यादव कालीन शिरगाव किल्ल्याची सफर
नमस्कार मंडळी🙏
शिरगाव हे नाव महाराष्ट्राला नवीन नाही, कारण शिरगाव हे नाव महाराष्ट्रातील भरपूर गावांचे आढळते. पण आज आपण भेट देणार आहोत ती पालघर मधील सातपाटी गाव जवळील एका समृद्ध गावाला.
पालघर जिल्ह्यातील, शिरगाव हे गाव समुद्र किनारी वसलेले आहे, इथे बहुतेक बागायती शेती केली जाते, नारळी फोफळी, केळी, दुधी, अळू, कांदे, भात शेती हा प्रामुख्याने केलेला व्यवसाय.
ह्या जागेचे भौगोलिक आणि सागरी वैशिष्ट बघून देवगिरीच्या यादवांनी इस १२२५ साली बांधला, पण नंतर हा किल्ला भरपूर राजवटींच्या अधिपत्याखाली राहिला आणि जशी राजवट तशी किल्ल्याची सौरचना बदलली गेली, सगळ्यात शेवटी हा किल्ला इंग्रजांनी वापरला होता आणि त्यात गरजेनुसार बदल केले गेले.
किल्ल्याचे वैशिट्य हे की इथे बहुमजली इमारती होत्या, आत्ता फक्त ढासळलेले अवशेष बाकी आहेत. या किल्ल्यात एक दुर्मिळ तोफ सुस्थितीत आढळते. किल्ल्यात त्याकाळातील एक सौच कुप पण आढळतो. इथे पोर्तुगीज लोकांचा वावर होता आणि त्याकाळात साऊथ आफ्रिका देशातून आणलेला वेडा माड ह्या किल्ल्यात आणि अजू बाजूला त्याची उत्पत्ती झालेले आढळते.
ह्या किल्ल्याला ५ बुरुज असून त्यात एक बुरुज हा अष्टकोनी बुरुज देखील आहे. किल्ल्याला प्रामुख्याने दोन दरवाजे आहेत पण सुरक्षेच्या कारणाने पश्चिमेचा दरवाजा बंद कण्यात आला आहे.
हा किल्ला समुद्रालगत आहे, पण पाण्यात नाही. पण इथून समुद्रातील दूरवर हालचाली वर लक्ष ठेवता येत असत हे त्याचे वैशिषट्य.
ह्या किल्ल्याचे नोंद ग्याझेटीयर मध्ये असल्याने ह्याचे नियमित डागडुजी केली जाते आणि तूर्त हा भरपूर चांगल्या स्थितीत आढळतो.
किल्ल्याचे सौरचना इतकी सुंदर आहेत की सूर्यास्ताचे वातावरण मंत्रमुग्ध करणारे असते.
भरपूर चांगल्या प्रकारे फोटोग्राफी करता येते.
समोरच समुद्रलगत सुरुची बाग आणि त्यपल्याड सफेद वाळूचा फेसळणारा समुद्र हे एक सुंदर जुळून आलेले यमक आहे.
इथे मुंबई वरून येण्यासाठी पश्चिम रेल्वेच्या डहाणू कडे येणारी कोणतीही लोकल पकडा आणि पालघर या स्थानकात उतरावे लागते, स्थानका बाहेर सातपाटी एसटी उभी असते, ती पकडुन शिरगाव किल्ला ह्या स्टॉप वर उतरावे, समोरच अजस्त्र असा किल्ला आपल्या स्वागताला उभा असेल.
हा आमचा भटकंती रुपी अनुभव आपण व्हिडिओ स्वरूपात मांडत आहोत, तो नक्की बघुनं घ्या आणि आपला अभिप्राय कमेंट मध्ये नक्की कळवावा ही विनंती.
YouTube Video Link:
https://youtu.be/lbuoOA6Dkn8
ही फिरस्तीची मोहीम आखताना मी भरपूर ट्रेकर मंडळींशी सल्ला मसलत केली होती आणि त्यांनी दिलेल्या माहितीमुळे आम्हाला भरपूर फायदा झाला, त्यांचे विशेष आभार.
जर आपल्याला असे विविधतेने नटलेले किंवा विशेष सहलीची ठिकाण, धबधबे, गुहा लेण्या, किल्ले, ट्रेक, hike किंवा मंदिरांची माहिती असेल तर आम्हाला जरूर कळवा, आम्हाला जरूर आवडेल भेट द्यायला.
मला अपेक्षा आहे आपल्याला माझा अनुभव लेख स्वरुपात आपणाला आवडला असेल. सोबत फोटो फेसबूक लिंक वर ऊपलब्ध आहेत, तरीपण आपणास सध्य परिस्थिती अनुभवायची असेल तर वरील दिलेल्या YouTube लिंकला नक्की क्लिक करून व्हिडिओ पहा, जर व्हीडिओ आवडला तर लाल सबस्क्राइब बटन दाबा, सोबत असलेल्या घंटेला क्लिक करून All हे बटन दाबा म्हणजे आमचे नियमित येणारे व्हिडिओ आपणास पाहण्यासाठी उपलब्ध होतील ते ही काहीही किंमत न मोजता.
WhatsApp Channel Link:
https://whatsapp.com/channel/0029Va9hK5r9xVJnXYQ6yh3L
Facebook page Simple Lifestyle Vlogs:
https://www.facebook.com/simplelifestylevlogs?mibextid=ZbWKwL
Borivali Hikers:
https://facebook.com/groups/509955217958785/
Instagram:
https://www.instagram.com/simplelifestyle.vlogs/
TTMM Simple Lifestyle Vlogs Facebook Group: https://facebook.com/groups/496676889311754/
माझे सगळे लिखाण Blog स्वरूपात: https://simplelifestylevlogs.blogspot.com/
Whatsapp Number: Nine Nine Six Seven One Five Two Nine Three Eight 99:67:1 5:29:38
जर आपल्याला या जागेची अधिक माहिती हवी असल्यास वरील नंबर वर WhatsApp मेसेज करा.
आपण आमच्या TTMM (कमीत कमी खर्च आणि भरपूर भ्रमंती) या मोफत उपक्रमात सहभागी होऊ इच्छित असाल तर मग दिलेल्या फोन नंबर वर WhatsApp मेसेज करा. फोन करू नका तो DND वर आहे, कोणीही फोन उचलणार नाही ह्याची नोंद घ्यावी. आमचे TTMM वर आधारित भरपूर व्हिडिओ YouTube Playlist वर उपलब्ध आहेत, ते लवकरच बघून घ्या आणि आमच्या फिरस्ती मध्ये सामील व्हा. आम्ही कोणतीही किंमत आकारात नाही ह्याची नोंद घ्या.
आमची टी टी एम एम ट्रेक बद्दलची संकल्पना समजून घेण्यासाठी खालील व्हिडिओ लिंकला क्लिक करून संपुर्ण माहिती मिळवा.
TTMM concept episode link: https://youtu.be/uiUPdLNxjBY
जर आपण स्वतः काही TTMM ट्रेक करत असाल तर मला WhatsApp मेसेज वर कळवा, माझे वेळेचे गणित जुळल्यास मला तुमच्या सोबत सहभाग घ्ययला आवडेल.
कळावे लोभ असावा,
आपलाच मित्र,
सिद्धेश पाटील
Simple Lifestyle Vlogs
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा