ट्रेक मध्ये खेळी मेळीचे आणि सहकार्याचे वातावरण होते. आशा करतो आपली भेट पुन्हा लवकरच होईल.

जर आपल्याला असे विविधतेने नटलेले किंवा विशेष सहलीची ठिकाण, धबधबे, गुहा लेण्या, किल्ले, ट्रेक, hike किंवा मंदिरांची माहिती असेल तर आम्हाला जरूर कळवा.

मला अपेक्षा आहे आपल्याला माझा अनुभव लेख स्वरुपात आवडला असेल. सोबत फोटो फेसबूक लिंक वर ऊपलब्ध आहेत, तरीपण आपणास साध्य परिस्थिती अनुभवायची असेल तर खालील दिलेल्या YouTube लिंकला नक्की क्लिक करून व्हिडिओ पहा, जर व्हीडिओ आवडला तर लाल सबस्क्राइब बटन दाबा, सोबत असलेल्या घंटेला क्लिक करून All हे बटन दाबा म्हणजे आमचे नियमित येणारे व्हिडिओ आपणास पाहण्यासाठी उपलब्ध होतील ते ही काहीही किंमत न मोजता.

हा व्हिडिओ आपण ३ भागात केला आहे त्याची लिंक खालील प्रमाणे, एकदा जरूर बघून घ्यावी आणि आपला अभिप्राय कळवावा ही विनंती.

YouTube video link:

भाग१ https://youtu.be/vKVvHXb6Xww

भाग२
https://youtu.be/cZ7i_tbBu4g

भाग३
https://youtu.be/ACD1SJo7X9Y

Facebook page Simple Lifestyle Vlogs:
https://www.facebook.com/simplelifestylevlogs?mibextid=ZbWKwL

Instagram:
https://www.instagram.com/simplelifestyle.vlogs/

TTMM Simple Lifestyle Vlogs Facebook Group: https://facebook.com/groups/496676889311754/

माझे सगळे लिखाण Blog स्वरूपात: https://simplelifestylevlogs.blogspot.com/

Whatsapp Number: Nine Nine Six Seven One Five Two Nine Three Eight 99:67:1 5:29:38

जर आपल्याला या जागेची अधिक माहिती हवी असल्यास वरील नंबर वर WhatsApp मेसेज करा.

आपण आमच्या TTMM (कमीत कमी खर्च आणि भरपूर भ्रमंती) या मोफत उपक्रमात सहभागी होऊ इच्छित असाल तर मग दिलेल्या फोन नंबर वर WhatsApp मेसेज करा. फोन करू नका तो DND वर आहे, कोणीही फोन उचलणार नाही ह्याची नोंद घ्यावी. आमचे TTMM वर आधारित भरपूर व्हिडिओ YouTube playlist वर उपलब्ध आहेत, ते लवकरच बघून घ्या आणि आमच्या फिरस्ती मध्ये सामील व्हा. आम्ही कोणतीही किंमत आकारात नाही ह्याची नोंद घ्या.

आमची टी टी एम एम ट्रेक बद्दलची संकल्पना समजून घेण्यासाठी खालील व्हिडिओ लिंकला क्लिक करून संपुर्ण माहिती मिळवा.
TTMM concept episode link: https://youtu.be/uiUPdLNxjBY

जर आपण स्वतः काही TTMM ट्रेक करत असाल तर मला WhatsApp मेसेज वर कळवा, मला वेळेचे गणित जुळल्यास मी सुध्दा जरूर सहभागी होईन.

कळावे लोभ असावा,
आपलाच मित्र,
सिद्धेश पाटील
Simple Lifestyle Vlogs

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

एक अनवट वाट तांदूळवाडी गडाची

भला मोठा तांदूळवाडी / लालठाणे धबधबा, तांदूळवाडी गाडाखाली, सफाळे

OFFBEAT Trekers ने TTMM तत्वावर आयोजित केलेली नाणेघाट ते भीमाशंकर ७० Km मधील पहिला टप्पा नाणेघाट ते आंबोली