मुंबई वरून केलेला जुन्नर प्रवास आणि पुढे हटकेश्वर ते लेण्याद्री केलेला रेंज ट्रेक "ऑफ बीट ट्रेकर" सोबत

नमस्कार मंडळी,


हा ट्रेक आम्ही नोव्हेंबर महिन्यातच केला होता, पण काही कारणामुळे आपण त्यानंतर केलेले व्हिडिओ आधी रिलीज केले आणि मग तब्बेतीच्या कारणास्तव मी व्हिडिओ एडिटिंग आणि फोटो एडिटिंग मध्ये उशीर केला. आपले अजून भरपूर व्हिडिओ येतील, पण तब्बेतीमुळे थोडा अजून वेळ लागणार आहे, त्याबद्दल क्षमस्व 🙏


ऑफ बीट ट्रेकर्सने हटकेश्वर ते लेण्याद्री असा ट्रेक करायचा असे ठरवले होते, ते पुण्याहून आणि मी मुंबईतून येणार असे ठरले. हा ट्रेक आम्ही TTMM या तत्त्वावर केला होता.


सोबत कोणी येते का असे आमच्या TTMM ट्रेक ग्रुप पर विचारले असता उदासीनता दिसली, असो हे चालायचेच.


कसे जायचे याचा विचार आणि अभ्यास झाला. सल्ला मासलत झाली, भरपूर जणांनी ग्रुप वर माहिती दिली. शेवटी मी आणि सुजित यांनी मुंबई सेंट्रल वरून रात्री शेवटची जुन्नर एसटी बस १२ च्या सुमारास आहे, ती पकडुन सकाळी जुन्नरला ७ वाजता पोहोचलो. एसटी उशिराच पोहोचली कारण बोरघाट १ तास बंद होता. 


तिथून लेण्याद्री साठी थेट बस नाही पण लेण्याद्री फाट्यावर जाण्यासाठी बस आहे ती पकडली, पुढे २-३ km साठी आम्हाला लिफ्ट मिळाली ती पकडुन लेण्याद्री डोंगराखाली पोहोचलो.


वातावरण मस्त थंड होते. वाटेत भरपूर शेती लागवड आहे, सूर्यफुल, ऊस, केळी अशी बरीच काही लागवड दिसत होती, समोरच सूर्य डोकाऊ लागला होता. पक्षी मस्त किलबिलाट करत होते. भरपूर प्रकारचे वेगवेगळे पक्षी दिसले त्यामुळे मन प्रसन्न झाले.


डोंगराखाली संस्थानाचे राहण्याची उत्तम सोय आहे, हॉटेल देखील आहे, आम्ही सकाळचा कार्यक्रम उरकून घेतला, उत्तम आणि स्वच्छ अशी अंघोळीची आणि टॉयलेटची व्यवस्था इथे आहे, एक पैसा पण मोजावा लागत नाही हे विशेष.


सकाळचा चहा नाश्ता केला, तो पर्यंत ऑफबीट ट्रेकर्स ने लेण्याद्री ते हटकेश्वर असा प्रवास न करता हटकेश्वर ते लेण्याद्री असा करायचा असे कळवले.


मग काय परत चाल धरली पण रस्त्यात एक शेतकरी दादा भेटले, ट्रॅक्टर घेऊन डिझेल भरायला चालेल होते, विचारले बसू का? तर बोलले ट्रॅक्टर मातीने माखला आहे  कपडे खराब होतील, पण आम्ही पण बोललो, आम्ही पण मातीतली माणसे आहोत, बसतो, ते खूश झाले आणि आम्हाला लेण्याद्री फाट्यावर सोडले, एक पैसापण घेतला नाही हे विशेष, हीच गरीबाची श्रीमंती.


आम्हाला गोध्रे गावातून हा ट्रेक चालू करायचा होता, ते जवळच होते, मग ऑफ बीट ट्रेकर्स यांची बस रस्त्यात भेटली आणि पुढे निघालो.


गोध्रे गावात लगेच पोहोचलो, तिथे स्थानिक रहावशी भेटले, त्यांनी सोपा मार्ग दाखवला, गावात जाताना, माळरानावर उजव्या बाजूला डोंगरात एक पाण्याची टाकी रस्त्यावरून दिसते, तिथूनच हा ट्रेक चालू होतो.


सगळे माळरान होते, गवत मजले होते, ढोर वाटा भरपूर आहेत, पण आम्ही गडाच्या दिशेने चाललो होतो, हा प्रवास लांब पल्ल्याचा आहे सहसा एकट्याने करू नये, रस्त्यात एक माणूस पण दिसला नाही, एक, दोन, तीन असे भरपूर डोंगर पार केले, एका डोंगरावरून दुसऱ्या मोठया डोंगरावर चढ कायम होता शेवटी आम्ही ऐका मोठाल्या सपाट पठारावर पोहोचलो, आत्ता हटकेश्वरचा शेवटचा उंटाच्या पाठी सारखा डोंगर दिसायला सुरुवात झाली होती.


