घोडे पाणी नाळ आणि रिठ्याचे दार हे सह्याद्री पर्वत रांगेतील अत्यंत कठीण श्रेणीतील असे कोकण आणि देश यांना जोडणारी घाट वाट

नमस्कार मंडळी,


मी घोडे पाणी नाळ ह्या जागेचे भरपूर फोटो आणि व्हिडिओ बघितले होते, ह्या ठिकाणावर जायची ईच्छा होती, पण मुंबईतून या जागी जाणारी ट्रेकर मंडळी फार कमी.


मनात असंख्य ईच्छा आहेत, भरपूर किल्ले घाट वाटा यांचा अभ्यास झाला पण वेळेचे गणित जुळून येत नाही, म्हणून जाताच येत नाही.


काही घाट वाटा किंवा किल्ले असे असतात की जर संधी मिळाली तर ती हुकउ नये, आणि काहीपण करून आलेल्या संधीचा पुरेपूर फायदा करून घ्यायचा हे मनात ठरवलेलं, अशातूनच घोडे पाणी नाळ या घाट वाटेचे ऑफबीट ट्रेकर्स पुणे येथील संस्था प्रयोजन करत होती. मी पण नक्की केले की ही घाट वाट करायचीच. पण एकच समस्या होतो मुंबईतून कसे पोहोचायचे, कारण ट्रेक सकाळी 6 वाजता चालू करायचा होता आणि त्या जागी सार्वजनिक वाहन जात नाही.


मग काय मुंबईच्या माहिती असलेल्या ट्रेकिंग ग्रुप वर विचारले पण कोणी तयार झाले नाही.


आत्ता होती पंचाईत, मग ठरवले आपणच मुंबईतून कार घेऊंन निघावे पण मग कल्याण येथील Dr सुभाष पाठारी तयार झाले आणि त्यांच्याच गाडीतून कल्याण वरून रात्री प्रवास चालू केला.


नियोजित टोकावडे गावी आम्ही रात्रीच पोहोचलो, पण पुण्याकडून येणारी मंडळी पोहोचली नव्हती, मग आम्ही वाटेत एक हॉटेल बघून गाडी पार्क करून पुण्याच्या मंडळींची वाट बघत होतो.


शेवटी उशिरा पुण्याची मंडळी आली, आम्ही पुढचा प्रवास चालू केला, रात्री काळा कुट्ट अंधार होता आणि रस्त्यात कोणतेही दुकान किंवा हॉटेल नव्हते मग रस्ता शोधणे फार कठीण होऊन बसले होते.


आम्हाला सिंगापूर गावातील खंडोबा मंदिरात पोहोचायचे होते ते भरपूर शोध घेतल्या नंतर भेटले. हे मंदिर गूगल मॅप वर उपलब्ध नव्हते मग मी ते मॅप वर टाकले आणि नोट पण लिहिली की हे घोडे पाणी नाळ हा ट्रेक सुरु करण्याचे हे ठिकाण आहे. आत्ता तुम्ही त्याचा वापर करून तिकडे पोहोचू शकता.


आम्ही तिकडे पहाटे 4-5 दरम्यान पोहोचलो होतो मग एक छोटी झोप काढली आणि प्रात:विधी उरकून सकाळी 6 वाजता ट्रेकला सुरुवात केली.


सुरुवातीचा रस्ता एका गावातून जातो आणि लगेच गर्द अशा जंगलातून पुढे सरकतो. सकाळी डोंगर माथ्यावरून फार जोरात थंड हवा वाहत होती. वाटेत असंख्य पक्षी किलबिल करत होते. झरे झुळ झुळं वाहत होते. लगेचच आम्ही दोन डोंगरांच्या मधील नाळेत पोहोचलो. इथ पर्यंत सूर्याची किरणे पण पोहोचत नव्हती एवढी उंच आणि गर्द झाडे होती.


जसे पुढे जात होतो तशी वाट दुर्गम अती दुर्गम होत चालली होती. सरळ जाणारी वाट आता नागमोडी झाली होती आणि पावले दगड धोंड्यात आपटू लागले होते.


थोडे अजून चालल्या नंतर आपला प्रत्येक पाय एक फूट वर उचलून चालवा लागतो, आता चांगलाच चढ चालू झाला होतो, आम्ही सकाळपासून सतत न थकता आणि न थांबता चालत होतो. अधून मधून थोडे पाणी पित होतो.


शेवटी थोड्या वेळा नंतर आम्ही पहिला ब्रेक घेलता आणि नाश्ता केला. रस्त्यात झरे आणि पाणी उपलब्ध होते त्याचा फायदा होत होता. वातावरण थंड होते. मिळेल तिथे पाणी भरून घेत होतो. झऱ्याचे पणी नितळ आणि शुद्ध होते, त्याची चव काही निराळीच होती.


आत्ता आम्ही अर्ध्यावर पोहोचलो होतो एव्हाना  आम्हाला मागच्या डोंगरावरील बाहुला बाहुली सुळका दिसू लागले होते. जसं जसे आम्ही वर चढत होतो तसे विहंगम दृश्य पाहून मन भारावून जात होते, क्षीण दूर होत होता.


आता चढ अजूनच भारी होत चालला होतो, अधून मधून पाच ते दहा फूट सरळसोट उंच कडे लागत होते. त्यात काही एवढे सरळ होते की चढणे मुश्किल होत होते. कसे बसे हे अडथळे पण आम्ही दूर केले पण डोंगर माथा अद्यापि दूरच होता. जेवढे वर चढलो तेवढेच अजून चढणे बाकी होते. आता आमची शक्ती पणाला लागली होती. आम्ही हळू हळू एक एक पावले टाकत वर चढत चाललो होतो. बोलण्याची आणि काही खाण्या पिण्याची ईच्छा नव्हती. दर चार पवलानी आम्ही 10 फूट वर चढत चाललो होतो. वाट दुर्धर होती पण ती पूर्ण करायची होती, मध्यावर सोडवत नव्हती पण आमची चाल कायम चालू होती.


सरते शेवटी आम्ही ती जागा गाठली जिथून हळू हळू करून ऐका मागोमाग वानर लिंगी सुळका, जीवधन किल्ला आणि पुढील नानाचा अंगठा असे विहंगम दृश्य दिसायला सुरुवात झाली आणि शेवटी त्या मोठाल्या दगडा वरून आम्ही फोटो काढून घेतले, केलेल्या मेहनतीचे चीज झाले.


जास्त वेळ न दवडता आम्ही पुढचा प्रवास चालू केला, अजून पाव डोंगर बाकी होता, माथा सर करायला. आता पुढे कारवी चालू झाली होती. पण चढ 70-80 अंश कोनात चालू होता, मोठे दगड संपून भुसा रेती आणि ठिसूळ दगड चालू झाला होता.


कसेबसे सगळी ताकत एकवटून आम्ही डोंगर माथा सर केला पण इथून खालचे काहीच दृश्य दिसत नव्हते.


मग आम्ही रिठ्याचे दार हा डोंगर शोधून काढला, कारण सगळ्या वाटा गर्द झाडीने झाकला होता पायवाट बुंदली होती.


रिठ्याच्या दारातून परत एकदा विहंगम दृश्य दिसायला सुरुवात होते.


आत्ता दुपारचे 11.30 वाजले असावेत, आम्ही जेऊन घेतले. थोडा आराम केला आणि लगेचच उतार चालू केला, कारण अंधार पडायच्या आधी गावात पोहोचायचे होते.


जसा चढ टप्प्या टप्प्याने वाढत गेला होता तसाच उतार पण टप्प्यांत कमी होत गेला.


सरते शेवटी आम्ही संध्याकाळी 5 दरम्यान ट्रेक पूर्ण केला.


हा ट्रेक उन्हाळ्यात आणि पावसात टाळावा असे माझे मत आहे.

4-5 लिटर पाणी आणि भरपूर फळे घेऊन जावीत त्यामुळे त्रास होणार नाही.

ही जागा असंख्य वन्य प्राणी आणि पक्षी यांनी भरलेली आहे त्यामुळे एकटे दुकटे या ट्रेक वर जाऊ नका.

गाईड घेऊन जाणे अनिवार्य ठरेल.


असो, आपण हा व्हिडिओ एका वेगळ्याच दृष्टीकोनातून (Bird Eye and POV Prespective मधून) चित्रित केला आहे, त्यामुळे जरूर बघून घ्या आणि कसा वाटला तो अभिप्राय कळवा.


YouTube Video Link:


घोडे पाणी नाळ https://youtu.be/dia9T7tbid4


रिठ्यचे दार

https://youtu.be/mzfohdweDBM



ही फिरस्तीची मोहीम आखताना मी भरपूर ट्रेकर मंडळींशी सल्ला मसलत केली होती आणि त्यांनी दिलेल्या माहितीमुळे आम्हाला भरपूर फायदा झाला, त्यांचे विशेष आभार.


जर आपल्याला असे विविधतेने नटलेले किंवा विशेष सहलीची ठिकाण, धबधबे, गुहा लेण्या, किल्ले, ट्रेक, hike किंवा मंदिरांची माहिती असेल तर आम्हाला जरूर कळवा, आम्हाला जरूर आवडेल भेट द्यायला.


मला अपेक्षा आहे आपल्याला माझा अनुभव लेख स्वरुपात आपणाला आवडला असेल. सोबत फोटो फेसबूक लिंक वर ऊपलब्ध आहेत, तरीपण आपणास सध्य परिस्थिती अनुभवायची असेल तर वरील दिलेल्या YouTube लिंकला नक्की क्लिक करून व्हिडिओ पहा, जर व्हीडिओ आवडला तर लाल सबस्क्राइब बटन दाबा, सोबत असलेल्या घंटेला क्लिक करून All हे बटन दाबा म्हणजे आमचे नियमित येणारे व्हिडिओ आपणास पाहण्यासाठी उपलब्ध होतील ते ही काहीही किंमत न मोजता.


WhatsApp Channel Link:

https://whatsapp.com/channel/0029Va9hK5r9xVJnXYQ6yh3L


Facebook page Simple Lifestyle Vlogs:

https://www.facebook.com/simplelifestylevlogs?mibextid=ZbWKwL


Borivali Hikers:

https://facebook.com/groups/509955217958785/


Instagram:

https://www.instagram.com/simplelifestyle.vlogs/


TTMM Simple Lifestyle Vlogs Facebook Group: https://facebook.com/groups/496676889311754/


माझे सगळे लिखाण Blog स्वरूपात: https://simplelifestylevlogs.blogspot.com/ 


Whatsapp Number: Nine Nine Six Seven One Five Two Nine Three Eight 99:67:1 5:29:38


जर आपल्याला या जागेची अधिक माहिती हवी असल्यास वरील नंबर वर WhatsApp मेसेज करा. 


आपण आमच्या TTMM (कमीत कमी खर्च आणि भरपूर भ्रमंती) या मोफत उपक्रमात सहभागी होऊ इच्छित असाल तर मग दिलेल्या फोन नंबर वर WhatsApp मेसेज करा. फोन करू नका तो DND वर आहे, कोणीही फोन उचलणार नाही ह्याची नोंद घ्यावी. आमचे TTMM वर आधारित भरपूर व्हिडिओ YouTube Playlist वर उपलब्ध आहेत, ते लवकरच बघून घ्या आणि आमच्या फिरस्ती मध्ये सामील व्हा. आम्ही कोणतीही किंमत आकारात नाही ह्याची नोंद घ्या.


आमची टी टी एम एम ट्रेक बद्दलची संकल्पना समजून घेण्यासाठी खालील व्हिडिओ लिंकला क्लिक करून संपुर्ण माहिती मिळवा.

TTMM concept episode link: https://youtu.be/uiUPdLNxjBY


जर आपण स्वतः काही TTMM ट्रेक करत असाल तर मला WhatsApp मेसेज वर कळवा, माझे वेळेचे गणित जुळल्यास मला तुमच्या सोबत सहभाग घ्ययला आवडेल.


कळावे लोभ असावा,

आपलाच मित्र,

सिद्धेश पाटील

Simple Lifestyle Vlogs

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

एक अनवट वाट तांदूळवाडी गडाची

भला मोठा तांदूळवाडी / लालठाणे धबधबा, तांदूळवाडी गाडाखाली, सफाळे

OFFBEAT Trekers ने TTMM तत्वावर आयोजित केलेली नाणेघाट ते भीमाशंकर ७० Km मधील पहिला टप्पा नाणेघाट ते आंबोली