उन्हाळ्यातील जिवंत काळमांडवी धबधबा, जव्हार, पालघर
नमस्कार मंडळी🙏 उन्हाळा सुरू झाला, वातावरण कधी उष्ण, थंड, दमट, ढगाळ तर कधी मिश्र असे आहे, म्हणजेच आजाराला निमंत्रण. अनपेक्षित वातावरण बदल हा कळीचा मुद्दा झाला आहे असो, काळजी घ्या, जास्त उनातली भटकंती करू नका, हा सावधानतेचा इशारा. मुलांना सुट्टी वरती गर्मीचा हाहाकार, बरेच दिवस मुले लांबच्या भकांतीवर गेली नव्हती तेव्हा मुलांनी हट्ट धरला की आम्हाला बाहेर फिरायला जायचे आहे, माझी उन्हाळ्यात ट्रेक करायची ईच्छा नसते, म्हणून खास ठेवणीतल्या यादीतून चिठ्ठी काढावी तसा काळमांडवी धबधबा निवडला. काळमांडवी धबधबा हा जव्हार इथे झाप या गावात आहे, साधारण १२० km असा प्रवास बोरिवली वरून गाडीने केला, हा प्रवास स्वर्ग सुख मिळउन गेला, करणं इथे पोहोचताना डोंगर, दऱ्या, गर्द झाडी, ओके बोके पडलेले डोंगर आणि रानमाळ असे सगळ्या प्रकारचे निसर्गाची रुपडे पाहायला मिळाले. जव्हार, विक्रमगड, वाडा, मोखाडा हे पालघर जिल्यातील दुर्गम आणि आदिवासी बहुल प्रदेश. अती दुर्गम आणि दूरवर पसरलेला प्रदेश या मुळे ह्या विभागाची पाहिजे तेवढी सुधारणा झाली नाही त्यामुळे साहजिकच सुविधा देखील मोजकक्याच प्रमाणात, असो. आम्ही साधारण १० वाजता सकाळी...