उन्हाळ्यातील जिवंत काळमांडवी धबधबा, जव्हार, पालघर

नमस्कार मंडळी🙏

उन्हाळा सुरू झाला, वातावरण कधी उष्ण, थंड, दमट, ढगाळ तर कधी मिश्र असे आहे, म्हणजेच आजाराला निमंत्रण. अनपेक्षित वातावरण बदल हा कळीचा मुद्दा झाला आहे असो, काळजी घ्या, जास्त उनातली भटकंती करू नका, हा सावधानतेचा इशारा.

मुलांना सुट्टी वरती गर्मीचा हाहाकार, बरेच दिवस मुले लांबच्या भकांतीवर गेली नव्हती तेव्हा मुलांनी हट्ट धरला की आम्हाला बाहेर फिरायला जायचे आहे, माझी उन्हाळ्यात ट्रेक करायची ईच्छा नसते, म्हणून खास ठेवणीतल्या यादीतून चिठ्ठी काढावी तसा काळमांडवी धबधबा निवडला.

काळमांडवी धबधबा हा जव्हार इथे झाप या गावात आहे, साधारण १२० km असा प्रवास बोरिवली वरून गाडीने केला, हा प्रवास स्वर्ग सुख मिळउन गेला, करणं इथे पोहोचताना डोंगर, दऱ्या, गर्द झाडी, ओके बोके पडलेले डोंगर आणि रानमाळ असे सगळ्या प्रकारचे निसर्गाची रुपडे पाहायला मिळाले.

जव्हार, विक्रमगड, वाडा, मोखाडा हे पालघर जिल्यातील दुर्गम आणि आदिवासी बहुल प्रदेश. अती दुर्गम आणि दूरवर पसरलेला प्रदेश या मुळे ह्या विभागाची पाहिजे तेवढी सुधारणा झाली नाही त्यामुळे साहजिकच सुविधा देखील मोजकक्याच प्रमाणात, असो.

आम्ही साधारण १० वाजता सकाळी पोहोचलो पण सूर्य आग ओकत होता, वैशाख वणवा पेटला होता, असे वाटत होते की दुपारचे १ वाजले आहेत, करणं डोंगर ओके बोके पडले, झाडांची पानगळ झाली होती आणि लाल माती मस्त खरपूस भाजलेल्या चण्याच्या पिठाप्रमाणे भासत होती. मधून मधून मंद वाऱ्याची झुळूक आत्मा तृप्त करत होती.

गाडी थेट धबधब्याच्या पार्किंग पर्यंत पोहोचते म्हणून चिंता नाही. लागणारे सामान बांधून घेतले आणि खाली दरीत उतरायला सुरुवात केली. सुरुवातीला थोड्या पायऱ्या आहेत, नंतर निसरडी मातीची पायवाट आहे. सगळ्यात शेवटी अगदी सरळ सोट उतार आहे, इथे दोन रस्ते खाली उतरतात, मी मुलं बरोबर असल्यामुळे डावा सोपा रस्ता निवडला. पण ह्या रस्त्यात एकीकडे माती, रेती दगड निसरडी दीड फुटाची वाट आहे तर दुसरीकडे खोल दरी आहे, जरा संभळून जा इथून नाहीतर नजर हटी दुर्घटना घटी असाच काहीसा प्रकार आहे.

उतरतानाच धबधब्याचे सुमधुर गुंजन सुरू होतो आणि लोकांचे मोठ मोठाले आवाज देखील ऐकू येतात, तेव्हाच अंदाज येतो खाली किती जमाव आहे तो. हा जमाव म्हणजे टूर ऑपरेटरने घातलेला निसर्गवरील घाला आहे, सोशल मीडियावर मन हेलावणाऱ्या जाहिराती, फोटो, रिल्स टाकायचे आणि पैसेवाले बकरे फासून आणायचे, हेच यांचे धंदे.

जस जस खाली उतरतो तसा कातळ चालू होतो आणि भरपूर ठिकाणी अवघड असा उतार देखील चालू होतो.

खाली आल्यावर सगळीकडे गर्दी होती, भ्रमनिरास झाला होता, अगदी मूड गेला होता, थोडा sunscreen लावला आणि मुलांना साथ द्यावी म्हणून थोडावेळ पाण्यात उतरलो थोडेफार फोटो शूट, व्हिडिओ शूट केला आणि परतीच मार्ग निवडला. दुपारचे १२ वाजले होतो पण सूर्य अजूनच रुद्र वाटत होता.

पार्किंग मध्ये आल्यावर एक मोहाचे गर्द झाड होते तिथे शामियाना लावला, मस्त कोंबडीचा रस्सा आणि बासमती भात, त्यावर जिलेबी असा छोटेखानी बेत केला.

वातावरण सतत बदलत होते, जेव्हा जेवणाला बसलो तेव्हा भरपूर सुंदर वारा सुरू झाला सगळा क्षीण गायब झाला, आनंदी वातावरणात वन भोजन करून परतीचा प्रवास केला.

माझा तुम्हाला सल्ला हाच राहील की ग्रुपने या प्रायव्हेट गाडी करून करणं वेळेची बचत होईल आणि सकाळी ७ पर्यंत पोहोचण्याच्या प्रयत्न करा, कारण १० वाजल्यानंतर टूर ऑपरेटर आणि सार्वजनिक वाहने येणारी मंडळी धडकतात त्यापूर्वी मनसोक्त आनंद लुटा.

इथे जेवणाची पाण्याची सोय नाही तेव्हा सगळ्या गोष्टी बरोबर बाळगा ही विनंती.

