श्री गगनगिरी महाराज मठ, मनोरी

नमस्कार मंडळी,


आजची सफर एक अध्यात्मिक स्थानाला भेट देण्यासाठी आखली होती, श्री गगनगिरी महाराज मठ, मनोरी हे गाव तसे मुंबई जवळचेच आहे पण सोयी सुविधांपासून आणि शहरिकरणा पसून अजून अवगत झाले नाही. कारण ह्या गावाला पोहोचण्यासाठी रस्त्यानं भाईंदर येथून जाता येते पण ते सोयीस्कर होत नाही, मालाड इथून मर्वे समुद्र किनारा इथून बोटीने मनोरी या गावात पोहोचता येते.


हा सफर अगदी रंजक आहे, अगदी मोजकी माणसे, बोटीचा प्रवास आणि ऐका अनोख्या गावात प्रवेश.


इथे बहुतेक कोळी समाजाची माणसे राहतात, मुख्य व्यवसाय माशेमारी, शेती, आणि आता गरजेनुसार रिसॉर्ट हा व्यवसाय फोफावताना दिसतो आहे.


मनोरी गावातून मठाला जाण्यासाठी 1 किलोमीटर चालत रस्त्याने किंवा रिक्षाने जाऊ शकता.


हा सगळा परिसर जंगल सदृश्य आहे त्यामुळे उन्हाचा त्रास होत नाही.


मठात पोहचताच तिथे मोफत गाडी पार्किंगची व्यवस्था आहे, एक छोटे हॉटेल देखील आहे, चहा नाश्ता उपलब्ध होऊ शकतो.


मठातील ऐका जागेवर गगनगिरी महाराजांची मोठी प्रतिमा स्थापन केलेली आहे, इथे त्यांची पूजा अर्चना केली जाते. समोरच. हवन कुंड आहे, इथे सत्संग आणि हवन नियमित होत असते. आज मात्र फक्त आम्ही दोघच इथे होतो.


मग आम्ही हनुमान मंदिराकडे गेलो, हे एक घनदाट जंगल आहे, विविध पक्षी किलबिलाट करत असतात. इथे शहरी गडबड गोंधळ नाही म्हणून की काय पक्ष्याचा आवाज अशी स्पष्ट कानावर पडतो.


वाटेतच समोर अथांग असा समुद्र किनारा दिसतो, इथे पण कोणीच नाही, जणू खाजगी जागा असावी असा आभास होत होता.


हनुमान मंदिर एका टेकडीवर आहे, थोडे दूरवर पसरलेले आहे पण इथे पोहोचल्यावर संपूर्ण मठाचा परिसर दृष्टिक्षेपात येतो.


पुढे आम्ही दत्त मंदिराकडे वळलो, इथे भाली मोठी दत्त मूर्ती आहे, मंदिर बंद होता होता दर्शन झाले, प्रसाद मिळाला, मन प्रसन्न झाले.


पुढे आम्ही एकवीरा देवी मंदिरकढे निघालो, मंदिर छोटेखानी आहे पण सुंदर आहे, मंदिर मागे परत एकदा विस्तृत असा समुद्र किनारा दिसतो. आम्ही दर्शन घेतले आणि परतीचा प्रवास चालू केला. पण घराकडे निघत नव्हते. वाटत होते इथेच बसून ध्यान साधना करावी.


असो, पक्का मुंबईकर, थोडक्यात गोडी, लागलीच परत फिरलो आणि परत एकदा छोटेखानी बोटीचा प्रवास केला.


ह्या प्रवासाचा विहंगम असा व्हिडिओ आपल्यासाठी बनवला आहे तो बघून घ्या आणि ह्या आध्यात्मिक जागेला जरूर भेट द्या.



YouTube Video Link:

https://youtu.be/CVb14zQM_wU



ही फिरस्तीची मोहीम आखताना मी भरपूर ट्रेकर मंडळींशी सल्ला मसलत केली होती आणि त्यांनी दिलेल्या माहितीमुळे आम्हाला भरपूर फायदा झाला, त्यांचे विशेष आभार.


जर आपल्याला असे विविधतेने नटलेले किंवा विशेष सहलीची ठिकाण, धबधबे, गुहा लेण्या, किल्ले, ट्रेक, hike किंवा मंदिरांची माहिती असेल तर आम्हाला जरूर कळवा, आम्हाला जरूर आवडेल भेट द्यायला.


मला अपेक्षा आहे आपल्याला माझा अनुभव लेख स्वरुपात आपणाला आवडला असेल. सोबत फोटो फेसबूक लिंक वर ऊपलब्ध आहेत, तरीपण आपणास सध्य परिस्थिती अनुभवायची असेल तर वरील दिलेल्या YouTube लिंकला नक्की क्लिक करून व्हिडिओ पहा, जर व्हीडिओ आवडला तर लाल सबस्क्राइब बटन दाबा, सोबत असलेल्या घंटेला क्लिक करून All हे बटन दाबा म्हणजे आमचे नियमित येणारे व्हिडिओ आपणास पाहण्यासाठी उपलब्ध होतील ते ही काहीही किंमत न मोजता.


WhatsApp Channel Link:

https://whatsapp.com/channel/0029Va9hK5r9xVJnXYQ6yh3L


आपल्याला जर श्री गजानन महाराजांबद्दल जास्त माहिती हवी असेल तर आमचा खोपोली येथील मठाचा व्हिडिओ जरूर बघून घ्या, लिंक खालील प्रमाणे

https://youtu.be/00fYEpc2HHI


Facebook page Simple Lifestyle Vlogs:

https://www.facebook.com/simplelifestylevlogs?mibextid=ZbWKwL


Borivali Hikers:

https://facebook.com/groups/509955217958785/


Instagram:

https://www.instagram.com/simplelifestyle.vlogs/


TTMM Simple Lifestyle Vlogs Facebook Group: https://facebook.com/groups/496676889311754/


माझे सगळे लिखाण Blog स्वरूपात: https://simplelifestylevlogs.blogspot.com/ 


Whatsapp Number: Nine Nine Six Seven One Five Two Nine Three Eight 99:67:1 5:29:38


जर आपल्याला या जागेची अधिक माहिती हवी असल्यास वरील नंबर वर WhatsApp मेसेज करा. 


आपण आमच्या TTMM (कमीत कमी खर्च आणि भरपूर भ्रमंती) या मोफत उपक्रमात सहभागी होऊ इच्छित असाल तर मग दिलेल्या फोन नंबर वर WhatsApp मेसेज करा. फोन करू नका तो DND वर आहे, कोणीही फोन उचलणार नाही ह्याची नोंद घ्यावी. आमचे TTMM वर आधारित भरपूर व्हिडिओ YouTube Playlist वर उपलब्ध आहेत, ते लवकरच बघून घ्या आणि आमच्या फिरस्ती मध्ये सामील व्हा. आम्ही कोणतीही किंमत आकारात नाही ह्याची नोंद घ्या.


आमची टी टी एम एम ट्रेक बद्दलची संकल्पना समजून घेण्यासाठी खालील व्हिडिओ लिंकला क्लिक करून संपुर्ण माहिती मिळवा.

TTMM concept episode link: https://youtu.be/uiUPdLNxjBY


जर आपण स्वतः काही TTMM ट्रेक करत असाल तर मला WhatsApp मेसेज वर कळवा, माझे वेळेचे गणित जुळल्यास मला तुमच्या सोबत सहभाग घ्ययला आवडेल.


कळावे लोभ असावा,

आपलाच मित्र,

सिद्धेश पाटील

Simple Lifestyle Vlogs

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

एक अनवट वाट तांदूळवाडी गडाची

भला मोठा तांदूळवाडी / लालठाणे धबधबा, तांदूळवाडी गाडाखाली, सफाळे

OFFBEAT Trekers ने TTMM तत्वावर आयोजित केलेली नाणेघाट ते भीमाशंकर ७० Km मधील पहिला टप्पा नाणेघाट ते आंबोली