भला मोठा तांदूळवाडी / लालठाणे धबधबा, तांदूळवाडी गाडाखाली, सफाळे
भला मोठा तांदूळवाडी / लालठाणे धबधबा, तांदूळवाडी गाडाखाली, सफाळे
नमस्कार मंडळी,
हा लेख मागच्या तांदूळवाडी गडाचा क्रमशः भाग आहे, जर आपण तो लेख वाचला नसेल तर वाचून घ्यावा.
गडावरून आम्ही उत्तरेच्या मार्गाने खाली उतरलो, हा थोडाफार दगडाने बनवलेला पायरी मार्ग आहे. वाटेत फार काटेरी झाडी झुडपे आहेत याची नोंद घ्यावी.
ह्या वाटेने तुम्ही अर्धा गड उतरलात की परत तांदूळवाडी गावात किंवा लालठाणे गावात जाऊ शकता, खाली तसे बोर्ड लिहिले आहेत, वाटेत ऑईल पैंटने खुणा केल्या आहेत त्या बघून पायवाट धरावी.
गड उतरल्यानंतर, गावा जवळ आपल्यावर उजव्या बाजूला भाला मोठा धबधबा दिसतो त्याचा स्पष्ट असा आवाज आधीच कानावर येतो.
आम्ही गावाकडची पायवाट सोडून, धबधबा पहण्यासाठी वळलो.
धबधबा हा भाला मोठा जवळ जवळ शे दीडशे फूट उंच असा आहे पण तो झाडं झुडपात लपलेला आहे.
गड उतरताना पाऊस चालू होता, धबधबा उफाळून आला होता, जोर एवढा होता की मोबाईल, कॅमेरा काहीच शूट करू शकत नव्हतो.
कसे बसे फोटो व्हिडिओ काढले, पाण्याचा आनंद मिळवला आणि आम्ही परतीचा प्रवास सुरू केला.
आम्ही हा ट्रेक TTMM तत्त्वावर केला होता, आम्हाला माणशी फक्त 90 रुपये खर्च झाला. नाश्ता आणि जेवण आमचे बरोबर घेतले होते.
आपल्याला आमच्या ट्रेक सफरिमध्ये सहभागी व्हायचे असेल तर खालील व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन करा
https://chat.whatsapp.com/BvneqZOSQuXESNXVYUqhLk
आमचा स्वर्गरुपी अनुभव जर आपल्याला खरंच बघायाचा तर तो व्हिडिओ स्वरूपात उपलब्ध आहे, खालील लिंक क्लिक करून आस्वाद घ्यावा.
https://youtu.be/hFb_DInNY84?si=p7s6br24jEemq7Ws
आमच्या चॅनलच्या फिरस्तीच्या नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या व्हॉट्सॲप चॅनलला क्लिक करा
https://whatsapp.com/channel/0029Va9hK5r9xVJnXYQ6yh3L
आपलाच
सिद्धेश पाटील
Simple Lifestyle Vlogs
Borivali Hikers
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा