गोवर्धन इको वीलेज, गलतारे, वाडा, पालघर
नमस्कार मंडळी,
आज आपण वेगळ्याच ठिकाणाला भेट देणार आहोत. Iskcon यांचे गोवर्धन इको विलेज ही आध्यात्म आणि पर्यटन यांना जोड देणारी संकल्पना काही वर्षांपूर्वी नावारूपाला आली, ही वास्तू 100 एकर जागेत पसरलेली आहे भरपूर मंदिरांची शृंखला, जंगल, नदी, विविध प्रकारची जंगली आणि शोभेची फुलझाडे, हॉटेल, योग, मेडिटेशन, आयुर्वेद या सर्वांचा मिलाप आढळतो आणि याच मुले तूर्त घडीला भरपूर प्रसिद्धीच्या झोतात आहे.
या मंदिराच्या शृंखला बघण्यासाठी उभ्या महाराष्ट्रातूनच नाही तर जवळ पास असलेल्या राज्यातून देखील भाविक भेट देत असतात. सर्वप्रथम ही जागा पालघर जिल्ह्यात, गलतारे गावात, हमरापुर वाडा या तालुक्यात येते.
मुंबई पासून अवघ्या 90 km अंतरावर आहे तर पालघर पासून 33 km अंतरावर आहे. इथे येण्यासाठी एसटी बसचा पर्याय सुधा उपलब्ध आहे, सकाळी 7 च्या दरम्यान पालघर गलतारे कल्याण अशी बस उपलब्ध आहे, हीच बस दुपारी 2च्या सुमारास परत फिरते. जर ही बस चुकली तर भरपूर एसटी बस आपल्याला हमरापुर हायवे ला सोडतात पुढे रिक्षा उपलब्ध आहेत.
इथे प्रशस्थ असे फ्री पार्किंग उपलब्ध आहे, त्यामुळे चिंता नाही.
इथे आल्या आल्या आपल्याला प्रथम खिचडीचा प्रसाद मिळतो. परिसरात फिल्टरचे पाणी आणि प्रसाधन गृह मुबलक उपलब्ध आहेत. पुढे आपण सगळी मंदिरे बघतो, मंदिरे इतकी सुंदर आहेत की वेळ कधी जातो ते कळतच नाही.
इथे ठरावीक वेळेत जंगल टूर उपलब्ध आहे, पुराणातील कथांवर आधारित श्री कृष्णा संदर्भात विविध प्रसंगांचे मुर्तिरुपात मनमोहक असे देखावे तयार केले आहेत.
या जंगल टूर ला जरूर भेट द्यावी, संपूर्ण टूर करण्यासाठी 1 तासाचा कालावधी लागतो. आपल्याला त्यांच्या ठरावीक वेळेत गेलात तरच फ्री मध्ये टूर गाईड मिळतो आणि तो प्रत्येक देखाव्याचा कृष्णाच्या कथेशी असलेला संदर्भ समजाऊन सांगितला जातो.
टूर झाल्या नंतर 12 च्या सुमारास आपण दुपारच्या जेवण रुपी प्रसादाचा आनंद घेऊ शकता.
इथे Iskcon या संस्थेची ग्राम उद्योगावर आधारित अशी भरपूर प्रॉडक्टस आहेत ती विकत घेऊ शकता.
आपण या संस्थेत स्वतः सहभागी होऊन सेवा करू शकता किंवा पैशाच्या स्वरूपात मदत करू शकता.
या जागेला भेट देण्यासाठी अर्धा दिवस पुरे, या बरोबर आपण आजू बाजूच्या परिसरातील इतीहासिक पर्यटन स्थळांना देखील भेट देऊ शकता, सूची खालील प्रमाणे,
1) कोहोज दुर्ग
2) काळ दुर्ग
3) अशेरी दुर्ग
4) असावा दुर्ग
या सुंदर स्थळाला बघण्यासाठी खालील व्हिडिओ लिंक करा.
YouTube Video Link:
https://youtu.be/DNmW6keKgsA
YouTube लिंकला नक्की क्लिक करून व्हिडिओ पहा, जर व्हीडिओ आवडला तर लाल सबस्क्राइब बटन दाबा, सोबत असलेल्या घंटेला क्लिक करून All हे बटन दाबा म्हणजे आमचे नियमित येणारे व्हिडिओ आपणास पाहण्यासाठी उपलब्ध होतील ते ही काहीही किंमत न मोजता.
WhatsApp Group Link:
https://chat.whatsapp.com/COawAF4287QA9KAvzJSEFI
WhatsApp Channel Link:
https://whatsapp.com/channel/0029Va9hK5r9xVJnXYQ6yh3L
Facebook page Simple Lifestyle Vlogs:
https://www.facebook.com/simplelifestylevlogs?mibextid=ZbWKwL
Borivali Hikers:
https://facebook.com/groups/509955217958785/
Instagram:
https://www.instagram.com/simplelifestyle.vlogs/
TTMM Simple Lifestyle Vlogs Facebook Group: https://facebook.com/groups/496676889311754/
माझे सगळे लिखाण Blog स्वरूपात: https://simplelifestylevlogs.blogspot.com/
Whatsapp Number: Nine Nine Six Seven One Five Two Nine Three Eight 99:67:1 5:29:38
जर आपल्याला या जागेची अधिक माहिती हवी असल्यास वरील नंबर वर WhatsApp मेसेज करा.
आपण आमच्या TTMM (कमीत कमी खर्च आणि भरपूर भ्रमंती) या मोफत उपक्रमात सहभागी होऊ इच्छित असाल तर मग दिलेल्या फोन नंबर वर WhatsApp मेसेज करा. फोन करू नका तो DND वर आहे, कोणीही फोन उचलणार नाही ह्याची नोंद घ्यावी. आमचे TTMM वर आधारित भरपूर व्हिडिओ YouTube Playlist वर उपलब्ध आहेत, ते लवकरच बघून घ्या आणि आमच्या फिरस्ती मध्ये सामील व्हा. आम्ही कोणतीही किंमत आकारात नाही ह्याची नोंद घ्या.
आमची टी टी एम एम ट्रेक बद्दलची संकल्पना समजून घेण्यासाठी खालील व्हिडिओ लिंकला क्लिक करून संपुर्ण माहिती मिळवा.
TTMM concept episode link: https://youtu.be/uiUPdLNxjBY
जर आपण स्वतः काही TTMM ट्रेक करत असाल तर मला WhatsApp मेसेज वर कळवा, माझे वेळेचे गणित जुळल्यास मला तुमच्या सोबत सहभाग घ्ययला आवडेल.
कळावे लोभ असावा,
आपलाच मित्र,
सिद्धेश पाटील
Simple Lifestyle Vlogs
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा