OFFBEAT Trekers ने TTMM तत्वावर आयोजित केलेली नाणेघाट ते भीमाशंकर ७० Km मधील तिसरा टप्पा अहुपे ते भीमाशंकर
OFFBEAT Trekers ने TTMM तत्वावर आयोजित केलेली नाणेघाट ते भीमाशंकर ७० Km मधील तिसरा टप्पा अहुपे ते भीमाशंकर नमस्कार मंडळी🙏 घाटवाटा ह्या अनादी कालापासून अस्तित्वात आहेत, त्या मी किंवा ह्यांनी किंवा त्यांनी शोधल्या ह्या भानगडीत न पडता आपण त्यांचा आनंद घेणे महत्त्वाचे आहे. जशी नामांकित किल्ल्यावर माणसांची तोबा गर्दी होते तसे इथे नसते, इथे फक्त गुर चारणारे गावकरी दिसतात आणि आमच्यासारखे खुळे ट्रेकर्स. काहींना वाट भेटते तर काही भरकटतात, थोडी भीती, थोडे नवीन शोधण्याचा एक कसोशीने केलेला प्रयत्न. ऑफबीट ट्रेकर्स ने आयोजीत केलेला ट्रेक हा २ दिवसांचा होता पण मी तो ३ दिवसांचा योजून केला कारण मला नाणेघाट हा ट्रेक वैशाखारे गावातून करायचा होता. माझा नाणेघाटात फसलेला ट्रेकचा किस्सा, आणि आंबोली ते अहुपे प्रवासवर्णन मी आधीच्या भागात प्रस्तुत केले आहे ते मी परत लिहून वेळ वाया घालत नाही. नाणेघाट ते आंबोली या ट्रेक बाबद् पण आधीच्या लेखात सविस्तर लिहिले आहे. पुढील लेख क्रमशः अहूपे गावातील रात्र भयानक होती, झोप झाली नाही, तो किस्सा मी माझ्या आधीच्या वर्णनात लिहिला आहे. पहाट झाली आम्ही प्रत:विधी आटोप...