गावाळी म्हणजे काय ?
गावाळी म्हणजे काय ?
गावाळी म्हणजे उत्तर कोकणातील प्रचलित प्रथा, गावदेवीचा उत्सव, मटणाचा प्रसाद, "केळवा-माहीम"
ह्या विषयाचा एकही व्हिडिओ यूट्यूब वर किंवा माहिती फेसबुकवर उपलब्ध नाही म्हणून व्हिडिओ जरूर बघा आणि मजकूर पण नक्की वाचा.
उत्तर कोकणातील एक प्रचलित प्रथा, जी अनादी काळापासून चालत आली आहे, काही गावांत अजून मोजक्या उत्साही प्रतिनिधींनी जिवंत ठेवली आहे तर काही निरुत्साही गावांत मृत झाली आहे. ह्या प्रथेत अंधश्रद्धा वैगरे काही नाही. आपण जे बकरे खाटीकाकडून कापून घेतो ते न कापता आपल्या गावातील ग्राम देवतेपुढे कापतो, एवढाच काय तो फरक. इथे कोणाचा जोर नाही, कुणाची जबरदस्ती नाही, ज्याला पटेल त्यानी यावे आणि ज्याला पटत नाही त्यांनी या उत्सवात भाग घेऊ नये हा साधा नियम.
प्रत्येक गावाला ग्रामदैवत लाभलेले असते. काही गावात मोठी मंदिर तयार झाली आहेत. या ग्रामदेवतेची वर्षानुवर्ष पूजा करणे, सेवा करणे अशी कामे गावातील प्रमुख कुटुंबाकडे सोपवली आहेत. बहुतेक करून गावातील पाटीलच यांचा मान बाळगत आले आहेत, म्हणून या देवाच्या आजूबाजूची जमीन या कुटुंबाला दिलेली असते. जेणेकरून त्यांनी ती कसून पीक घ्यायचे आणि त्याबदल्यात देवाची सेवा करायची. नंतर त्या देवाला वर्षातून एकदा बकऱ्याचा बळी द्यायचा. दसऱ्यापासून मे महिन्यापर्यंत आपापल्या गावाच्या प्रथेनुसार एक दिवस ठरवून त्या दिवशी पुरुष मंडळी पूजा करून बकऱ्याचा बळी देतात. पूर्वी पाटील कुटुंब किंवा ज्या कुटुंबाला हा मान मिळाला आहेत असे, ते बकरा कापून त्याचा प्रसाद वाटत असत. ही सर्व पूजा करणे व बकरा कापून मटण शिजवणे हे काम पुरूष मंडळी करत असत. जसजसा काळ बदलत गेला तसं कुटुंब वाढत गेली आणि सगळे कामात व्यस्त झाले म्हणून आत्ता गावकरी मंडळी वर्गणी काढून ही प्रथा टिकउन आहेत. पूर्वी पाच दहा रुपये पर्यंत अशी वर्गणी असे, हळू हळू बकऱ्याची किंमत वाढली तशी पन्नास-शंभर रुपये ते आत्ता तूर्त आठशे ते हजार रुपये पर्यंत वर्गणी काढू लागलेत. या वर्गणीतून बकरा खरेदी करून एकत्र शिजवला जाई व यानंतर हे मटण शिजल्यावर प्रत्येक घरी प्रसाद म्हणून वाटला जाई. काही गावात कच्चे मटण देण्याची प्रथा सुद्धा आहे. त्यासाठी प्रत्येक घरी एक वाटा याप्रमाणे केळीच्या पानात वाटे करून एकेक घरी देत असत. अजूनपण काही गावात ही प्रथा अशीच चालू आहे. या सर्व प्रथेला गावाळी, गाव हाळी, गाव्हाळी असे संबोधले जाते. म्हणतात ना की प्रत्येक 5 मैलावर आपली संस्कृती आणि भाषा बदलत जात असते त्याच प्रमाणे ऊच्चारात बदल घडत जातो.