जव्हार मध्ये फिरण्यासारख्या भरपूर जागा आहेत पण वातावरण बघून नकोसे वाटते, पावसाळा संपता संपता हा भूभाग बघण्यासारखा हिरवाईने नटलेला असतो आणि वातावरण सुधा आल्हाददायक असते.

भेट देण्यासाठी सूची खालील प्रमाणे,

दाभोसा धबधबा
जयविलास राजवाडा
हनुमान पॉइंट
सनसेट पॉईंट
शिर्पामाळ
खडखड धरण
भुपतगड
नेकलेस पॉइंट

जर कुणाला सार्वजनिक वाहनाने यायचे असेल तर खालील मजकूर नियोजनासाठी समजून घ्या.

पालघर हे वेस्टर्न रेल्वे मार्गावरील स्थानक आहे, पहिली लोकल पकडा.

बोरिवली ते पालघर सतत लोकल ट्रेन उपलब्ध आहेत तिकीट खर्च २० रुपये

पालघर ते जव्हार ट्रेन वेळापत्रकानुसार एसटी बस सेवा उपलब्ध आहे तिकीट खर्च ११० रुपये

जव्हार ते झाप, काळमांडवी धबधब्याची मेन रोड वरील कमान १० रुपये. ( कमानी पासून २-३ km आत चालत जावे लागेल)

जर जीप ने आलात तर २० रुपये

जर वाहन पार्किंग पर्यंत आणले तर ४० रुपये, पण असे वाहन तुम्हाला जर जास्त माणसे असतील तरच उपलब्ध होईल.

असा अंदाजित खर्च येण्याचा आहे.

सार्वजनिक वाहनाने येणार असाल तर कुठेही वेळ दवडू नका कारण एक वाहन चुकले तर कमीत कमी १ तास थांबावे लागेल ह्याची नोंद घ्या.

जर आपण आणि आपले आप्तेष्ट ह्या ठिकाणी काही कारणास्तव जाऊ शकत नसाल तर खालील व्हिडिओची लिंक क्लिक करून त्याचा आनंद लुटा ही विनंती.

जर आपल्याला असे विविधतेने नटलेले किंवा विशेष सहलीची ठिकाण, धबधबे, गुहा लेण्या, किल्ले, ट्रेक, hike किंवा मंदिरांची माहिती असेल तर आम्हाला जरूर कळवा, आम्हाला आवडेल भेट द्यायला.

मला अपेक्षा आहे आपल्याला माझा अनुभव लेख स्वरुपात आवडला असेल. सोबत फोटो फेसबूक लिंक वर ऊपलब्ध आहेत, तरीपण आपणास साध्य परिस्थिती अनुभवायची असेल तर खालील दिलेल्या YouTube लिंकला नक्की क्लिक करून व्हिडिओ पहा, जर व्हीडिओ आवडला तर लाल सबस्क्राइब बटन दाबा, सोबत असलेल्या घंटेला क्लिक करून All हे बटन दाबा म्हणजे आमचे नियमित येणारे व्हिडिओ आपणास पाहण्यासाठी उपलब्ध होतील ते ही काहीही किंमत न मोजता.

हा व्हिडिओची लिंक खालील प्रमाणे, एकदा जरूर बघून घ्यावी आणि आपला अभिप्राय कळवावा ही विनंती.

YouTube video link:
https://youtu.be/ppJz3fdEoxk

Facebook page Simple Lifestyle Vlogs:
https://www.facebook.com/simplelifestylevlogs?mibextid=ZbWKwL

Instagram:
https://www.instagram.com/simplelifestyle.vlogs/

TTMM Simple Lifestyle Vlogs Facebook Group: https://facebook.com/groups/496676889311754/

माझे सगळे लिखाण Blog स्वरूपात: https://simplelifestylevlogs.blogspot.com/

Whatsapp Number: Nine Nine Six Seven One Five Two Nine Three Eight 99:67:1 5:29:38

जर आपल्याला या जागेची अधिक माहिती हवी असल्यास वरील नंबर वर WhatsApp मेसेज करा.

आपण आमच्या TTMM (कमीत कमी खर्च आणि भरपूर भ्रमंती) या मोफत उपक्रमात सहभागी होऊ इच्छित असाल तर मग दिलेल्या फोन नंबर वर WhatsApp मेसेज करा. फोन करू नका तो DND वर आहे, कोणीही फोन उचलणार नाही ह्याची नोंद घ्यावी. आमचे TTMM वर आधारित भरपूर व्हिडिओ YouTube playlist वर उपलब्ध आहेत, ते लवकरच बघून घ्या आणि आमच्या फिरस्ती मध्ये सामील व्हा. आम्ही कोणतीही किंमत आकारात नाही ह्याची नोंद घ्या.

आमची टी टी एम एम ट्रेक बद्दलची संकल्पना समजून घेण्यासाठी खालील व्हिडिओ लिंकला क्लिक करून संपुर्ण माहिती मिळवा.
TTMM concept episode link: https://youtu.be/uiUPdLNxjBY

जर आपण स्वतः काही TTMM ट्रेक करत असाल तर मला WhatsApp मेसेज वर कळवा, मला वेळेचे गणित जुळल्यास मी सुध्दा जरूर सहभागी होईन.

कळावे लोभ असावा,
आपलाच मित्र,
सिद्धेश पाटील
Simple Lifestyle Vlogs

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

एक अनवट वाट तांदूळवाडी गडाची

भला मोठा तांदूळवाडी / लालठाणे धबधबा, तांदूळवाडी गाडाखाली, सफाळे

OFFBEAT Trekers ने TTMM तत्वावर आयोजित केलेली नाणेघाट ते भीमाशंकर ७० Km मधील पहिला टप्पा नाणेघाट ते आंबोली