*शिवराजस्य प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य आयोजित* *किल्ले चंदेरी दुर्गदर्शन मोहीम*

*🚩 सादर जय शिवराय 🚩*

नमस्कार मित्रांनो,

आजच्या फिरस्तीचे आयोजन हे शिवराजस्य प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य यांच्या तर्फे होते.

मोहीम होती *किल्ले चंदेरी दुर्गदर्शन*

मला सुरुवातीलाच संपूर्ण संस्थेचे आणि त्यांच्या सभासदांचे आभार मानावे लागतील, प्रकर्षाने मला श्री केतन धुरी ज्यांनी आम्हा सगळ्यांना वारंवार संपर्क करून एकत्र आणण्याचे काम केले, आमच्या मोहिमेची धुरा संभळणारे श्री दर्शन गाडे ज्यांनी सगळ्यांना सांभाळून वेळोवेळी सगळ्यांचे मनोबल वाढवले आणि सगळ्यात शेवटी अजिंक्य हायकरचे श्री रत्नाकर थत्ते काका ज्यांनी हा गड २०० पेक्षा जास्त वेळा सर केला आहे, विशेष म्हणजे कठीण जगेंवर स्वतः अवघड जागी उभ राहून आम्हाला सूचना देत होते की कसे पुढे जावे, आम्हाला गड उतरायला रात्र झाली पण त्यांना घाट वटांची इत्थंभूत माहिती त्यांना आहे त्यामुळे आम्ही सुखरुप परतीचा प्रवास केला, या सगळ्यांचे आभार मानू तेवढे कमीच.

