"दुर्गदुर्गेश्वर श्रीमान रायगड परिक्रमा" छत्रपती शिवाजी महाराजांना दिलेली अनोखी मानवंदना

"दुर्गदुर्गेश्वर श्रीमान रायगड परिक्रमा" छत्रपती शिवाजी महाराजांना दिलेली अनोखी मानवंदना


नमस्कार मंडळी,


रायगड परिक्रमा ही भरपूर ट्रेकर मित्रांच्या अनुभवातून समजली होती, पण ती करण्याचा योग येत नव्हता, शेवटी आमचे ट्रेकर मित्र श्री शरद बचूटे यांनी एक दिवस सकाळी सकाळी फोन केला, STF ने रायगड परिक्रमा मोहीम आखली आहे, मी लगेच तारीख बघितली आणि घरातून अनुमती घेतली, कारण या मोहिमेसाठी जवळ जवळ 24 तास लागणार होते, मुंबई ते मुंबई असे.


STF हा ग्रुप माझ्यासाठी नवीन होता, नाव भरपूर गाजलेले पण, कोण आयोजित करतो, कसे संपर्क करायचे हे माहिती नव्हते, शेवटी श्री संदीप कुथवळ यांच्याशी संपर्क केला आणि मोहीमेला येतो हे कन्फर्म केले. तसे संदीप सरांबरोबर आधी एक ट्रेक झाला होता, पण तसा परिचय मोजकाच होता,असो.


पुढे जायचे कसे, कुठे भेटायाचे हे गणित जुळत नव्हते, तेव्हा STF ने ठरवलेला मीटिंग पॉइंट हा निजामपूर गावातून जात होते, माणगाव पुढे 10 किलोमीटर.


ट्रेकर मंडळींनी भरपूर शोधाशोध करून सांगितले की बोरिवली ते उंबरडी एसटी बस आहे, रात्री 12 वाजता ती सकाळी 6-7 दरम्यान निजामपूर गाठेल.


मुंबई वरून आम्ही तीन जण होतो, एसटी तिकीट आरक्षित केले म्हणून बरे झाले, अन्यथा लोक उभे राहून पण प्रवास करत होते.


सकाळी वेळेत आम्ही निजामपूर फाटा इथे 6-6.30 पोहोचलो, पुण्यावरून येणारी बस लेट झाली ते 8 वाजेपर्यंत आले.


साधारण 5 बस भरून 250 जण या मोहिमेसाठी आले होते. आम्ही पाचाड इथे पोहोचलो, सगळ्या सूचना ट्रेक लीडरानी दिल्या.


आम्ही जवळच असलेला चीत दरवाजा गाठला, पहिल्या पायरीचे पूजन केले, महाराजांच्या प्रतिमेचे पूजन केले, हार फुले अर्पण केली, गुलाल उधळला, मोहिमेच्या सुखरूप पणासाठी नारळ फोडला, गोड धोड म्हणून पेढे पण खाल्ले आणि महाराजांच्या जयघोषात मोहिमेला सुरुवात केली. वातावरण प्रसन्न होते, मोहिमेला वयोवृद्ध पुरुष आणि स्त्रिया जास्त प्रमाणात होते, त्यांची ऊर्जा बघून छान वाटले.


मोहीम सुरू केली तेव्हा गर्द झाडी होते, असाच प्रवास चालू ठेवला तेव्हा पुढे धनगरांची गाढव दिसली, मस्त रांगिबे रंगी रंगाने माखवली होती. पुढे एक छोटे गाव जिथे 4-5 झोपड्या दिसल्या, आणि त्यापुढे गुरांसाठी चाऱ्याचा बंदोबस्त मचाणीवर केलेला दिसला, पण माणूस नावाला पण दिसला नाही. विहीर नाही, तळे नाही, तेव्हाच कळले की पुढील रस्ता निर्मनुष्य असणार.


जंगल दाट होते, पक्षी संपदा भरपूर होती, पक्षांचा कल्ला चालू होता, 10 वाजले होते पण खाली अंधार होता.


थोडे दूर गेल्यावर शेत लागतात, आणि मोकळे माळरान लागते, तिथून रायगड तटबंदी दिसते, या संपूर्ण परिक्रमेत रायगड हा आपल्या उजव्या बाजूला असतो आणि आपले मार्गक्रमण चालू असते.


थोडे पुढे चालल्यावर बरोबर टकमक टोका खाली, एक समाधी दिसते, ही रायनाक महार यांची आहे, त्यांना रायनाक महाराज असेही संबोधले जाते. यांच्या बद्दल भरपूर अफवा आहेत, की यांना टकमक टोकावरून मृत्युदंड दिला होता, पण ते चूक आहे, ते एक शूर वीर असे लढाऊ होते त्यांचा मृत्यू कावल्या बावल्या खिंडीत झाला होता, हा लिखित दस्तावेज त्यांच्या पूर्वजांकडून मिळाला आणि तो त्यांनी ASI कडे सुपूर्द केला आणि त्यांनी पण ह्या इतीहासिक पुराव्याच्या संदर्भ ग्राह्य धरला.


