हरिहर गड / हर्षगड

हरिहर गड / हर्षगड

हरिहर गड हा तसा उंचीने लहान आहे पण तो कमी कालावधीमध्ये जास्तीत जास्त उंची निश्चित करतो म्हणून थकवा देणारा आणि आपल्या शारीरिक ताकतिचा निकष तपासणार असा आहे.

हर्षवाडी हे पायथ्याचे गाव आहे, हा किल्ला त्रंबकेश्वर डोंगर रांगेमध्ये मोडतो, इथे येण्यासाठी इगतपुरी किंवा त्रंबकेश्र्वर पासून रिक्षा किंवा जीप शेअर किवा वैयक्तिक मिळते. मुंबई पासून साधारण १३०Km चा पल्ला आहे. गडाखाली भरपूर पार्कींग उपलब्ध आहे. गडाखाली  जेवणाच्या हॉटेलची व्यवस्था आहे. किल्ल्यावर जास्त पायवाटा नसल्यामुळे काही अडचण होत नाही. गडा खालून सुधा पायवाट दिसते. किल्ला चढायला साधारण १-१.३० तास पुरे होतात. उतरण्यासाठी साधारण १ तास पुरे पण  सगळा खेळ लोकांच्या गर्दीवर अवलंबून आहे ह्याची नोंद घ्यावी. गडावर जेवणाची सोय नाही आहे पण नाश्ता, लिंबूपाणी आणि मक्याची कणसे मिळतात, मिनरल वॉटर पण मिळते. गडावर कुठलाही पिण्याच्या पाण्याची टाकी नाही, गडावर भरपूर टाक्या आहेत पण त्या पिण्याजोग्या नाहीत ह्याची नोंद घ्यावी. गडावर ८० अंश कोनातील दगडामध्ये कोरलेली पायऱ्या आहेत. पायऱ्यांची तऱ्हा न्यारी आहे, रोमांचक थरार आहे, तो शब्दात व्यक्त करता येणार नाही. त्यासाठी गड सर करणे भाग आहे. गडावर हनुमानाचे, शंकराच्या पिंडीच्या अवशेष आहेत.

गडाच्या सर्वोच्च जागेवरून आपण भास्कर गड, ब्रह्मागिरी पर्वत, अप्पर वैतरणा धरण, फणीचा डोंगर ठळकपणे दिसतात.

गडावर चढताना बहुतेक १० जणांचा गट करूनच चढा किंवा उतरा, हातामध्ये लांब काठी घ्या जेणेकरून माकडांना धाक देता येईल. पायऱ्या चढताना शक्यतो मोबाईल, हेडफोन, गॉगल, टोप्या, हुडी सगळे टाळा. बॅगेत भरा आणि खाली असलेल्या दुकानामध्ये ठेवा. कारण माकडे भरपूर त्रास देतात. बॅगा खेचतात.

गडावर कारविच्या कळ्यांचा बहर आला आहे, बहुदा १५-२० दिवसांमध्ये त्या फुलातील आणि गड सुंदर निळ्या फुलांनी बहरून जाईल. ही कारवी मोठी आहे, फुले देखील मोठी आहेत.

आम्ही १० च्या गटाने गेलो आणि गटाने उतरलो, म्हणून माकडाचा त्रास झाला नाही. आम्हाला इतर लोकांनी फार मदत केली जिथे गरज होती.

जास्त माहितीसाठी आमच्या YouTube चॅनेल Simple Lifestyle Vlogs ला जरूर भेट द्या व रोमांचक अनुभव घ्या आणि चॅनल सबस्क्राइब करा.

व्हिडिओ लिंक खालील प्रमाणे
https://youtu.be/T7XmPtJtR2M

Facebook:
https://www.facebook.com/simplelifestylevlogs?mibextid=ZbWKwL

Instagram:
https://www.instagram.com/simplelifestyle.vlogs/

Whatsapp number: ९९६७१५२९३८

आपलाच मित्र, कळावे लोभ असावा.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

एक अनवट वाट तांदूळवाडी गडाची

भला मोठा तांदूळवाडी / लालठाणे धबधबा, तांदूळवाडी गाडाखाली, सफाळे

OFFBEAT Trekers ने TTMM तत्वावर आयोजित केलेली नाणेघाट ते भीमाशंकर ७० Km मधील पहिला टप्पा नाणेघाट ते आंबोली