मुंबई वरून केलेला जुन्नर प्रवास आणि पुढे हटकेश्वर ते लेण्याद्री केलेला रेंज ट्रेक "ऑफ बीट ट्रेकर" सोबत
नमस्कार मंडळी, हा ट्रेक आम्ही नोव्हेंबर महिन्यातच केला होता, पण काही कारणामुळे आपण त्यानंतर केलेले व्हिडिओ आधी रिलीज केले आणि मग तब्बेतीच्या कारणास्तव मी व्हिडिओ एडिटिंग आणि फोटो एडिटिंग मध्ये उशीर केला. आपले अजून भरपूर व्हिडिओ येतील, पण तब्बेतीमुळे थोडा अजून वेळ लागणार आहे, त्याबद्दल क्षमस्व 🙏 ऑफ बीट ट्रेकर्सने हटकेश्वर ते लेण्याद्री असा ट्रेक करायचा असे ठरवले होते, ते पुण्याहून आणि मी मुंबईतून येणार असे ठरले. हा ट्रेक आम्ही TTMM या तत्त्वावर केला होता. सोबत कोणी येते का असे आमच्या TTMM ट्रेक ग्रुप पर विचारले असता उदासीनता दिसली, असो हे चालायचेच. कसे जायचे याचा विचार आणि अभ्यास झाला. सल्ला मासलत झाली, भरपूर जणांनी ग्रुप वर माहिती दिली. शेवटी मी आणि सुजित यांनी मुंबई सेंट्रल वरून रात्री शेवटची जुन्नर एसटी बस १२ च्या सुमारास आहे, ती पकडुन सकाळी जुन्नरला ७ वाजता पोहोचलो. एसटी उशिराच पोहोचली कारण बोरघाट १ तास बंद होता. तिथून लेण्याद्री साठी थेट बस नाही पण लेण्याद्री फाट्यावर जाण्यासाठी बस आहे ती पकडली, पुढे २-३ km साठी आम्हाला लिफ्ट मिळाली ती पकडुन लेण्याद्री डोंगराखाली पोहोचलो. वात...