रतनगडावर कारवी फुलली, रतनगड एक डोंगर दऱ्यामधे भटकलेला पण शेवटी पूर्ण केलेला मुंबई-रतनवाडी-मुंबई २४ तासाचा खडतर प्रवास.

रतनगडावर कारवी फुलली, सोशल मीडियावर बरेचे फोटो आणि व्हिडिओ बघून मनाला आवर घालता येत नव्हता, कारण ती कारवीच्यां फुलांची ओढ लागली होती. पाऊसाची रिपरिप सतत होती तब्बल २ महिने घरात बसून घालवले. शारीरिक कुवत अभादित राहण्या साठी सायकल, मॉर्निंग वॉक सारखे प्रकार केले पण मजा नाही, शेवटी सह्याद्री चे वेड लागलेला माणूस त्याचा घास मोठा झाला आहे, असो पावसाच्या त्रासाला कंटाळून सगळे प्लॅन कॅन्सल केले होते. मागच्या हप्त्यात सुधा शनिवारी तयारी केली आणि दिवसभर पाऊस पडला म्हणून प्लॅन कॅन्सल केला आणि रविवारी मस्त उन पडले होते. प्लॅन होता २ दिवसाचा रतनगड आणि हरिश्चंद्रगड पण हौस फिटली आणि रतनगड करून मागे फिरलो. 
आम्ही शनिवारी जायचे म्हणून तयारी केली, पण संध्याकाळी अचानक जोरदार पाऊस सुरू झाला, वाटल आता संपल सगळे हिरमुसले, प्लॅन कॅन्सल केला, मी झोपायाला जाणार तितक्यात live satellite image चेक केल्या पण ढग फक्त दक्षिण दिशेकडून पूर्वेकडे वाहत होत्या भंडारदरा clear होता, थोड्या लोकल लोकांशी संपर्क केला, त्यांनी पण सांगितले की, पाऊस थोडा आहे पण काहीं सांगता येत नाही. सगळे झोपलो. रात्री १२ वाजता डोळे उघडले, परत weather report आणि satallite इमेज चेक केल्या आणि ठरवले चला निघुया, १वाजता प्रवास सुरू केला. भावली धरणाकडून वाटचाल सुरू केली, सगळा काळाकुट्ट अंधार, रस्त्यामध्ये मी फक्त एकटा ड्राईव्ह करत होतो, भीती वाटत होती, जसा पुढे जात होतो तसा भीतीचा रातकिडा जास्तच किर्र किर्र करू लागला, आंबेवांडीत माणसं दिसली बहुदा ती AMK साठी आली होती मुक्कामाला, लगेच पुढे एक जीप चालली होती ठरवले त्याला फॉलो करू पण तो फार स्लो चालला होता, थोडा धीर केला आणि पुढे निघून आलो, गाडी थेट वसुंधरा फॉल च्या आधीच्या ब्रिज वर थांबवली, सुंदर वातावरण पण रस्ता जसा मागे २ वेळा आलो होतो, अगदी तसाच फक्त दगडी आणि डांबर अजिबात नाही. सकाळचे ६वाजले होते, म्हंटले नाष्टा उरकून घेऊ, ब्रीज खाली मस्त नदी वाहत होती, रस्त्याला मस्त ओहळ वाहत होता, सगळे सकाळचे कार्यक्रम उरकून घेतले, प्रसन्न झालो, पोटोबा झाला, गाडी चालू केली थेट रतनवाडीला थांबलो, लागतील त्या बॅग आणि सामान भरले आणि ८वाजता ट्रेक चालू केला, यावेळी २ application चा वापर केला ट्रेकसाठी पण पुढे कळले की ते दोन्ही जास्त उपयोगी नाहीत, मग गूगल मॅपच्याच भरोशाने निघालो भरकटलो, डोंगर, दरी तुडवत पुढे चालत राहिलो, डोंगराचा उभा ८०डिग्री चड चढलो, काट्या मधे रक्त बंबाळ झालो पण हार मानली नाही, एक स्थळ असे आले की ९० अंश कातळ उभा राहिला पण तो ही कसा बसा पर केला. मध्येच जंगली प्राणी भेटले, बनून माकड भेटली, आम्हाला बघून ती बेफाम झाली कारण ती त्यांची जागा होती, त्याचे घर होते. हातात safety equipment तायार ठेवली. टोटल ४ डोंगर पार केले पण शेवटी गडाकडे जाव तर पुढे वाट संपते आणि दरी चालू होत होती. थोडा ब्रेक घेतला पाणी पिले, पण इच्छा न्हवती काही करायची किंवा खायची. मी घाबरलो होतो पण सांगू कुणाला, करणं जंगल आणि दिशा जाणून उमगुन चालणारा मीच एकटा होतो. हिंमत हरलो नाही कारण मला गडाचे दोन दरवाजे माहिती होते. त्याच दिशेने चालत राहिलो, शेवटी आम्हाला साम्रट ते पाचनई रेंज ट्रेक ची वाट भेटली, सगळे खुश झाले जसा काही देव पावला, मनात देवाचे आभार मानले. थोडा ब्रेक घेतला थोडा एनर्जी ड्रिंक घेतले तरतरी आली. थोडा पुढे जातो तेच एक मैलाचा पत्थर भेटला, ऐकी कडे साम्रट ५KM आणि दुसरीकडे पाचनई १३ KM लिहिले होते, बरे वाटले. मनाला आत्मविश्वास आला. पुढे ठरवले ही खुंटा सुळका वरून तर त्र्यंबक दरवाजा करून वर जाऊ, पण गूगल map वर तोच समोर दिसत होता पण कारवी वाढल्यामुळे ती वाट दिसत न्हवती, वाट हुकली. फक्त एक खूण जाणवली ती म्हणजे खुंट्याकडून फार वारा येत होता. परत गणेश दरवाजा कडे मोर्चा वळवला. शेवटी गणेश दरवाजा आणि कत्राबाई वाटा intersect झाल्या. मनातल्या सगळ्या द्विधा पारिस्थीतिचा अंत झाला. तब्बल ४तासानंतर वाट सापडली माणसं दिसली. मनाला हायसे वाटले. मग काय कसा बसा परत जोश परत आणला आणि गड चढायला लागलो. ४ शिड्या, गणेश दरवाजा आणि रखवालदार दरवाजा पार केला, शेवटी देवीचे दर्शन घेतले आणि गुहेमध्ये आराम केला एक वाजला होता, लगबगीने थोडा नाष्टा केला पाणी पिले पुढे निघालो. वातावरण थोडा ढगाळ होते, पाऊस नव्हता, मनात एक शंका होती कारण चांगल्या फोटो आणि व्हिडिओसाठी प्रकाश फार महत्वाचा असतो. पण काही मार्ग नव्हता कारण सकाळचा प्राईम टाईम आमचा फुकट गेला होता. तरी कडेलोट पॉइंट बघितला, राणी महाल लांबून बघितला. कारविच्या फुलांचा, सोनकीच्या फुलांचा बहर बघितला, फोटो सेशन झाले, जास्त फुले त्र्यंबक दरवाजा जवळ आहेत ह्याची नोंद घ्यावी. शेवटी थकलो आणि परत फिरायचा विचार आला पण, आमचे पहिले नेढे ते बघायचे होते ते ही बघितले आनंद द्विगुणित झाला, वारा भरपूर होता. परतीचा प्रवास सुरू केला पण परत तोच पेच, काय करावे, द्विधा परिस्थिती, गणेश दरवाजा की त्र्यंबक दरवाजा? थोडा वेळ घेतला आणि शेंडी गावा मधला शेंडी कॉलेजचा एक ग्रुप भेटला ५०-१०० मुल होती, त्यांचे सर बोलले आमच्या बरोबर चला मग ठरले, आम्ही त्र्यंबक दरवाजा कुच केला. त्र्यंबक दरवाजा हा एक विस्मयजनक ठिकाण आहे, समोर उभी दरी पण रेलिंग मुळे आसान उतार आहे, खाली उतरताना परत फुलांचा बहर दिसतो सगळा डोंगर करविच्या फुलांनी आच्छादून गेला आहे. वाटा तुडवत ५०टक्के गड उतरलो, पण धोका जणू वाघाच्या स्वरूपात समोर तळ ठोकून उभाच होता, गावातील शेतकरी वर आले बोलले वाटेत वाघाने शेळीला पकडले आहे आणि तो तिथेच बसला आहे पुढे जाऊ नका. आता काय करायचे? त्यांनी धीर दिला बोलले आम्ही दुसरा रस्ता दाखवतो, पण चालून चालून पाय तुटले होते. परत गडाच्या दिशेने प्रवास चालू केला, २०-२५ टक्के मागे फिरलो. परत ३-४ डोंगर पार केले, दरी मध्ये एवढी गर्द झाडी होती की माती ओली होती, trekking shoes पण घसरत होते. आम्ही थकलो होतो मुले तर रडत होती, रस्ता परत चुकलो पण शेवटी रतनवाडीला संध्याकाळी ६ वाजता पोहोचलो. मला कॉलेजच्या सरांचे आणि गावकऱ्यांचे आभार मानायचे होते पण उशीर झाल्यामुळे आणि गर्दी झाल्यामुळे शेवटी भेट झाली नाही ह्याची खंत लागून राहिली. परत देवाचे आभार मानले कारण आम्ही अंधार पडायच्या आधी परत आलो होतो, आता पोटामध्ये भुकेच्या राक्षसाचा आगेडोंब उसळला होता, लगेच गाडी मधील मॅगी जंबो पॅकेट काढले आणि ५ मिनिटा मधे तयार करून काही क्षणात फस्त केले, पोटोबा झाला, जमदग्नी शांत झाला. ७ वाजता गाडी चालू केली आणि थेट घरी बोरीवली मधे १ वाजता पोहोचलो. तब्बल २४ तास प्रवास, २० km चा खडा पहाडी चढ आणि उतार. मनाची धड धड शांत झाली होती लगेच गाड झोप लागली. हा होता आमच्या रतनगड ट्रेकचा भन्नाट अनुभव, हाच अनुभव तुम्ही आमच्या YouTube चॅनेल Simple Lifestyle Vlogs वर व्हिडिओ स्वरूपात बघू शकता आणि चॅनल आवडला तर कृपया लाल subscribe बटण दाबा. आपले धन्यवाद, मंडळी आभारी आहोत, पुन्हा भेटू परत नवीन ट्रेक करू, जर तुम्हाला आमच्याबरोबर यायचे असेल तर मला मेसेज करा, पुढल्या वेळी आपण सगळे मिळून भन्नाट ट्रेक करू. सिद्धेश पाटील व्हॉट्स अप नंबर ९९६७१५२९३८, कृपया फोन करू नका ही विनंती🙏

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

एक अनवट वाट तांदूळवाडी गडाची

भला मोठा तांदूळवाडी / लालठाणे धबधबा, तांदूळवाडी गाडाखाली, सफाळे

OFFBEAT Trekers ने TTMM तत्वावर आयोजित केलेली नाणेघाट ते भीमाशंकर ७० Km मधील पहिला टप्पा नाणेघाट ते आंबोली