जय गिरनारी, गिरनार शिखर यात्रा, श्री दत्त गुरू पादुका आणि अखंड धुनीचे दर्शन, १० तास अविरत १०००० पायरींची चढण आणि उतरण
जय गिरनारी, गिरनार शिखर यात्रा, श्री दत्त गुरू पादुका आणि अखंड धुनीचे दर्शन, १० तास अविरत १०००० पायरींची चढण आणि उतरण नमस्कार मंडळी🙏 मागच्या भागात आपण श्री क्षेत्र सोमनाथ आणि वेरावल यात्रेबद्दल सविस्तर माहिती मिळवली आणि आज आपण वेरावल येथून रात्री ११ वाजता जुनागढसाठीच्या प्रवासाला सुरुवात केली. जुनागढ रेल्वे स्थानकात आपण १ वाजता पोहोचलो, इथे भयाण शांतता होती, आम्हीच चौघे जण ट्रेन मधून उतरलो, अगदी रामसेंच्या सिनेमात दाखवतात तसे, रामसेच्या सिनेमा मध्ये जसे भुटिया स्थानक असते तसे, कारण इथे बहुतेक सगळी मंडळी दिवसा प्रवास करून येतात. गिरनार पर्वताच्या पायथ्याच्या तलेटी गावासाठी रिक्षा मिळाली. तलेटी मध्ये पोहोचल्यावर मोठी पंचाईत झाली, आपण ठरवलेल्या हॉटेल मध्ये जागा उपलब्ध नव्हती. रात्री १.३० वाजता हॉटेलची शोधाशोध सुरू झाली. सगळी हॉटेल, धर्मशाळा, आखाडे पालथे घातले पण कुठेही जागा शिल्लक नव्हती. शेवटी एक हॉटेल मालक शेवटची शिल्लक रूम विकण्याच्या प्रतीक्षेत होता, मी जाताच क्षणी तो बोलला शेवटची रूम आहे, लवकर नक्की करा, मी रूम बघून येई पर्यंत दुरे गिऱ्हाईक समोर तयार होते, मी रूम नक्की केली, ...