हरिहर गडावरील कारवीची फुले आणि रानफुले

हरिहर गड तसा फार प्रसिद्ध आहे तो ८०अंशातील कातळात कोरलेल्या पायऱ्यांसाठी. अगदी जगभरातून ट्रेकर मंडळी त्या बघायला येतात.

आजचा विषय आहे गडावरील रानफुले. रानफुले भरपूर प्रकारची आसतात त्यांचे विविध रंग आणि रूप आसतात, काही गर्द रंगाची तर काही फिक्या तर काही सफेद रंगाची देखील असतात. पण त्याचे महत्व है की त्यांची कोणीही लागवड करत नाही आणि ती पाऊस सरता सरता आपसूक येतात. काही झाडांच्या बिया असतात तर काहींचे कंद असतात. जंगली असल्यामुळे सहजा सहजी नष्ट पावत नाहीत. थोडक्यात ती फार चिवट जातीची झुडपे असतात त्यांची प्रजाती कोणत्याही आलेल्या आपत्तीला सामोरे जाऊन टिकाव धरून राहते आणि आपला प्रसार करते.

पावसाळ्या नंतर फक्त सह्याद्रीतील डोंगरावर नहींतर माळरानावर सुधा विविध फुले दिसतात.

रानफुलांचा उपयोग आयुर्वेदामध्ये केलेला आढळतो, काही उपचारांमध्ये त्याच्या बिया तर काही मधे कंद फार गुणकारी असतात. रानफुलांचा ८०० ते १००० प्रजाती भारतात आढळतात. रानफुलांची मध सर्वोत्तम असते, त्यांचा गंध, रंग आणि चव ही नेहमीच्या फॅक्टरी मधे बनलेल्या मधासारखी साधारण नसते. हरिहर गडावर आम्हाला देखील संपूर्ण मिळून २०-३० प्रजातीची फुले आढळली बहुदा जास्तच असावी. मला वेळेचे बंधन असल्यामुळे मी जास्त वेळ फुलांसाठी देऊ शकलो नाही. जमतील तशी थोडीफार माहिती व फुलांचे फोटो काडण्याचा प्रयत्न केला आहे.

आम्ही हा ट्रेक दिवाळीच्या आदल्या दिवशी केला होता, बहुतेक एव्हाना भरपूर फुले फुललेली असावीत.

फुलाबद्दल थोडाफार भाग व्हिडिओमध्ये टाकला आहे जर बघावासा वाटला तर खालील लिंक क्लिक करा, जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ खालील लाल सबस्क्राइब बटन दाबा, म्हणजे आमचे व्हिडिओ नियमित तुम्हाला दिसतील.

https://youtu.be/T7XmPtJtR2M

कळावे आपलाच मित्र, लोभ असावा

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

एक अनवट वाट तांदूळवाडी गडाची

भला मोठा तांदूळवाडी / लालठाणे धबधबा, तांदूळवाडी गाडाखाली, सफाळे

OFFBEAT Trekers ने TTMM तत्वावर आयोजित केलेली नाणेघाट ते भीमाशंकर ७० Km मधील पहिला टप्पा नाणेघाट ते आंबोली