पुढे भरपूर तांगड तोड केली, सगळे जावळीचे खोरे, कटे कुटे होते, जंगली झाडे, फुले.


मध्येच वाटेत समोरील डोंगरात आम्हाला अंधुक अशी कावळ्या बावळ्या खिंड आणि लिंगण्याची झलक दिसली ती श्री सुरेंद्र दुगडं सरांनी अवगत करून दिली.


आमच्या बरोबर STF चे श्री सुरेंद्र दुगडं होते, त्यांनी आम्हाला जंगली वनस्पती यांची ओळख करून दिली.


तसे सगळे ट्रेकर मॅरॅथॉन म्हणून धावत होते, पण आम्ही थोडा वेळ काढला आणि या झाडांची माहिती घेतली. कारण ही झाडे आपल्याला नेहमी दिसतात पण त्यांची नावे, उपयोग काय हे माहिती नसते. आमच्या वेळ सार्थकी लागला.


पुढे वाघोली खिंड लागली, सपाट असणारी वाट हळू हळू चढ धरू लागली, चांगलीच दमछाक झाली, शेवटी शेवटी 70-80 अंशाचा चढ होता. जसे वर जात होतो, तसे झाडे विरळ आणि हवा गरम होत होती, दम लागत होता, आता दुपारचा 1 वाजला होता, उन अंगाला चटके देत होते. डोंगरातील ही वाट बारीक दगड गोटे आणि भुगा रेती यांनी भरली होती, पाय सरकत होते. ट्रेकिंगचे बूट पण फेल झाले होते. शेवटी कसे बसे वाघोली खिंडीच्या वरती पोहोचलो.


आम्ही सगळे थकलो होतो, एक मोठा ब्रेक घेतला, पणी पिले, थोडे खाऊन पण घेतले आणि लगेच खिंड उतरायला सुरुवात केली.


चढ लांब लचक होता तर उतरण फार कमी पल्ल्याची होती, उभी धोक अशी जबरदस्त घसरण होती, पाय भुगा रेती मुळे घसरत होते. पण हा पॅच लगेच संपला. पण एक त्रास होता, या भागात जंगल विरळ होते आणि हवा गरम, त्यात सूर्य डोक्यावर तळपत होता. पणी संपत आले होते.


जिथे सावली मिळेल तिथे थोडा वेळ विश्रांती, पणी आणि परत पायपीट सुरू. परत थोडा मोकळा भाग आला तिथे रायगडाचे दर्शन झाले, समोर काही सुंदर डोंगर होते ते ही दिसले.


शेवटचे 2 km उरले की रस्ता चालू होतो, उन्हाने जीव हैराण झाला होता, रस्त्यात लिंबू पाणी, मठ्ठा, कोकम सरबत असे जिन्नस गावकरी विकतात ते पिऊन पुढचा रस्ता धरला. आम्ही 3 वाजता ट्रेक संपवला, हा ट्रेक साधारण 12 km असा आहे.


शेवटी रायगड प्रदक्षिणा पूर्ण केली, आणि पार्किंग लॉट मध्ये पोहोचलो. तिथे STF ची टीम स्वागतासाठी तयारच होती, मस्त मठ्ठा, बुंदी, आणि चितळे यांची बाकरवडी असा जिन्नस उपलब्ध होता, त्यात मठ्ठा अनलिमिटेड होता म्हणजे सोने पे सुहागा.


ट्रेक संपल्यावर बहुदा घरी पोहोचलो की, 1-2 लिटर मठ्ठा, लिंबू सरबत, किंवा कोकम सरबत हाणायचे आणि बॅगा खाली करून, अंघोळ करून झोपून द्यायचे ही आमची सगळ्यांची नियमित सवयच आहे, ट्रेक वर असलो की भरपूर पाणी आणि कमी खाणे हा जालीम हातखंडा आम्ही सगळे पाळतो.


मंडळी, रायगड परिक्रमा ही छान फोटो फ्रेम किंवा नजारे बघण्यासाठी मुळीच नाही, हा विषय आहे गंभीर, ज्या महाराजांनी हातात काही नसताना बालपणी स्वराज्य हे स्वप्न बघीतले, अस्तित्वात आणले आणि आपले हिंदुत्व, कणखर लढाया आणि चाणाक्ष हुशारीने टिकविले, त्यांच्या कर्तव्याला सलाम आणि मनाचा मुजरा करण्यासाठी करावी असे माझे मत आहे.


🚩जय शिवराय🚩


STF बरोबर रायगड प्रदक्षिणा झालेला प्रवास खर्च

लोकल बस एसटी डेपो ५

एसटी बोरिवली ते निजामपूर२६५

STF ताक बाकरवडी ५०

निजामपूर ते माणगाव ३०

माणगाव ते पनवेल १५०

लोकल बस घरी परतीचे ५

एकूण रुपये ५०५/-


परतीचा प्रवास पाचाड ते निजामपूर STF बस बरोबर केला, पुढे माणगाव पर्यंत शेअर रिक्षा आणि पुढे लालपरी, असा सगळा 25 तासांचा कणखर प्रवास झाला.


STF ने पुण्याकडून येणाऱ्या मंडळीनसाठी बस केली होती त्याचे 400 रुपये आकारले होते, मुंबई कडून येणाऱ्या मंडळीन कडून एक रुपया देखील मोहीम खर्च म्हणून घेतला नाही हे विशेष आणि त्यांचे आभार.


हा आमचा भटकंती रुपी अनुभव आपण व्हिडिओ स्वरूपात मांडत आहोत, तो नक्की बघुनं घ्या आणि आपला अभिप्राय कमेंट मध्ये नक्की कळवावा ही विनंती.


YouTube Video Link:

दुर्गदुर्गेश्वर श्रीमान रायगड परिक्रमा: https://www.youtube.com/playlist?list=PL_bA5qimfsWgYDCrIy-xpek_4BeM6KleP



ही फिरस्तीची मोहीम आखताना मी भरपूर ट्रेकर मंडळींशी सल्ला मसलत केली होती आणि त्यांनी दिलेल्या माहितीमुळे आम्हाला भरपूर फायदा झाला, त्यांचे विशेष आभार.


जर आपल्याला असे विविधतेने नटलेले किंवा विशेष सहलीची ठिकाण, धबधबे, गुहा लेण्या, किल्ले, ट्रेक, hike किंवा मंदिरांची माहिती असेल तर आम्हाला जरूर कळवा, आम्हाला जरूर आवडेल भेट द्यायला.


मला अपेक्षा आहे आपल्याला माझा अनुभव लेख स्वरुपात आपणाला आवडला असेल. सोबत फोटो फेसबूक लिंक वर ऊपलब्ध आहेत, तरीपण आपणास सध्य परिस्थिती अनुभवायची असेल तर वरील दिलेल्या YouTube लिंकला नक्की क्लिक करून व्हिडिओ पहा, जर व्हीडिओ आवडला तर लाल सबस्क्राइब बटन दाबा, सोबत असलेल्या घंटेला क्लिक करून All हे बटन दाबा म्हणजे आमचे नियमित येणारे व्हिडिओ आपणास पाहण्यासाठी उपलब्ध होतील ते ही काहीही किंमत न मोजता.


WhatsApp Channel Link:

https://whatsapp.com/channel/0029Va9hK5r9xVJnXYQ6yh3L


Facebook page Simple Lifestyle Vlogs:

https://www.facebook.com/simplelifestylevlogs?mibextid=ZbWKwL


Borivali Hikers:

https://facebook.com/groups/509955217958785/


Instagram:

https://www.instagram.com/simplelifestyle.vlogs/


TTMM Simple Lifestyle Vlogs Facebook Group: https://facebook.com/groups/496676889311754/


माझे सगळे लिखाण Blog स्वरूपात: https://simplelifestylevlogs.blogspot.com/ 


Whatsapp Number: Nine Nine Six Seven One Five Two Nine Three Eight 99:67:1 5:29:38


जर आपल्याला या जागेची अधिक माहिती हवी असल्यास वरील नंबर वर WhatsApp मेसेज करा. 


आपण आमच्या TTMM (कमीत कमी खर्च आणि भरपूर भ्रमंती) या मोफत उपक्रमात सहभागी होऊ इच्छित असाल तर मग दिलेल्या फोन नंबर वर WhatsApp मेसेज करा. फोन करू नका तो DND वर आहे, कोणीही फोन उचलणार नाही ह्याची नोंद घ्यावी. आमचे TTMM वर आधारित भरपूर व्हिडिओ YouTube Playlist वर उपलब्ध आहेत, ते लवकरच बघून घ्या आणि आमच्या फिरस्ती मध्ये सामील व्हा. आम्ही कोणतीही किंमत आकारात नाही ह्याची नोंद घ्या.


आमची टी टी एम एम ट्रेक बद्दलची संकल्पना समजून घेण्यासाठी खालील व्हिडिओ लिंकला क्लिक करून संपुर्ण माहिती मिळवा.

TTMM concept episode link: https://youtu.be/uiUPdLNxjBY


जर आपण स्वतः काही TTMM ट्रेक करत असाल तर मला WhatsApp मेसेज वर कळवा, माझे वेळेचे गणित जुळल्यास मला तुमच्या सोबत सहभाग घ्ययला आवडेल.


कळावे लोभ असावा,

आपलाच मित्र,

सिद्धेश पाटील

Simple Lifestyle Vlogs

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

एक अनवट वाट तांदूळवाडी गडाची

भला मोठा तांदूळवाडी / लालठाणे धबधबा, तांदूळवाडी गाडाखाली, सफाळे

OFFBEAT Trekers ने TTMM तत्वावर आयोजित केलेली नाणेघाट ते भीमाशंकर ७० Km मधील पहिला टप्पा नाणेघाट ते आंबोली