आम्ही सकाळी बदलापुर स्थानकात सकाळीं ६ वाजता ठरवले, आदल्या दिवशी नातेवाईकांकडे काही कौटुंबिक कार्यक्रम होता म्हणून घरी रात्री उशिरा १२ वाजता पोहोचलो. सकाळी २.३० चा गजर लावून झोपलो, पण झोप काही लागत नव्हती, कारणं चंदेरी ची ओढ लागली होती, ९० अंशी कातळ कड्यावरून फक्त ४ इंची फटीतून साधारण २ ते २.५ मीटर फक्त सरळसोट दगडाला ऐका घोरपडीप्रमाणे पकडुन जायचे होते. बोरिवली वरून ३.४० ची ट्रेन होती पण बॅग भरली नव्हती, त्याची सकाळी तयारी केली, फक्कड ब्लॅक टी, लेमन आणि मध हे सुंदर आरोग्यवर्धक पेय, दिवसाची सुरूवात चांगली झाली. बोरिवली वरून नियोजित ३.५० ची ट्रेन पकडली, पुढे दादर वरून ४.४०ची खोपोली लोकल पकडायची होती पण मेगब्लॉक मुळे ती रद्द झाली थेट ५.०५ ची कर्जत लोकल पकडली, ६.३५ ला बदलापूर गाठले, मस्त थंडीची लाट पसरली होती. काही मंडळी थोडी लेट झाली त्यामुळे अर्धा तास वाया गेला. पुढे १०km चिंचवली गाव आहे तेच पायथ्याचे गाव. गावात ग्रामपंचायतीची शाळा आहे, तिथेच गाड्या पार्क केल्या. गावातच ऐका भाऊ कडे मस्त परत ब्लॅक टी झाला, तरतरी आली, तो जरुरी होता कारण थंडी जास्त वाढली होती.
सगळ्यांची ओळख परेड झाली, सूचना झाल्या. शाळेसमोर एक रस्ता जातो तिथूनच ट्रेकची सुरुवात होते. सुरुवातीचा डोंगरच खडा पहाड आहे, ६०-७० अंशी कोनात आहे तो पार केला की एक दीड तासाचे सरळसोट तीन चार पठार आहेत, पठारावरून नवरा नवरी सुळके, ताहुली, मलंग गड, म्हैसमाळ अगदी विहंगम दिसतात. पठारावर फक्त गवत आणि थोडी झाडे आहेत. पठार संपता संपता आपण म्हैसमाळ आणि चंदेरी या दोघांमध्ये तयार झालेल्या दरीमध्ये पोहोचतो. दरीमध्ये पावसात पडणाऱ्या पाण्याचा जोर एवढा असतो की मोठे मोठे  म्हणजे २०X२० फुटाचे दगड वाहून आले आहेत, पावसामध्ये त्याचे रौद्र पाण्याचे रूप बघण्यासारखे असणार, मग तेव्हाच ठरवले, पुढच्या पावसात धबधबे बघायला परत फेरी मारायची. हा मार्ग संभ्रमात टाकणारा हे नक्की, करणं कधी दरीच्या घळीतून, कधी दरीच्या उजव्या बाजूने तर कधी डाव्या बाजूने रस्ता जातो. इथे रस्ता भटकणे पक्के आहे, सस्त्यात दिशादर्शक चिंध्या, दगडी रचून ठेवली आहेत तरी पण वाटाड्या जरुरी आहे V pach paryant पोहोचण्यासाठी. वाटेतच चंदेरीचा डोंगर आणि सुळका दिसतो त्या दोंघामध्येल्या फटिमध्ये भलामोठा दगड अडकला आहे, तो फक्त दरीतून दिसतो, तो जरूर बघण्याचा आनंद घ्यावा. ही दरी फार शांत, सुंदर थंड, झाडांनी बहरलेली आहे, उनाचा त्रास होत नाही जसे वर पोहोचतो तसे मंद वाऱ्यचा जोर हळू हळू वाढत जातो. पुढे १ तासात आपण V pach ला पोहोचतो, इथे + चींन्ह तयार होते, पूर्वेला बदलापूर, पश्चिमेला पनवेल, उत्तरेला म्हैसमाळ आणि दक्षिणेला चंदेरी स्पष्ट ठळकपणे दिसतो. पुढचा चढ करावीच्या सनिध्यातून होतो तो साधारण १५ ते ३० मिनिटांनी संपतो, वाटेमध्ये चंदेरी देवी आणि अजून तिच्याच मागे डोंगरावर गावदेवीचे मंदिर आहे. कारवी संपता संपता आपल्याला बाले किल्ल्याचा दरवाजा आणि थोडी तटबंदीचे भग्न अवशेष दिसतात. पुढे क्षणातच आपण पाण्याच्या टाकीपर्यंत पोहोचतो पण पाणी पिण्याजोगे नाही. समोरच गुहेतील शंकराच्या पिंडी पर्यंत पोहोचतो. बहुतेक लोक इथपर्यंत मुश्किलीने पोहोचतात आणि आराम करून परत फिरतात, कारण पुढचा रस्ता अत्यंत कठीण, निसरडा, उभ्या कातळ कड्यावरून जातो, बहुदा लोकांना तो समजतच नाही की कसा पुढे जावं ते.

आता २५% थरारक चढाई बाकी होती. जाताना १२० ते १५० अंशचा कोन असलेला डोंगर आहे, दगडाचा भुगा झाला असल्यामुळे वाट निसरडी आहे. इथे दोर पण निष्फळ आहे, फक्त आपला अनुभव आणि चित्त थाऱ्यावर ठेऊन अत्यंत सावध आणि हळूवार पार करावा लागतो. इथे एक चूक आपल्याला १५०० फूट खोल दरीत ढकलू शकतो.

चला आता आपण महत्वाचा टप्पा पार केला, तरी थरार संपला नव्हता पुढे आपण पाण्याच्या टाकी पर्यंत पोहोचतो, इथे पेब, माथेरान, इर्षाळगड, प्रबळगड, कलावंतीण, कर्नाळा किल्ला डोंगररांग रांगेत दृष्टिक्षेपात येते. फार मनोहारी दृश्य आहे ते.

पुढे चाढणे अत्यंत कठीण आहे, परत ११० ते १२०अंशी कोनात चढाई आहे, फार थोड्या कातळात कोरलेल्या पायऱ्या आहेत पण त्या विरलेल्या आहेत. एका सराईत गिर्यारोहकाला पण घाम फुटेल असे दृश्य आणि चढाई पुढे आहे. इथे संयम, शांती, शरीराचा तोल सांभाळणे फार कठीण आणि जरुरी आहे, क्षणांत होत्याचे नव्हते होऊ शकते असा सरळसोट कातळ कडा शब्दामध्ये व्यक्त करता येणार नाही. इथेच ती ४ इंच कपार आहे तिथे पाय अडकून किंवा हात अडकउन आपल्याला पुढे जावे लागते. अशा ठिकाणी पाय लटपटणे ह्या शब्दाचा अर्थ सार्थक रित्या कळून चुकतो.

पुढे एक पाण्याचे टाक लागते, इथले पाणी पिऊ शकतो. पुढे ५% चढाई आहे पण ती बेताची आहे, पण कठीणच आहे ती, करणं डोंगराचा जास्त भाग भुसभुशित रेती सदृश झाला आहे. पाय कितीही रोवला तरी  तो घसरतोच. क्षणात आपण गडाच्या सर्वोच्च जागेवर येऊन जातो. लगेच तिथे जुन्या घराचे तुटलेले दगड दिसतात, पूर्वी इथे कौल, जात, उखळ, मातीची भांडी यांचे अवशेष होते आता फक्त दगडाचा ढिगारा दिसतो.

गडाच्या उत्तर दिशेला जाताना सावधान अर्ध्या ते पाव मीटर चा डोंगर माथा तो ही मोठ्या मोठ्या दगडाने काही ठिकाणे व्यापलेला आहे तेव्हा जरा जपून. गडाच्या शेवटी उत्तरेला छत्रपाती शिवजी महाराजांची सुंदर सुबक मूर्ती आहे. इथून ३६० डिग्री व्ह्यू अत्यंत सुंदर आहे.

हा ट्रेक करताना आम्ही चींचवली गावातून सकाळी ८.३० ला सुरू केला आणि रात्री ८ च्या दरम्यान पूर्ण केला. एकूण २८००० स्टेप्स आणि १९.५ km चा ट्रेक झाला.

ट्रेक करताना जेवण, पाणी, trekking shoes, trekking pole, torch, first aid, टोपी, गॉगल हे सगळे बाळगणे जरुरीचे आहे.

गडावर जातानाच गावकऱ्यशी बोला त्यांचा सल्ला घ्या, गावात जेवणाची सोय होते, जर वाटाड्या मिळत असेल तर तो जरूर घ्या.

सगळ्यात महत्वाचे जर रिक्षाने येत असाल तर त्यांचा नंबर घ्या, उतरताना त्यांना १ तास आधी फोन करून कळवा म्हणजे ते जी कोणती रिक्षा जवळ असेल ती पाठउन देतील तुमचा वेळ वाया जाणार नाही.

मला अपेक्षा आहे आपल्याला माझा अनुभव लेख स्वरुपात आवडला असेल. सोबत फोटो सुधा आहेत, पण थरार अनुभवायचा असेल तर नक्की खालील दिलेल्या YouTube लिंक ला क्लिक करून व्हिडिओ पाहा आणि आवडला तर लाल सबस्क्राइब बटन दाबा, आणि सोबत असलेल्या घंटेला क्लिक करून All हे बटन दाबा म्हणजे आमचे नियमित व्हिडिओ पाहण्यासाठी मिळतील ते ही काही किंमत न मोजता.

शिवराजस्य प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य संस्थेच्या भविष्यातील उपक्रमांना आमच्या शूभेच्छा.

YouTube: https://youtu.be/pQZ_c5u6JCo

Facebook:
https://www.facebook.com/simplelifestylevlogs?mibextid=ZbWKwL

Instagram:
https://www.instagram.com/simplelifestyle.vlogs/

Whatsapp number: ९९६७१५२९३८

कळावे लोभ असावा, आपलाच मित्र, सिद्धेश पाटील Simple Lifestyle Vlogs

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

एक अनवट वाट तांदूळवाडी गडाची

भला मोठा तांदूळवाडी / लालठाणे धबधबा, तांदूळवाडी गाडाखाली, सफाळे

OFFBEAT Trekers ने TTMM तत्वावर आयोजित केलेली नाणेघाट ते भीमाशंकर ७० Km मधील पहिला टप्पा नाणेघाट ते आंबोली