OFFBEAT Trekers ने TTMM तत्वावर आयोजित केलेली नाणेघाट ते भीमाशंकर ७० Km मधील तिसरा टप्पा अहुपे ते भीमाशंकर

OFFBEAT Trekers ने TTMM तत्वावर आयोजित केलेली नाणेघाट ते भीमाशंकर ७० Km मधील तिसरा टप्पा अहुपे ते भीमाशंकर

नमस्कार मंडळी🙏

घाटवाटा ह्या अनादी कालापासून अस्तित्वात आहेत, त्या मी किंवा ह्यांनी किंवा त्यांनी शोधल्या ह्या भानगडीत न पडता आपण त्यांचा आनंद घेणे महत्त्वाचे आहे.

जशी नामांकित किल्ल्यावर माणसांची तोबा गर्दी होते तसे इथे नसते, इथे फक्त गुर चारणारे गावकरी दिसतात आणि आमच्यासारखे खुळे ट्रेकर्स.

काहींना वाट भेटते तर काही भरकटतात, थोडी भीती, थोडे नवीन शोधण्याचा एक कसोशीने केलेला प्रयत्न.

ऑफबीट ट्रेकर्स ने आयोजीत केलेला ट्रेक हा २ दिवसांचा होता पण मी तो ३ दिवसांचा योजून केला कारण मला नाणेघाट हा ट्रेक वैशाखारे गावातून करायचा होता.

माझा नाणेघाटात फसलेला ट्रेकचा किस्सा, आणि आंबोली ते अहुपे प्रवासवर्णन मी आधीच्या भागात प्रस्तुत केले आहे ते मी परत लिहून वेळ वाया घालत नाही.

नाणेघाट ते आंबोली या ट्रेक बाबद् पण आधीच्या लेखात सविस्तर लिहिले आहे.

पुढील लेख क्रमशः

अहूपे गावातील रात्र भयानक होती, झोप झाली नाही, तो किस्सा मी माझ्या आधीच्या वर्णनात लिहिला आहे.

पहाट झाली आम्ही प्रत:विधी आटोपून घतले, सकाळचा चहा झाला, भाकऱ्या आणि बटाट्याची भाजी नाश्ता आणि दुपारच्या जेवणाला बांधून घेतल्या.

सूर्योदय अप्रतिम होता, खेडे गाव, सकाळीं सकाळी दाण्याच्या शोधात फिरणाऱ्या गावठी कोंबड्या, अन हिरवेगार माळरान, त्या पल्याड दूरवर पसरलेली डोंगर रांग, आणि त्यातून उगवलेला नारायण, अप्रतिम दृश्य, आभाळाला लाली आली होती. असे वाटत होते की इथेच खाटेवर बसून राहावे, पण नीघायाची वेळ झाली होती.

बॅगा आवरल्या, आणि चाल सुरू झाली.

अहुपे ते कोंढवळ हा पहिला टप्पा होता, गाव सोडताच आम्ही डोंगर चढायला लागलो, हळू हळू त्याचे रूपांतर गर्द अशा जंगलात झाले. हिरडा खरोता अशी वेग वेगळी औषधी झाडे दिसू लागली.

थोडी फार शेकरू या प्रणयची घरटी दिसू लागली, पण तो दिसला नाही याची खंत लागून राहिली.

हळू जंगलाचे रूपांतर खुरट्या कारवित झाले, थोडी विरळ फुले दिसली, सकाळीं सकाळी असे दर्शन झाले, छान वाटले.

जसं जसे पुढे वाटचाल चालू झाली तशी कारविची जाळी दिसू लागली, फुले तर हजारो, नाही लाखो संखे मध्ये होती, एक डोंगर, दोन डोंगर, तीन डोंगर संपले वाटले होते की डोंगर संपला की कारवी संपले पण ती कसली संपते, आमचे डोळे दिपले होते पण कारवी संपत नव्हती.

कारवीची कमान झाली होती, वरती नवीन जांभळी फुले आणि खाली जमिनीवर मावळलेली फुले असा नजारा होता, जणू सिनेमा असावा.

अखेर कारवी संपली, भरपूर चालल्या नंतर आम्ही एका गवांदेवडी गावात आलो, पुढे लगेच कच्च्या रस्त्यावरून पक्क्या रस्त्यात रूपांतर झाले.

पुढे एक मचाण दिसली, खाली धबधबा होता, बहुदा हाच तो कोंढवळ धबधबा.

असा जिवंत धबधबा बघून मन प्रसन्न झाले, आम्ही सगळ्यांनी अंघोळ करून घेतली.

आता भीमाशंकर फार जवळ होते, हातात वेळ होता म्हणून आम्ही थोडा वेळ इथे जास्त घालवला.

मला आम्ही भर उन्हाळ्यात भेट दिलेल्या काळमांडवी धबधब्याची आठवण झाली, कारण पाण्याच्या प्रवासाने रांजण खळगे फार मोठे अनिंखोल झाले होते.

पुढे भीमाशंकरची वाट धरली, हे जंगल फार गच्च होते, झाडांची दाटी झाली होती. आम्ही शेकरू दिसते का ते शोधत चाललो होतो. शेवटी तो क्षण आला, आम्हाला शेकरू दिसले, एक, दोन, तिन असा ताफा होता, त्याची घरटी होती. मुख्य म्हणजे त्यांनी आम्हाला बघितले पण ते पळाले नाहीत उलट आम्हाला छान फोटो पोझ देत होते, आमच्या ग्रुप मध्ये ज्यांचा DSLR होता त्यांनी पटापट फोटो काढले.

छान असे फोटो आणि व्हिडिओ पण आले.

आता भीमाशंकर अगदी वेशीवर होते, पण आम्ही इथे वाट भरकटलो, पण पुन्हा रस्ता मिळवला आणि श्री क्षेत्र भीमाशंकराचे दर्शन घेतली.

या वर्षातील माझी ही दुसरी भेट होती.

म्हणतात ना जेव्हा देवाची इच्छा होणार तेव्हाच तो योग जुळाऊन आणनार.

असो, आमची ही भटकंती एक वेगळाच अनुभव देऊन गेली, कधी बघीतले नाही असे नजारे बघितले आणि डोळ्याचे पारणे फेडले.

अशा ह्या भटकंतीचा हा शेवट झाला.

मुंबईवरून झालेला माझा खर्च नाणेघाट ते भीमाशंकर

५ रुपये बस बोरिवली स्टेशन
२० रुपये ट्रेन तिकीट कल्याण
९० रुपये कल्यांण ते टोकावडे एसटीने
टोकवाडे ते नाणे घाट starting point by  lift police vehicle zero charges, पण आभार प्रदर्शन म्हणून २ स्पेशल चहा घेतले खर्च ३० रुपये
राहण्याची व्यवस्था होटेल रानमळा, zero charges, विशेष आभार श्री दुंडा पांडुरंग कोकणे यांचे
पहिल्या दिवशी नाश्ता, दुपारचे आणि रात्रीचे जेवण घरून आणले होते
पुढील २दिवस जेवण आणि बस प्रवास यांचे ३०० रुपये
३१५ रुपये भीमाशंकर ते जुईनगर एसटीने
२० रुपये ट्रेन जुइनगर ते बोरिवली
५ रुपये बसने घरी

ऐकून खर्च ७८५ रुपये

हा भन्नाट अनुभव शब्दात व्यक्त करता येण्याजोगा नाही, आणि  एका व्हिडिओत पण पूर्ण करण्याजोगा पण नाही त्यामुळे, छोट्या छोट्या भागात आपण व्हिडिओची बांधणी केली आहे, playlist लिंक दिली आहे ते व्हिडिओ एकदा बघून घ्या आणि स्वर्ग सुखाचा अनुभवा ही विनंती आणि आपला अभिप्राय कॉमेंट मध्ये नक्की कळवावा ही विनंती.

YouTube Playlist link:

Range Trek Naneghat to Bhimashankar, #ghatwata: https://www.youtube.com/playlist?list=PL_bA5qimfsWgC7wjq9VwSI0EIDguE093t

या ट्रेक मध्ये सहभागी झालेल्या समस्त ट्रेकर मंडळीचे आभार, त्यांनी दिलेल्या समर्थनामुळे हा ट्रेक यशस्वी पूर्ण झाला.

ह्या ट्रेकचे आयोजन ऑफ बीट ट्रेकर्सचे सर्वे सर्वा श्री शरद बाचुटे यांनी केले होते, या ट्रेकची संपूर्ण आखणी, अभ्यास, आणि व्यवस्थापन हे वाखाणण्याजोगे होते, कुठेही चूक नाही, कुठेही संभ्रम नाही, कुठेही वेळ वाया घालवला नाही.