अर्धा टप्पा पार झाला, थोडा विश्राम केला, पण समोर भला मोठ्ठा डोंगर जणू काही आम्हाला आव्हान देत उभा होता, आम्ही चढाई सुरू केली. हा चढ कठीण श्रेणीतील आहे, उभा ७०-८० अंशत सततची चढाई आहे. ती पार करून आम्ही मुख्य हटकेश्वरच्या डोंगरावर आलो, इथून पुढे १ किलोमीटर हटकेश्वर मंदिर आहे. पुढे हाच डोंगर ओलांडून आपण पलीकडे मंदिराकडे जातो, जर सरळ वाटेने गेलो तर नेढे लागते. जसा डोंगर ओलांडतो तसे आपल्याला विस्तृत असे पिंपळगाव जोगा धरण दिसते, ते भरपूर अथांग आहे.


समोरच हटकेश्वर मंदिर दिसते ते दगड रचून बांधले आहे, पण कोणे एकेकाळी इथे मंदिर वास्तू अस्तित्वात असावी असे भासते. हटकेश्वराचे तीन वेळा दर्शन घेतले की आपल्याला काशीला भेट दिल्याचे पुण्य लाभते असे वाचनात आले होते. ह्या मंदिराचा उल्लेख भरपूर पुराणात देखील केला गेला आहे. मंदिरात भरपूर पण छोट्या नंदी आणि शंकराच्या पिंडी ठेवलेल्या आहेत, बहुदा गावातील लोक नवस फेडत असावेत.


मंदिराच्या खालच्या बाजूला खडा उतार आहे आणि इथे एक गुहा आहे, गुहेच्या दरात पण एक नंदी आणि शंकराची पिंडी आहे पण ही पिंडी वेगळी आहे, तिची पण एक गोष्ट आहे, ती पिंडी एक होलात आहे आणि ती दोन्ही हाताच्या तीन बोटात पकडुन काढता आणि ठेवता आली पाहिजे, मग तो माणूस भाग्यवान असे बोलले जाते. 


गुहा फार खोलवर आहे, पण आत फक्त अंधार आहे, आणि ती आत निमुळती होत जाते. आत फक्त वटवागूळ आहेत.


गुहा बघून आम्ही नेढे बघायला गेलो, नेढ्याचा रस्ता फार भयावह आहे, गवत माजलेले होते. झाडे झुडपे भरपूर आहेत. पुढे परत एक शंकराची पिंडी दिसते, हा किल्ल्याचा शेवटचा भाग, पुढे सरळ सोट उतार आहे, मग आपण नेढ्याकडे पोहोचतो. आम्ही भरपूर प्रयत्न केले आणि थोडे फोटो काढले, कारण नेढे एवढे मोठे आहे की त्यावरून आपल्याला दिसत नाही. समोरच्या डोंगरावरून काही चांगले फोटो येतात आणि नेढे स्पष्ठ दिसते.


गडावर ३-४ पाण्याच्या टाक्या आहेत पण त्यातील एकच टाकी पिण्या जोगी आहे, जर पाणी प्यायचेच असेल तर बरोबर फिल्टर आणि क्लोरीनच्या गोळ्या किंवा ड्रॉप बरोबर ठेवा, मंदिरात एक झरा आहे ते पणी पिण्याजोगे आहे.


एव्हाना दुपार झाली होती, समोरच लेण्याद्री डोंगर दिसत होता तो लांबचा पल्ला होता म्हणून आम्ही दुपारचे जेवण आटोपून घेतले आणि लगेचच परतीचा प्रवास सुरू केला.


डोंगर उतरून पठारावर आलो, पण गोध्रे गावाकडे न जाता समोरच्या डोंगरावर आलो. तिथे एक झोपडी आहे तिच्या खालच्या अंगाला एक पाय वाट जाते तीच धरली, डोंगरावर गेलो तर पायपीट जास्त होईल. हा मार्ग शॉर्ट कट आहे. पण बिकट आहे, लोक गुर ढोर ने आण करत असतात, त्यामुळे भरपूर गुराखी भेटतात आणि आपल्याला रस्ता पण सांगतात.


पुढचा रस्ता अजिबात कठीण नाही सरळ सोट आहे. पण काही ठिकाणी पायवाट नाही, हा भाग लेण्याद्री डोंगरावर आहे तेव्हा सावधान, इथे भटकण्याची दाट शक्यता आहे.


पुढे थोड्या पायऱ्या आहे, आणि पण सरळ उतार, आपण लेण्याद्री लेण्याच्या शेवटच्या टोकाकडून जिथे लेण्याद्री च्या पायऱ्या आहेत तिथे खाली उतरतो.


आम्हाला उशीर झाला होते मग आम्ही लेण्याद्री दर्शन टाळले, लांबून नमस्कार केला, आणि पुढची भेट नक्की केली.


मुंबईला येण्यासाठी लेण्याद्री फाटा, आणि पुढे बनकर फाटा गाठला, तिथून कल्याण गाठले.


