OFFBEAT Trekers ने TTMM तत्वावर आयोजित केलेली नाणेघाट ते भीमाशंकर ७० Km मधील पहिला टप्पा नाणेघाट ते आंबोली
OFFBEAT Trekers ने TTMM तत्वावर आयोजित केलेली नाणेघाट ते भीमाशंकर ७० Km मधील पहिला टप्पा नाणेघाट ते आंबोली नमस्कार मंडळी🙏 घाटवाटा ह्या अनादी कालापासून अस्तित्वात आहेत, त्या मी, किंवा ह्यांनी आणि त्यांनी शोधल्या ह्या भानगडीत न पडता आपण त्यांचा आनंद घेणे महत्त्वाचे आहे. जशी नामांकित किल्ल्यावर माणसांची गर्दी होते तसे इथे नसते, इथे फक्त गावकरी दिसतात किंवा आमच्यासारखे खुळे ट्रेकर्स. काहींना वाट भेटते तर काही भरकटतात, थोडी भीती, थोडे नवीन शोधण्याचा एक कसोशीने केलेला प्रयत्न. ऑफबीट ट्रेकर्स ने आयोजीत केलेला ट्रेक हा २ दिवसांचा होता पण मी तो ३ दिवसांचा योजून केला कारण मला नाणेघाट हा ट्रेक वैशाखारे गावातून खालून चालू करायचा होता. माझा फसलेला ट्रेकचा किस्सा मी आधीच्या भागात सांगितला आहे तो मी परत लिहून वेळ वाया घालत नाही. आमचा ट्रेक नाणे घाटातून चालू झाला, ऑफ बीट ट्रेकरची सगळी मंडळी पुण्यातून बसने आले होते त्यामुळे आम्ही नाणे घाटातून फागुळ या गावापर्यंत बसने प्रवास केला, पुढे जंगल होते म्हणून बस इथेच सोडली. या जंगलात भरपूर गरुड आणि इतर पक्षी दिसले, आमच्या बरोबर असलेल्या शौकीन फोटोग्रा...