ऑफबीट ट्रेकर्सच्या सगळ्याच वरिष्ठ मंडळींकडून काही ना काही गुण शिकण्यासारखे होते, जंगल वाचणे ही लकब या सगळ्यांचं चांगली अवगत आहे याचा प्रत्यय वेळोवेळी आला.

कळत नकळत ऐका ट्रेकवर भेट झाली होती आणि थोड्याच वेळात एका मागोमाग एक असे भरपूर ट्रेक एकत्र झाले ते कळलेच नाही.

जर आपल्याला असे विविधतेने नटलेले किंवा विशेष सहलीची ठिकाण, धबधबे, गुहा लेण्या, किल्ले, ट्रेक, hike किंवा मंदिरांची माहिती असेल तर आम्हाला जरूर कळवा, आम्हाला जरूर आवडेल भेट द्यायला.

मला अपेक्षा आहे आपल्याला माझा अनुभव लेख स्वरुपात आपणाला आवडला असेल. सोबत फोटो फेसबूक लिंक वर ऊपलब्ध आहेत, तरीपण आपणास सध्य परिस्थिती अनुभवायची असेल तर वरील दिलेल्या YouTube लिंकला नक्की क्लिक करून व्हिडिओ पहा, जर व्हीडिओ आवडला तर लाल सबस्क्राइब बटन दाबा, सोबत असलेल्या घंटेला क्लिक करून All हे बटन दाबा म्हणजे आमचे नियमित येणारे व्हिडिओ आपणास पाहण्यासाठी उपलब्ध होतील ते ही काहीही किंमत न मोजता.

WhatsApp Channel Link:
https://whatsapp.com/channel/0029Va9hK5r9xVJnXYQ6yh3L

Facebook page Simple Lifestyle Vlogs:
https://www.facebook.com/simplelifestylevlogs?mibextid=ZbWKwL

Borivali Hikers:
https://facebook.com/groups/509955217958785/

Instagram:
https://www.instagram.com/simplelifestyle.vlogs/

TTMM Simple Lifestyle Vlogs Facebook Group: https://facebook.com/groups/496676889311754/

माझे सगळे लिखाण Blog स्वरूपात: https://simplelifestylevlogs.blogspot.com/

Whatsapp Number: Nine Nine Six Seven One Five Two Nine Three Eight 99:67:1 5:29:38

जर आपल्याला या जागेची अधिक माहिती हवी असल्यास वरील नंबर वर WhatsApp मेसेज करा.

आपण आमच्या TTMM (कमीत कमी खर्च आणि भरपूर भ्रमंती) या मोफत उपक्रमात सहभागी होऊ इच्छित असाल तर मग दिलेल्या फोन नंबर वर WhatsApp मेसेज करा. फोन करू नका तो DND वर आहे, कोणीही फोन उचलणार नाही ह्याची नोंद घ्यावी. आमचे TTMM वर आधारित भरपूर व्हिडिओ YouTube Playlist वर उपलब्ध आहेत, ते लवकरच बघून घ्या आणि आमच्या फिरस्ती मध्ये सामील व्हा. आम्ही कोणतीही किंमत आकारात नाही ह्याची नोंद घ्या.

आमची टी टी एम एम ट्रेक बद्दलची संकल्पना समजून घेण्यासाठी खालील व्हिडिओ लिंकला क्लिक करून संपुर्ण माहिती मिळवा.
TTMM concept episode link: https://youtu.be/uiUPdLNxjBY

जर आपण स्वतः काही TTMM ट्रेक करत असाल तर मला WhatsApp मेसेज वर कळवा, माझे वेळेचे गणित जुळल्यास मला तुमच्या सोबत सहभाग घ्ययला आवडेल.

कळावे लोभ असावा,
आपलाच मित्र,
सिद्धेश पाटील
Simple Lifestyle Vlogs 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

एक अनवट वाट तांदूळवाडी गडाची

भला मोठा तांदूळवाडी / लालठाणे धबधबा, तांदूळवाडी गाडाखाली, सफाळे

OFFBEAT Trekers ने TTMM तत्वावर आयोजित केलेली नाणेघाट ते भीमाशंकर ७० Km मधील पहिला टप्पा नाणेघाट ते आंबोली