आजची भटकंती आहे ती दुर्ग त्रिकुटांची माहुलीगड, भंडारगड आणि पळसगड.
नमस्कार मंडळी, आजची भटकंती आहे ती दुर्ग त्रिकुटांची माहुलीगड, भंडारगड आणि पळसगड. या ट्रेकचे आयोजन श्री दीपक शेळके यांनी "दुर्ग वाटाड्या" सफर सह्याद्रीची या पुण्याच्या संस्थेने केले होते. ते पुण्यावरून नेहमी प्रमाणे त्यांची 20-22 जणांची टीम घेऊन आले होते, आम्ही त्यांना मुंबईतून 6 आणि वसईतून 4 जणांनी जॉईन केले होते. बोरिवली वरून 3.50 ची पहिली लोकल आणि पुढे दादर वरून 4.37 ची कासाऱ्यची पहिली लोकल पकडुन आम्ही 6.30 पर्यंत आसनगाव इथे पोहोचलो. पुढे 250 रुपये रिक्षाला ( रिक्षात 3 जण फक्त बसवतात) मोजून माहुली गडाच्या पायथ्याला असणाऱ्या माहुली गावात पोहोचलो. पुणे आणि वसई टीम पहाटे आले असल्यामुळे ते पुढे निघून गेले होते. आम्ही पण नाश्ता करून ट्रेक चालू केला, नाश्त्यासाठी भूमिका ढाबा 8766590580 यांना संपर्क करा. वाटेतच गडाच्या मुख्य प्रवेद्वराजवळ शाळेपुढे यांचे हॉटेल आहे. वन विभागाची माणशी 30 रुपये अशी पावती फाडली आणि ट्रेक चालू केला. पुढे संपूर्ण वाट मळलेली असल्याकारणाने काही चिंता नव्हती, अर्धा डोंगर गर्द झाडीने बहरलेला आहे त्यामुळे उन्हाचा त्रास पण नाही होत. डोंगराचा खडा चढ मग पठार मग...