वाजवी खर्चात आखलेली शिर्डीची सफर
वाजवी खर्चात आखलेली शिर्डीची सफर
नमस्कार मंडळी🙏
आजचा विषय आहे वाजवी खर्चात केलेली शिर्डीची सफर, बरेच दिवस बेत करूनही हा बेत पूर्णत्वास जात नव्हता, काही ना काही काम आडवे येत होते, म्हणून सगळी इच्छाशक्ती पणाला लावली आणि पद्धतशीरपणे आखलेला बेत पूर्णत्वास नेला तो ही कमीत कमी खर्चामध्ये.
सगळ्यात आधी आम्ही १५ दिवस आधी ट्रेन तिकीट बुक केली ती वेटींग लिस्ट वर होती १०० च्या पुढे. तुम्ही निदान महिनाभर आधी तिकीट बुक करा म्हणजे आयत्यावेळी कसरत होणार नाही आणि तिकीट कन्फर्म होईल. प्रवासाचा जास्त त्रास होणार नाही.
आम्हाला बजेट टूर करायची होती म्हणून दादर साईनगर एक्सप्रेसने स्लीपर क्लासची तिकीट ऑनलाईन बुक केली.
तिकीट कन्फर्म नव्हते म्हणून हॉटेल पण बुक केले नाही. जर तिकीट कन्फर्म असेल तर तुम्ही शिर्डी संस्थानाचे हॉटेल रूम ऑनलाईन बुक करू शकतात.
रोज PNR नंबर चेक केला पण काही फायदा झाला नाही, म्हणून बॅग पण पॅक केली नाही. अगदी शेवटच्या क्षणी २ तास आधी कळले की तिकीट RAC वर कन्फर्म झाले आहे. RAC म्हणजे एका स्लीपर सीटवर दोन माणसांनी केलेला प्रवास. जरा अवघड होता पण कार्य सिद्धीस नेण्यास पुरे होता. जाताना सीट मिळून जाते पण परतीच्या प्रवासात ते कठीण होऊन बसते.
लागलीच बॅग पॅक केली आणि धावलो दादर स्टेशनला.
ट्रेन सुटायाच्या १मिनिट आधी फलाटावर पोहोचलो आणि एकदाची ट्रेन पकडली, जरा उशीर झाला असता तर बहुदा ट्रेन सुटली असती.
आम्हाला कामावरून सुट्टी घ्यायची नव्हती म्हणून शनिवारी रात्रीची ९.३० ची ट्रेन निवडली होती जी सकाळी ३.४५ ला शिर्डी साईनगरला आपल्याला पोहोचवते आणि परतीचा प्रवास रविवारी रात्रीचा १०.३० वाजताच्या ट्रेनने केला जी सकाळी ४.३०ला दादरला पोहोचवते. म्हणजे तुम्ही सोमवारी कामावर जायला मोकळे.
शिर्डीमध्ये बहुदा १५ डिग्री सेल्सिअस तापमान असावे, मुंबईच्या मनाने थंडी भरपूर होती, आम्ही तसे गरम कपडे बाळगले होते म्हणून त्रास झाला नाही.
जर तुम्ही लगबगीने साईनगर स्टेशन बाहेर आलात तर तुम्हाला साई संस्थानाची फुकट बस मिळू शकेल नाहीतर शेअर रिक्षा २० रुपयात मंदिरापर्यंत सोडते.
मंदिरात प्रवेश करण्याआधी आपण गेट समोरील लॉकर मध्ये बॅग, चप्पल मोफत ठेऊ शकता. मोबाईल ठेवण्यासाठी आपल्याला ५ रुपये प्रति मोबाईल भरावे लागतात.
सकाळी लवकर रांग लावली तर दर्शना बरोबर आरती देखील मिळते. जसा दिवस चढत जातो तशी गर्दी आणि रंग वाढत जाते ह्याची नोंद घ्यावी. म्हणूनच सकाळी सकाळी दर्शन आटोपून घ्यावे.
दर्शन घेऊन झाले, ज्या गेटने आपण बाहेर पडतो तिथेच तुम्हाला चहा, कॉफी, दूध आणि नाश्ता, पाणी वाजवी दरात मिळतो तो आम्ही उरकून घेतला आणि फ्रेश होण्यासाठी हॉटेल रूमचे चौकशी केली.
हॉटेल रूम आम्ही दोघं जणं असल्यामुळे कमी खर्चातील बघितली. अगदी साई मंदिराबाहेर संस्थानाच्या व्यवस्थेतील रूम मिळाली. लॉकर मधील सामान घेतले. थोडा आराम केला आणि परत शिर्डीनगरी फिरायला निघालो. साई प्रसाद म्हणून भरपूर लडूची पाकीट घेतली. थोडीफार मनुका, पेरू, अंजीर यांची वाजवी दरात खरेदी केली आणि दुपारचे जेवण साई प्रसादालयात मोफत घेतले.
वेळ हाती होता तेव्हा आम्ही शनी शिंगणापूर किंवा नाशिक फिरून आलो असतो पण विचार टाळला आणि रूमवर जाऊन आराम केला, कारण एकच की सोमवारी परत कामावर रुजू होणार होतो.
रात्रीचे जेवण टाळले कारण फिरस्ती करताना थोडे लंघन शरीराला चांगले.
रात्री निघताना जरा लवकर निघालो कारण रिक्षा पकडायची होती आणि ती नाही मिळाली तर २ km चालत जावे लागणार होते.
रात्री शेअर रिक्षा नाही मिळाली म्हणून खाजगी रिक्षा केली आणि साईनगर स्टेशन गाठले.
वेळेत ट्रेन पकडली आणि सुखरूप घरी पोहोचलो.
असा झाला आमच्या बजेट टूरचा समारोप.
आमच्या झालेल्या प्रती माणशी खर्चाचा तपशील खालील प्रमाणे
ट्रेन तिकीट ५१०
रिक्षा साईनगर ते मंदिरासाठी २०
हॉटेल रूम ५० (पूर्ण रूमचे १००)
चहा २
नाश्ता ५
रिक्षा मंदिरापासून साईनगर(खाजगी रिक्षा) ३५
ऐकून खर्च ६२२ रुपये झाला.
जर आपल्याला असे विविधतेने नटलेले किंवा विशेष सहलीची ठिकाण, धबधबे, गुहा लेण्या, किल्ले, ट्रेक, hike किंवा मंदिरांची माहिती असेल तर आम्हाला जरूर कळवा.
मला अपेक्षा आहे आपल्याला माझा अनुभव लेख स्वरुपात आवडला असेल. सोबत फोटो फेसबूक लिंक वर ऊपलब्ध आहेत, तरीपण आपणास साध्य परिस्थिती अनुभवायची असेल तर खालील दिलेल्या YouTube लिंकला नक्की क्लिक करून व्हिडिओ पहा, जर व्हीडिओ आवडला तर लाल सबस्क्राइब बटन दाबा, सोबत असलेल्या घंटेला क्लिक करून All हे बटन दाबा म्हणजे आमचे नियमित येणारे व्हिडिओ आपणास पाहण्यासाठी उपलब्ध होतील ते ही काहीही किंमत न मोजता.
हा व्हिडिओ आपण ३ भागात केला आहे त्याची लिंक खालील प्रमाणे, एकदा जरूर बघून घ्यावी आणि आपला अभिप्राय कळवावा ही विनंती.
YouTube video link:
https://youtu.be/aeuSKu-cSlM
Facebook page Simple Lifestyle Vlogs:
https://www.facebook.com/simplelifestylevlogs?mibextid=ZbWKwL
Instagram:
https://www.instagram.com/simplelifestyle.vlogs/
TTMM Simple Lifestyle Vlogs Facebook Group: https://facebook.com/groups/496676889311754/
माझे सगळे लिखाण Blog स्वरूपात: https://simplelifestylevlogs.blogspot.com/
Whatsapp Number: Nine Nine Six Seven One Five Two Nine Three Eight 99:67:1 5:29:38
जर आपल्याला या जागेची अधिक माहिती हवी असल्यास वरील नंबर वर WhatsApp मेसेज करा.
आपण आमच्या TTMM (कमीत कमी खर्च आणि भरपूर भ्रमंती) या मोफत उपक्रमात सहभागी होऊ इच्छित असाल तर मग दिलेल्या फोन नंबर वर WhatsApp मेसेज करा. फोन करू नका तो DND वर आहे, कोणीही फोन उचलणार नाही ह्याची नोंद घ्यावी. आमचे TTMM वर आधारित भरपूर व्हिडिओ YouTube playlist वर उपलब्ध आहेत, ते लवकरच बघून घ्या आणि आमच्या फिरस्ती मध्ये सामील व्हा. आम्ही कोणतीही किंमत आकारात नाही ह्याची नोंद घ्या.
आमची टी टी एम एम ट्रेक बद्दलची संकल्पना समजून घेण्यासाठी खालील व्हिडिओ लिंकला क्लिक करून संपुर्ण माहिती मिळवा.
TTMM concept episode link: https://youtu.be/uiUPdLNxjBY
जर आपण स्वतः काही TTMM ट्रेक करत असाल तर मला WhatsApp मेसेज वर कळवा, मला वेळेचे गणित जुळल्यास मी सुध्दा जरूर सहभागी होईन.
कळावे लोभ असावा,
आपलाच मित्र,
सिद्धेश पाटील
Simple Lifestyle Vlogs
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा