श्री गगनगिरी महाराज मठ, मनोरी
नमस्कार मंडळी, आजची सफर एक अध्यात्मिक स्थानाला भेट देण्यासाठी आखली होती, श्री गगनगिरी महाराज मठ, मनोरी हे गाव तसे मुंबई जवळचेच आहे पण सोयी सुविधांपासून आणि शहरिकरणा पसून अजून अवगत झाले नाही. कारण ह्या गावाला पोहोचण्यासाठी रस्त्यानं भाईंदर येथून जाता येते पण ते सोयीस्कर होत नाही, मालाड इथून मर्वे समुद्र किनारा इथून बोटीने मनोरी या गावात पोहोचता येते. हा सफर अगदी रंजक आहे, अगदी मोजकी माणसे, बोटीचा प्रवास आणि ऐका अनोख्या गावात प्रवेश. इथे बहुतेक कोळी समाजाची माणसे राहतात, मुख्य व्यवसाय माशेमारी, शेती, आणि आता गरजेनुसार रिसॉर्ट हा व्यवसाय फोफावताना दिसतो आहे. मनोरी गावातून मठाला जाण्यासाठी 1 किलोमीटर चालत रस्त्याने किंवा रिक्षाने जाऊ शकता. हा सगळा परिसर जंगल सदृश्य आहे त्यामुळे उन्हाचा त्रास होत नाही. मठात पोहचताच तिथे मोफत गाडी पार्किंगची व्यवस्था आहे, एक छोटे हॉटेल देखील आहे, चहा नाश्ता उपलब्ध होऊ शकतो. मठातील ऐका जागेवर गगनगिरी महाराजांची मोठी प्रतिमा स्थापन केलेली आहे, इथे त्यांची पूजा अर्चना केली जाते. समोरच. हवन कुंड आहे, इथे सत्संग आणि हवन नियमित होत असते. आज मात्र फक्त आम्...