गावाळी म्हणजे काय ?
गावाळी म्हणजे काय ? गावाळी म्हणजे उत्तर कोकणातील प्रचलित प्रथा, गावदेवीचा उत्सव, मटणाचा प्रसाद, "केळवा-माहीम" ह्या विषयाचा एकही व्हिडिओ यूट्यूब वर किंवा माहिती फेसबुकवर उपलब्ध नाही म्हणून व्हिडिओ जरूर बघा आणि मजकूर पण नक्की वाचा. उत्तर कोकणातील एक प्रचलित प्रथा, जी अनादी काळापासून चालत आली आहे, काही गावांत अजून मोजक्या उत्साही प्रतिनिधींनी जिवंत ठेवली आहे तर काही निरुत्साही गावांत मृत झाली आहे. ह्या प्रथेत अंधश्रद्धा वैगरे काही नाही. आपण जे बकरे खाटीकाकडून कापून घेतो ते न कापता आपल्या गावातील ग्राम देवतेपुढे कापतो, एवढाच काय तो फरक. इथे कोणाचा जोर नाही, कुणाची जबरदस्ती नाही, ज्याला पटेल त्यानी यावे आणि ज्याला पटत नाही त्यांनी या उत्सवात भाग घेऊ नये हा साधा नियम. प्रत्येक गावाला ग्रामदैवत लाभलेले असते. काही गावात मोठी मंदिर तयार झाली आहेत. या ग्रामदेवतेची वर्षानुवर्ष पूजा करणे, सेवा करणे अशी कामे गावातील प्रमुख कुटुंबाकडे सोपवली आहेत. बहुतेक करून गावातील पाटीलच यांचा मान बाळगत आले आहेत, म्हणून या देवाच्या आजूबाजूची जमीन या कुटुंबाला दिलेली असते. जेणेकरून त्यांनी ती कसून पीक घ्...