सरत्या वर्षाची संध्याकाळ आणि येणाऱ्या नव वर्षाचे स्वागत, असा मिळून मिसळून घालवलेला कौटुंबिक वेळ लक्षात रहावा हा एक छोटासा प्रयत्न

नमस्कार मित्रांनो,

आज ३१ डिसेंबर सरत्या वर्षाचा शेवटचा दिवस, खरतर हा शनिवार कामाचा दिवस पण हा दिवस साजरा करावा असा सगळ्यांचा कयास, करणं आम्ही सगळे एकत्र येणं अस फार क्वचित होते कारण नर्स प्रोफेशन मधे ३ शिफ्ट काम असते त्यात सुट्टी कडीही सणाच्या दिवशी किंवा रविवारी मिळत नाही ही सगळ्या नर्सेसची शोकांतिका. असो, सगळे एकत्र येणे आणि चांगला वेळ घालवणे हे महत्वाचे.

३१ डिसेंबर संध्याकाळी ठरवले होते की आम्हाला चिकन भुजिंग म्हणजे barbeque बनवायचे, आपण भरपूर वेळा केले पण आमच्या मॅडम नव्हत्या खाण्यासाठी, म्हणून मुद्दाम बेत आखला, फार मेहनत करायला लागते विस्तव बनवायला, करणं आपण मुंबईकर. तरी आपल्या पोर्टेबल कॅम्पिंग ग्रिल मुळे फायदा झाला. बेत फत्ते झाला, मस्त भुजींग झाले होते बरोबर मिरचीची चटणी, वेळ करणी लागला होता आणि वर्ष संपले.

१ जानेवारी, सकाळीं सकाळी आईने मुटके बनवली होती ती मी सकाळ असल्यामुळे व्हिडिओ मधे घेऊ शकलो नाही. मग आम्ही समुद्रावर गेलो, मस्त पतंग उडवली. नव वर्षाचे स्वागत केक कापून केले लवकर घरी आलो कारण, उकड हंडी - पोपटी करायची होती, तयारी करायची होती, जळणाला लागणाऱ्या सरपणपसून सगळी तयारी बाकी होती. भांबुर्डा हे झुडूप पण शोधायचे होतो, करणं पोपटी पूर्ण होत नाही भांबुर्ड्याचा पाला नसेल तर. सगळी जमवा जमाव केली आणि हा बेत पण यशस्वी झाला. मनसोक्त पोपटी खाली आणि वामकुक्षी घेतली सगळे थकलो होतो.

संध्याकाळी chikann-६५ चा बेत होता. तो पण यशस्वी झाला. आनंद झाला, जेव्हा मेहनत करतो आणि त्याचे उचित फळ मिळते तेव्हा छान वाटते.

दिवस सरला सगळी सामानाची बांधाबांध केली आणि मुंबई गाठली.

नव वर्षाचे स्वागत कसे वाटले आमचे, जास्त माहिती साठी व्हिडिओ लिंक खाली दिली आहे, एकदा व्हिडिओ बघून घ्या, कारण शब्दात व्यक्त करण्याजोगे नसते सगळे ते व्हिडिओ जास्त चांगल्या स्वरूपात मांडतो आठवणीच्या गाठोड्यामध्ये.

YouTube:
https://youtu.be/pBZO7MPrIEw

मला अपेक्षा आहे आपल्याला माझा अनुभव लेख स्वरुपात आवडला असेल. सोबत फोटो सुधा आहेत, पण खरी परिस्थिती अनुभवायची असेल तर नक्की खालील दिलेल्या YouTube लिंक ला क्लिक करून व्हिडिओ पाहा आणि जर व्हीडिओ आवडला तर लाल सबस्क्राइब बटन दाबा, आणि सोबत असलेल्या घंटेला क्लिक करून All हे बटन दाबा म्हणजे आमचे नियमित व्हिडिओ पाहण्यासाठी मिळतील ते ही काही किंमत न मोजता.
  
Facebook:
https://www.facebook.com/simplelifestylevlogs?mibextid=ZbWKwL

Instagram:
https://www.instagram.com/simplelifestyle.vlogs/

माझे लिखाण Blog स्वरूपात: https://simplelifestylevlogs.blogspot.com/ 

Whatsapp number: ९९६७१५२९३८

कळावे लोभ असावा, आपलाच मित्र, सिद्धेश पाटील Simple Lifestyle Vlogs

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

एक अनवट वाट तांदूळवाडी गडाची

भला मोठा तांदूळवाडी / लालठाणे धबधबा, तांदूळवाडी गाडाखाली, सफाळे

OFFBEAT Trekers ने TTMM तत्वावर आयोजित केलेली नाणेघाट ते भीमाशंकर ७० Km मधील पहिला टप्पा नाणेघाट ते आंबोली