माथेरान घाट वाटा भाग २ परतीचा प्रवास चारलोट तलाव-बेलवडेअर पॉइंट-वन ट्री हिल पॉईंट उतरून परत आंबेवाडी
🚩🚩 सादर जय शिवराय🚩🚩
नमस्कार मित्रांनो,
क्रमशः भाग २
भाग १: "माथेरान घाट वाट भाग१ आंबेवाडी-उंबरणेवाडी-शिडीची वाट-गुहेतील महादेव पिंडी-पिसरनाथ महादेव मंदिर" हा आधीच्या ब्लॉग वर उपलब्ध आहे ह्याची नोंद घ्यावी.
आपल्याला आधीचा भाग आवडला असेल असे गृहीत धरतो. जर आपण अजून तो भाग वाचला नसेल तर जरूर वाचून घ्या.
स्वयंभू भगवान शंकराचे पिसरनाथ मंदिराचे
दर्शन झाले, मंदिर फार सुबक होते मन प्रसन्न झाले. आत्ता दुपारचे १२.३० वाजले होते वातावरणामध्ये कमालीचा थंडावा होता. गर्द झाडीमुळे घड्याळात किती वाजले ह्याचा अंदाज येत नव्हता. माथेरानचा डोंगर अंबेवाडीतून चढून थकलो होतो. आता विश्रांतीची गरज होती. आम्ही जवळच असलेल्या Charlotte तलावाच्या सनिद्द्यात बसून दुपारचे जेवण आटोपून घेतले. संपूर्ण मथेरानसाठी Charlotte तलाव हा एकमेव पिण्याच्या पाण्याचा साठा उपलब्ध आहे. थोडेफार मोबाईल नेटवर्क चालू होते. विश्रांती झाल्यानंतर पुढचा मार्गक्रमण चालू केले. वाटेत भरपूर ब्रिटिश कालीन बंगले लागले, काही सुस्थितीत होते तर काही पड झड झालेल्या स्थितित. पण काहीही बोला ब्रिटिशांनी त्यांच्यासाठी अत्यंत सुरेख जागा शोधून काढली होती उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये आराम करण्यासाठी.
चालता चालता लगेच आम्ही बेलेवडेर पॉइंटला पोहोचलो. हा पॉइंट मुळ रस्त्यापासून १ मिनिट अंतरावर होता म्हणून ठरवले की भेट देऊ. इथून मोरबे धरणपरिसराचे विहंगम दृश्य दिसते. समोरच धुक्यामध्ये माखलेला इर्षाळगडाचा सुळका, प्रबळगडाचे प्रचंड रूप यांचे दर्शन घडते डाव्या बाजूला वन ट्री हिल पॉइंट दिसतो. थंडीचे दिवस असल्यामुळे सध्या इथे जरा जास्त धुके होते. इथे एक वाहता पाण्याचा झरा आहे. दुपारी रणरणत्या उनामध्ये असे झऱ्याचे थंडगार पाणी पिणे आणि हात पाय धुणे म्हणजे एक पर्वणीच. मनाला तजेला मिळाला आणि पुढे मार्गस्थ झालो.
आम्ही वन ट्री हिल पॉइंट वर पोहोचलो पण ते झाड सध्या अस्तित्वात नाही फक्त हिल आहे.
आपण वरती जाऊ शकतो पण मार्ग फार कठीण आहे म्हणून आम्ही ठरवले की वरती नाही जायचे.
पुढे पॉइंट वरून घाट वाट कशी खलीनुतरते ते बघत होतो पण ती काही दिसली नाही म्हणून थोडे खाली उतरलो तेव्हा सगळे दगड आणि धोंडे दिसले, काही कळत नव्हते. थोडा विचार केला आणि त्याच धोंद्यामध्ये वाट दिसत गेली. पायाला ठणके बसत होते कारण सकाळचा कठीण चढ आणि आताचा उतार जरा जास्त होते.
डोंगर उतरलो, हा उतार उभा आहे, कमीत कमी लांबीमध्ये जास्तीत जास्त खोल आपण उतरतो. मागे वळून पाहीले तेव्हा विश्वास वाटत नव्हता ही हे आपण सर केले आहे.
पुढे गर्द जंगल आहे, जंगल कमी आणि अमराईच आहे ती सगळी आंब्याची झाडे आहेत. खरतर हा ट्रेक उन्ह्याळ्यात आंबे खाण्यासाठी खास केला पाहिजे. पुढे चालल्यावर सगळा गवताळ माळरान चालू होते. ते बघून मला DDLJ मधील काजोल आठवली, जर कोणी स्त्री बरोबर असती तर तिला रील करणे अवरले नसते. असो अशेच दर मजल करत पुढे उतार कायम आणि सलग ठेवत चालत होतो. सगळे डोंगर संपले झाली संपली आता चालू झाले ते काडक उन, तरीपण समोर दिसणारा मोरबे धरणाचा व्याप बघून मनाला समाधान मिळते. सूर्य तळपत होता, मंद वारा चालू होता. पश्चिम दिशेला दिसणारा धरणाचा पसारा आणि वाऱ्यामुळे त्यात लाटा तयार होत होत्या त्यापुढे इर्षाळगढ, प्रबळगड आणि त्या मागे मावळणारा सूर्य, काय अफलातून फ्रेम होती. असे वाटत होते की इथेच बसून सूर्यास्त बघावा. पण वेळेचे बंधन म्हणून चाल कायम ठवली.
सगळ्यात शेवटी जो डोंगर माथा आहे त्या टोका वरून जाणारी पायवाट दिसली टी अशी भासली की कुणी ऐका मुलीने वेणी बांधली आहे आणि तो तिचा भांग आहे.
तो ही डोंगर संपला आता आपण आंबेवाडी मध्ये पोहचलो.
आंबेवाडी ते आंबेवाडी मिळून, क्रमशः अधिक माहिती साठी आधीचा लेख वाचा (सकाळी सुरूवात केली ९ वाजता आणि सांगता झाली ३.४५ वाजता. एकूण १८.५ किलोमीटर चाल झाली २६००० पावले चाललो.)
मला अपेक्षा आहे आपल्याला माझा अनुभव लेख स्वरुपात आवडला असेल. सोबत फोटो सुधा आहेत, पण खरी परिस्थिती अनुभवायची असेल तर नक्की खालील दिलेल्या YouTube लिंक ला क्लिक करून व्हिडिओ पाहा आणि जर व्हीडिओ आवडला तर लाल सबस्क्राइब बटन दाबा, आणि सोबत असलेल्या घंटेला क्लिक करून All हे बटन दाबा म्हणजे आमचे नियमित व्हिडिओ पाहण्यासाठी मिळतील ते ही काही किंमत न मोजता.
YouTube:
https://youtu.be/OWSxJyG298g
Facebook:
https://www.facebook.com/simplelifestylevlogs?mibextid=ZbWKwL
Instagram:
https://www.instagram.com/simplelifestyle.vlogs/
माझे लिखाण Blog स्वरूपात: https://simplelifestylevlogs.blogspot.com/
Whatsapp number: ९९६७१५२९३८
जर आपण आमच्या TTMM (कमीत कमी खर्च आणि भरपूर भ्रमंती) या उपक्रमात सहभागी होऊ इच्छिता तर मग खालील दिलेल्या फोन नंबर वर WhatsApp मेसेज करा. फोन करू नका तो DND वर आहे, कोणीही फोन उचलणार नाही ह्याची नोंद घ्यावी. आमचे TTMM वर आधारित भरपूर व्हिडिओ YouTube वर उपलब्ध आहेत.
कळावे लोभ असावा, आपलाच मित्र, सिद्धेश पाटील Simple Lifestyle Vlogs
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा