गोरखगड एक थरारक अनुभव, 80°अंशातील कातळातील कोरीव पायऱ्या, 2137 फूट उंच असा टेहाळणीचा बुरुज.

गोरखगड एक थरारक अनुभव, 80°अंशातील कातळातील कोरीव पायऱ्या, 2137 फूट उंच असा टेहाळणीचा बुरुज.

गोरखगड किंवा गोरक्षगड असे नाव जरी असले तरी हा एक टेहाळणी साठी वापरला गेलेला बुरुज आहे. हा गड सातवाहन काळापासून घाट वाटांवर लक्ष ठेवण्यासाठी वापरला जात असे, प्रामुख्याने कोकण आणि सातवाहन कालीन राजधानी पैठण यांना जोडणारा दुआ जवळच असलेल्या नाणे घाटातूनच जात असे.

गडावर भग्न अशा भरपूर वास्तू आहेत पणं त्यातील प्रामुख्याने एक महादेव / शनी मंदिराची वास्तू विखुरलेल्या अवस्थेत आजही दिसते.

हा गड उंचीवर असल्याकारणाने गडावर भरपूर पाण्याच्या टाक्या आहेत जेणेकरून उन्हाळ्यात पण इथे पाणी उपलब्ध व्हावे म्हणून, बहुदा काही टाक्या अन्न धान्य साठवण्यासाठी, घाट वाटेतील कराचा खजिना ठेवण्यासाठी पण वापर करत असावे असा अंदाज आहे.

गडावर काही शिल्प, शिलालेख, आणि गडावर सर्वोच्च ठिकाणी जाण्यासाठी कातळात खोदलेल्या पायऱ्या अशा गोष्टी पण आहेत.

हा ट्रेक आम्ही सार्वजनिक वाहनाचा वापर करून केला होता, ट्रेकला येणाऱ्या सदस्य संख्या 10, या TTMM ट्रेकची आयोजन वडोदरा येथील गौरव वैशंपायन यांनी केले होते.

मी बोरिवली वरून पहाटेची पहिली लोकल पकडुन कल्याण इथे वेळेत पोहोचलो, पुढे मुरबाड पर्यंत एसटी उपलब्ध झाली, पण ती उशिरा आल्यामुळे पुढची देहरी गावातील एसटी निघून गेली होती, मग आम्ही शेरींग इको जी आम्हाला 500 रुपयात मिळाली ती घेऊन आम्ही देहरी गावात पोहोचलो. थंडी हलकेच चालू झाली होती. गोरख गडाच्या प्रवेशद्वारापर्यंत गाडी जाते आम्ही तिथेच उतरलो.

प्रवेश द्वाराजवळील विठ्ठल रखुमाई मंदिरात जाऊन दर्शन घेतले आणि ट्रेकला सुरुवात केली.

हा ट्रेक एक साधारण ते कठीण श्रेणीतील आहे, सुरुवातीला उभा चढ लागतो, दमछाक उडते. पण आजू बाजूची गर्द झाडी आणि पक्षी आपले लक्ष विचलित करते. घनदाट जंगलातून आपण मार्गक्रमण करत असतो. एक डोंगर, दोन डोंगर, तीन डोंगर असे कितीतरी डोंगर आपण पार करतो ते कळत पण नाही. मध्ये काही कठीण चढ आहेत तिथे सावधानतेने पाऊल टाकावे लागते.

सगळ्यात शेवटी आपण गोरख गडाच्या डोंगराच्या पायथ्याशी असणाऱ्या माळरानावर पोहोचलो, इथे सिद्धागडाची विहंगम दर्शन घडते.

पाठरापुढे एक भग्न अवस्थेतील शनी मंदिर दिसते, तिथे शिलालेख असल्याचा बोर्ड आहे पण झाड झुडपे वाढल्यामुळे कुठेही दृष्टी पथास पडत नाही.

थोडे पुढे गेल्यावर आपल्याला आहुपे घाट दिसायला सुरुवात होते. पुढे दुर्गादेवी कोकणकडा फार विस्तृतीत असा भाग दिसतो.

पुढे सगळ्या कातळा तील कोरीव पायऱ्या लागतात. कातळ कडा सरळसोट आहे बहुदा 80 ते 90 अंशामध्ये.

थोडे वर चढल्यावर गडाचे मुख्य आकर्षण असा गडाचे भक्कम असे प्रवेशद्वार दिसते, ते नुकतेच बसऊन घेतल्यासारखे भासते.

आपण जसे वर चढतो तशा उजवीकडे आणि डावीकडे पाण्याच्या टाक्या दिसायला सुरुवात होते.

परत कातळातील पायऱ्या लागतात आणि परत पाण्याच्या मोठ्या टाक्या दिसतात, गडाच्या डाव्या बाजूला पाण्याची टाकी आहे तिथे एका छोट्या गुहेत काही कोरीव शिल्प आहेत. गडाच्या उजव्या बाजूला भरपूर मोठी अशी गुहा आहे तिथे राहण्याची सोय होऊ शकते.

पुढे गडाच्या सर्वोच्च भागात जाण्यासाठी परत पायऱ्यांचा वापर करावा लागतो, हा चढ थोडा कठीण श्रेणीतील आहे.

सर्वात वरती एक छोटेखानी असे शंकराचे मंदिर आहे.

सगळी कसरत झाल्यावर आम्ही झाडाखाली बसलो आणि दुपारचे जेवण उरकून घेतले आणि परतीचा प्रवास केला.

गडावर थोडीफार माकडे आहेत त्याची नोंद घ्यावी, ते खाण्यासाठी आपल्याला त्रास देतात.

हा ट्रेक आम्ही TTMM तत्त्वावर केला होता, एकूण खर्च बोरिवली ते बोरिवली 240 रुपये झाला.

जर आपल्याला आमच्या TTMM ट्रेक ग्रुप मध्ये सामील व्हायचे असेल तर खालील लिंक क्लिक कारा.
https://chat.whatsapp.com/JUPpnS6ZYmg5KsPvxC3ltw

हा व्हिडिओ Insta 360 या कॅमेऱ्याने शूट केला आहे, त्याची व्हिडिओ ग्राफि GoPro कॅमेरा पेक्षा वेगळी असते, या व्हिडीओची लिंक पुढील प्रमणे देत आहे, जरूर बघून घ्या.
https://youtu.be/u5pzysCHfbs

गडाखाली राहण्याची सोय आहे त्याचा फोटो पोस्ट आणि व्हिडिओ मध्ये दिला आहे.

आपलाच,
सिद्धेश पाटील,
WhatsApp no 9967152938
Simple Lifestyle Vlogs
Borivali Hikers 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

एक अनवट वाट तांदूळवाडी गडाची

भला मोठा तांदूळवाडी / लालठाणे धबधबा, तांदूळवाडी गाडाखाली, सफाळे

OFFBEAT Trekers ने TTMM तत्वावर आयोजित केलेली नाणेघाट ते भीमाशंकर ७० Km मधील पहिला टप्पा नाणेघाट ते आंबोली