जय गिरनारी, गिरनार शिखर यात्रा, श्री दत्त गुरू पादुका आणि अखंड धुनीचे दर्शन, १० तास अविरत १०००० पायरींची चढण आणि उतरण

जय गिरनारी, गिरनार शिखर यात्रा, श्री दत्त गुरू पादुका आणि अखंड धुनीचे दर्शन, १० तास अविरत १०००० पायरींची चढण आणि उतरण

नमस्कार मंडळी🙏

मागच्या भागात आपण श्री क्षेत्र सोमनाथ आणि वेरावल यात्रेबद्दल सविस्तर माहिती मिळवली आणि आज आपण वेरावल येथून रात्री ११ वाजता जुनागढसाठीच्या प्रवासाला सुरुवात केली.

जुनागढ रेल्वे स्थानकात आपण १ वाजता पोहोचलो, इथे भयाण शांतता होती, आम्हीच चौघे जण ट्रेन मधून उतरलो, अगदी रामसेंच्या सिनेमात दाखवतात तसे, रामसेच्या सिनेमा मध्ये जसे भुटिया स्थानक असते तसे, कारण इथे बहुतेक सगळी मंडळी दिवसा प्रवास करून येतात.

गिरनार पर्वताच्या पायथ्याच्या तलेटी गावासाठी रिक्षा मिळाली.

तलेटी मध्ये पोहोचल्यावर मोठी पंचाईत झाली, आपण ठरवलेल्या हॉटेल मध्ये जागा उपलब्ध नव्हती.

रात्री १.३० वाजता हॉटेलची शोधाशोध सुरू झाली. सगळी हॉटेल, धर्मशाळा, आखाडे पालथे घातले पण कुठेही जागा शिल्लक नव्हती.

शेवटी एक हॉटेल मालक शेवटची शिल्लक रूम विकण्याच्या प्रतीक्षेत होता, मी जाताच क्षणी तो बोलला शेवटची रूम आहे, लवकर नक्की करा, मी रूम बघून येई पर्यंत दुरे गिऱ्हाईक समोर तयार होते, मी रूम नक्की केली, सगळी दत्त गुरूंची कृपा. दुसरा गिऱ्हाइक नाराज झाला.

रात्री २ वाजता हॉटेल शोधणे म्हणजे माझ्या नाकी नऊ आले होते, परिक्रमेची तारीख जवळ आली होती म्हणून ही परिस्थिती.

थोडा वेळ झोप काढली, पहाटे ४ वाजता अंघोळ आणि नाश्ता करून आम्ही ५.३० वाजता हॉटेल सोडले.

गिरनार पर्वत जवळच होता, सकाळी ५.५० ला आम्ही चढाई सुरू केली. सर्वत्र काळा कुट्ट अंधार होता, वातावरण थंड होते, वारा जोरात वाहत होता. चढाईच्या मार्गात सुरुवातीला गर्द असे जंगल आहे त्यामुळे काहीच दिसत नव्हते.

पायरी मार्ग पण अंधारात होता, भक्तांची हलकी वर्दळ चालू होती, काही भक्त दर्शन घेऊन उतरत होते तर काही भक्त दर्शनासाठी चढत होते.

लहान मुले, तरुण, आणि तरुण वर्गाला लाजवेल असे वायो वृध्द अशी सगळी मंडळी उत्साहात चालले होते.

थोडा डोंगर चढल्यावर सूर्योदय झाला, क्षितिजावर लाली पसरली, वातावरण रम्य भासत होते. पक्षांनी किलबिलाट सुरू केला. जस जसं वर चढत होतो तस तशी हवा अधिकच वहायला लागली होती. शेवटी हवेचा जोर एवढा वाढला की थोड्या वेळासाठी उडण खटोला बंद करावा लागला होता.

आम्ही आधी दर ३० मिनिटाला एक ५ मिनिटाचा आराम असा निर्णय करून चाललो होतो, पण सुरुवातीला आम्ही दर १५ मिनिटाला २-३ मिनिटाचा आराम घेतला. थोड्याच वेळानी शरीर गरम झाले मग काय थकवा लागला नाही, आल्हाददायक वातावरण आपल्याला थकू देत नाही. हा योग जुळून आला आणि आम्ही ४००० पायरी कधी चढलो ते कळलेच नाही, इथे मंदिरे चालू होतात. इथे मंदिरात तुम्ही मोफत स्वच्छ असे टॉयलेट वापरू शकता, थंड फिल्टर केलेले पणी पिऊ शकता.

आम्ही ५००० पायरीचा टप्पा लवकरच पार केला. समोरच दिसणारे गुरू शिखराचे लोभसवाणे रूप कितीही बघितले तरी मन शांती होत नव्हती. शेवटी गुरू शिखर बघत आम्ही परत छोटा ब्रेक घेतला.

पहिला ५००० पायरी टप्पा आपल्याला डोंगराची उंची भासून देत नाही, आपण किती उंच आलो ते कळत नाही, पण जसे गुरू शिखर आणि समोरची डोंगर रांग बघितली की मनाला विश्वास होता नाही, काळेभोर डोंगरांचे सुळके आणि निळेशार आकाश आपल्याला गुरुशिखराच्या दुर्गमतेची आणि भव्यातेच जाणीव करून देते. समोरच खोल दरी परत डोंगराचा चढ परत उतार आणि शेवटचे चढ बघताना आपला प्रवास कधी संपतो ते कळतच नाही.

गुरू पादुकांचे दर्शन करून मन प्रसन्न झाले. इथे वरा जणू वेड लागल्यागत जसे नुकतेच जन्माला आलेले वासरू कसे उड्या मारत असते अगदी तसाच वेंधळा झाल्यासम भासत होता.

पादुकांचे दर्शन झाल्या नंतर आम्ही दत्त धुनी, कमंडलू तीर्थ इथे गेलो, तिकडचे वातावरण जास्तच भारावलेले मला भासले, प्रसाद म्हणून मिळालेला गरम गरम ढोकळा, कढी आणि तूप भरलेली लापशी हे खाऊन मन आणि पोट दोन्ही तुडुंब भरले, अगदी आनंद द्विगुणित झाला आणि थकवा नाहीसा झाला. पुन्हा १०००० पायऱ्या चालण्याची ताकद देऊन गेला.

परतीच्या मार्गावर आम्ही अंबाजी माता मंदिरात जाऊन दर्शन घेतले.

एव्हाना दुपार झाली होती, तरी भक्तांची रीघ कमी होत नव्हती. उतरताना ऊनाचा तडाखा लागत होता, मधला उतरणीचा डोंगर ओका बोका आहे, एकही झाड नाही, सावली नाही आहे, तेव्हा हा भाग उतरताना जास्त जीकरीचा वाटला.

आम्ही अखेर दुपारी ४ च्या आस पास डोंगर खाली उतरलो.

उतरताच क्षणी तलाती गावात मस्त शहाळी विकत होते, गरम वातावरणात आणि वाजवी अशा ३० रुपये किमतीत ते विकत होते, पोट भरेस्तव आम्ही ती पिली आणि हॉटेल वर जाऊन थोडावेळ झोपलो.

वाटेत मस्त लाल पेरू आणि हिरवे कवळे पिस्ता पण घेतले.

रात्री तलेटी मधील सगळ्यात सुंदर अशा हॉटेल मध्ये मस्त गुजराथी थाळीचा आस्वाद घेतला आणि दिवसाची समाप्ती केली.

पुढील जुनागढ मधील भटकंती क्रमशः

हा आमचा भटकंती रुपी अनुभव आपण व्हिडिओ स्वरूपात मांडत आहोत, तो नक्की बघुनं घ्या आणि आपला अभिप्राय कमेंट मध्ये नक्की कळवावा ही विनंती.

YouTube Video Link:
https://youtu.be/Vlj2nXyZu0E

ही फिरस्तीची मोहीम आखताना मी भरपूर ट्रेकर मंडळींशी सल्ला मसलत केली होती आणि त्यांनी दिलेल्या माहितीमुळे आम्हाला भरपूर फायदा झाला, त्यांचे विशेष आभार.

जर आपल्याला असे विविधतेने नटलेले किंवा विशेष सहलीची ठिकाण, धबधबे, गुहा लेण्या, किल्ले, ट्रेक, hike किंवा मंदिरांची माहिती असेल तर आम्हाला जरूर कळवा, आम्हाला जरूर आवडेल भेट द्यायला.

मला अपेक्षा आहे आपल्याला माझा अनुभव लेख स्वरुपात आपणाला आवडला असेल. सोबत फोटो फेसबूक लिंक वर ऊपलब्ध आहेत, तरीपण आपणास सध्य परिस्थिती अनुभवायची असेल तर वरील दिलेल्या YouTube लिंकला नक्की क्लिक करून व्हिडिओ पहा, जर व्हीडिओ आवडला तर लाल सबस्क्राइब बटन दाबा, सोबत असलेल्या घंटेला क्लिक करून All हे बटन दाबा म्हणजे आमचे नियमित येणारे व्हिडिओ आपणास पाहण्यासाठी उपलब्ध होतील ते ही काहीही किंमत न मोजता.

WhatsApp Channel Link:
https://whatsapp.com/channel/0029Va9hK5r9xVJnXYQ6yh3L

Facebook page Simple Lifestyle Vlogs:
https://www.facebook.com/simplelifestylevlogs?mibextid=ZbWKwL

Borivali Hikers:
https://facebook.com/groups/509955217958785/

Instagram:
https://www.instagram.com/simplelifestyle.vlogs/

TTMM Simple Lifestyle Vlogs Facebook Group: https://facebook.com/groups/496676889311754/

माझे सगळे लिखाण Blog स्वरूपात: https://simplelifestylevlogs.blogspot.com/

Whatsapp Number: Nine Nine Six Seven One Five Two Nine Three Eight 99:67:1 5:29:38

जर आपल्याला या जागेची अधिक माहिती हवी असल्यास वरील नंबर वर WhatsApp मेसेज करा.

आपण आमच्या TTMM (कमीत कमी खर्च आणि भरपूर भ्रमंती) या मोफत उपक्रमात सहभागी होऊ इच्छित असाल तर मग दिलेल्या फोन नंबर वर WhatsApp मेसेज करा. फोन करू नका तो DND वर आहे, कोणीही फोन उचलणार नाही ह्याची नोंद घ्यावी. आमचे TTMM वर आधारित भरपूर व्हिडिओ YouTube Playlist वर उपलब्ध आहेत, ते लवकरच बघून घ्या आणि आमच्या फिरस्ती मध्ये सामील व्हा. आम्ही कोणतीही किंमत आकारात नाही ह्याची नोंद घ्या.

आमची टी टी एम एम ट्रेक बद्दलची संकल्पना समजून घेण्यासाठी खालील व्हिडिओ लिंकला क्लिक करून संपुर्ण माहिती मिळवा.
TTMM concept episode link: https://youtu.be/uiUPdLNxjBY

जर आपण स्वतः काही TTMM ट्रेक करत असाल तर मला WhatsApp मेसेज वर कळवा, माझे वेळेचे गणित जुळल्यास मला तुमच्या सोबत सहभाग घ्ययला आवडेल.

कळावे लोभ असावा,
आपलाच मित्र,
सिद्धेश पाटील
Simple Lifestyle Vlogs 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

एक अनवट वाट तांदूळवाडी गडाची

भला मोठा तांदूळवाडी / लालठाणे धबधबा, तांदूळवाडी गाडाखाली, सफाळे

OFFBEAT Trekers ने TTMM तत्वावर आयोजित केलेली नाणेघाट ते भीमाशंकर ७० Km मधील पहिला टप्पा नाणेघाट ते आंबोली