अशी मस्त भटकंती झाली, श्रींच्या कृपेने प्रवास एकदम सोपा झाला, वातावरण चॅनल होते, सूर्य अधून मधून डोकावला, एकदम सगळे यमक जुळून आले पण कुठेही थकवा नव्हता.


आमचा मुंबई ते मुंबई प्रवासच खर्च अगदी वाजवी म्हणजे ४७७ रुपयात झाला होता.


आपल्याला जर जुन्नरला लवकर पोहोचायचे असेल तर कल्याण वरून सतत भल्या पहाटे पण चालू असतात, त्या वापरून तुम्ही लवकर सकाळी जुन्नर मध्ये पोहोचू शकता.


हा आमचा भटकंती रुपी अनुभव आपण व्हिडिओ स्वरूपात मांडत आहोत, तो नक्की बघुनं घ्या आणि आपला अभिप्राय कमेंट मध्ये नक्की कळवावा ही विनंती.


YouTube Video Link:

Hatkeshwar to Lenadri Ghat Wat: https://www.youtube.com/playlist?list=PL_bA5qimfsWgsw72-ubTiI8Ln-waWkGzk


ही फिरस्तीची मोहीम आखताना मी भरपूर ट्रेकर मंडळींशी सल्ला मसलत केली होती आणि त्यांनी दिलेल्या माहितीमुळे आम्हाला भरपूर फायदा झाला, त्यांचे विशेष आभार.


जर आपल्याला असे विविधतेने नटलेले किंवा विशेष सहलीची ठिकाण, धबधबे, गुहा लेण्या, किल्ले, ट्रेक, hike किंवा मंदिरांची माहिती असेल तर आम्हाला जरूर कळवा, आम्हाला जरूर आवडेल भेट द्यायला.


मला अपेक्षा आहे आपल्याला माझा अनुभव लेख स्वरुपात आपणाला आवडला असेल. सोबत फोटो फेसबूक लिंक वर ऊपलब्ध आहेत, तरीपण आपणास सध्य परिस्थिती अनुभवायची असेल तर वरील दिलेल्या YouTube लिंकला नक्की क्लिक करून व्हिडिओ पहा, जर व्हीडिओ आवडला तर लाल सबस्क्राइब बटन दाबा, सोबत असलेल्या घंटेला क्लिक करून All हे बटन दाबा म्हणजे आमचे नियमित येणारे व्हिडिओ आपणास पाहण्यासाठी उपलब्ध होतील ते ही काहीही किंमत न मोजता.


WhatsApp Channel Link:

https://whatsapp.com/channel/0029Va9hK5r9xVJnXYQ6yh3L


Facebook page Simple Lifestyle Vlogs:

https://www.facebook.com/simplelifestylevlogs?mibextid=ZbWKwL


Borivali Hikers:

https://facebook.com/groups/509955217958785/


Instagram:

https://www.instagram.com/simplelifestyle.vlogs/


TTMM Simple Lifestyle Vlogs Facebook Group: https://facebook.com/groups/496676889311754/


माझे सगळे लिखाण Blog स्वरूपात: https://simplelifestylevlogs.blogspot.com/ 


Whatsapp Number: Nine Nine Six Seven One Five Two Nine Three Eight 99:67:1 5:29:38


जर आपल्याला या जागेची अधिक माहिती हवी असल्यास वरील नंबर वर WhatsApp मेसेज करा. 


आपण आमच्या TTMM (कमीत कमी खर्च आणि भरपूर भ्रमंती) या मोफत उपक्रमात सहभागी होऊ इच्छित असाल तर मग दिलेल्या फोन नंबर वर WhatsApp मेसेज करा. फोन करू नका तो DND वर आहे, कोणीही फोन उचलणार नाही ह्याची नोंद घ्यावी. आमचे TTMM वर आधारित भरपूर व्हिडिओ YouTube Playlist वर उपलब्ध आहेत, ते लवकरच बघून घ्या आणि आमच्या फिरस्ती मध्ये सामील व्हा. आम्ही कोणतीही किंमत आकारात नाही ह्याची नोंद घ्या.


आमची टी टी एम एम ट्रेक बद्दलची संकल्पना समजून घेण्यासाठी खालील व्हिडिओ लिंकला क्लिक करून संपुर्ण माहिती मिळवा.

TTMM concept episode link: https://youtu.be/uiUPdLNxjBY


जर आपण स्वतः काही TTMM ट्रेक करत असाल तर मला WhatsApp मेसेज वर कळवा, माझे वेळेचे गणित जुळल्यास मला तुमच्या सोबत सहभाग घ्ययला आवडेल.


कळावे लोभ असावा,

आपलाच मित्र,

सिद्धेश पाटील

Simple Lifestyle Vlogs

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

एक अनवट वाट तांदूळवाडी गडाची

भला मोठा तांदूळवाडी / लालठाणे धबधबा, तांदूळवाडी गाडाखाली, सफाळे

OFFBEAT Trekers ने TTMM तत्वावर आयोजित केलेली नाणेघाट ते भीमाशंकर ७० Km मधील पहिला टप्पा नाणेघाट ते आंबोली