गावाळी म्हटलं की सर्व नोकरीच्या निमित्ताने शहरात स्थलांतरित झालेले व्यक्ती, पुन्हा गावात येतात. एक आगळीक मज्जा असते, जुने मित्र मंडळी, ज्येष्ठ नागरिक, म्हाताऱ्या कोताऱ्या व्यक्तींचे दर्शन घडते, तोंड ओळख अबाधित राहते, नाहीतर आपल्याच गावात आपण पोरके होतो, म्हणूनच गावाचे गावपण टिकावे, ओळखी टाकाव्यात म्हणून केलेला हा खटाटोप.
गावागावाप्रमाणे प्रथा थोड्या वेगवेगळ्या असतीलही पण उद्देश मात्र एकच, गावातील सलोखा, नात्यातील गोडवा ओल्या मातीत टिकून रहावा हाच एक उद्देश.
ह्या उत्सव आपण व्हिडिओ स्वरूपात बंदिस्त केला आहे त्याचा जरूर आस्वाद घ्या. आपल्या गावातील काही प्रचलित रूढी प्रथा असतील त्या नक्की आम्हाला कॉमेंट करून कळवा.
YouTube Video Link:
https://youtu.be/CO9hblmw7Wg?si=wVTiwfn0AY64USRM
YouTube लिंकला नक्की क्लिक करून व्हिडिओ पहा, जर व्हीडिओ आवडला तर लाल सबस्क्राइब बटन दाबा, सोबत असलेल्या घंटेला क्लिक करून All हे बटन दाबा म्हणजे आमचे नियमित येणारे व्हिडिओ आपणास पाहण्यासाठी उपलब्ध होतील ते ही काहीही किंमत न मोजता.
WhatsApp Group Link:
https://chat.whatsapp.com/COawAF4287QA9KAvzJSEFI
WhatsApp Channel Link:
https://whatsapp.com/channel/0029Va9hK5r9xVJnXYQ6yh3L
Facebook page Simple Lifestyle Vlogs:
https://www.facebook.com/simplelifestylevlogs?mibextid=ZbWKwL
Borivali Hikers:
https://facebook.com/groups/509955217958785/
Instagram:
https://www.instagram.com/simplelifestyle.vlogs/
TTMM Simple Lifestyle Vlogs Facebook Group: https://facebook.com/groups/496676889311754/
माझे सगळे लिखाण Blog स्वरूपात: https://simplelifestylevlogs.blogspot.com/
Whatsapp Number: Nine Nine Six Seven One Five Two Nine Three Eight 99:67:1 5:29:38
जर आपल्याला या जागेची अधिक माहिती हवी असल्यास वरील नंबर वर WhatsApp मेसेज करा.
आपण आमच्या TTMM (कमीत कमी खर्च आणि भरपूर भ्रमंती) या मोफत उपक्रमात सहभागी होऊ इच्छित असाल तर मग दिलेल्या फोन नंबर वर WhatsApp मेसेज करा. फोन करू नका तो DND वर आहे, कोणीही फोन उचलणार नाही ह्याची नोंद घ्यावी. आमचे TTMM वर आधारित भरपूर व्हिडिओ YouTube Playlist वर उपलब्ध आहेत, ते लवकरच बघून घ्या आणि आमच्या फिरस्ती मध्ये सामील व्हा. आम्ही कोणतीही किंमत आकारात नाही ह्याची नोंद घ्या.
आमची टी टी एम एम ट्रेक बद्दलची संकल्पना समजून घेण्यासाठी खालील व्हिडिओ लिंकला क्लिक करून संपुर्ण माहिती मिळवा.
TTMM concept episode link: https://youtu.be/uiUPdLNxjBY
जर आपण स्वतः काही TTMM ट्रेक करत असाल तर मला WhatsApp मेसेज वर कळवा, माझे वेळेचे गणित जुळल्यास मला तुमच्या सोबत सहभाग घ्ययला आवडेल.
कळावे लोभ असावा,
आपलाच मित्र,
सिद्धेश पाटील
Simple Lifestyle Vlogs
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा