पोस्ट्स

मे, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

भर उन्ह्याळ्यात गर्द झाडांमध्ये लपलेला असा श्री महालक्ष्मी गड सुळका आणि त्यावरील महालक्ष्मी मातेचे स्वयंभू मंदिर, डहाणू

नमस्कार मंडळी🙏 तुम्हाला आत्तापर्यंत कळून चुकले असेल की भर उन्ह्याळ्यात आम्ही "ओपन टू स्काय" असे  ट्रेक करत नाहीत, आम्ही उन्हाचा त्रास कमी होईल अशा ट्रेक किंवा तत्सम जागेच्या शोधात नेहमीच असतो. जर आपल्याकडे काही जागा असतील तर त्याचा तपशील आम्हाला खालील दिलेल्या मोबाईलवर व्हॉटस् अप मेसेजद्वारे कळवावा. भरपूर अभ्यास केल्यानंतर आम्हाला गर्द झाडांमध्ये लपलेला असा श्री महालक्ष्मी गड सुळका आणि त्यावरील मूळ मंदिर यांचा शोध लागला. आमच्या Simple Lifestyle Vlogs ट्रेकिंग ग्रुपचे सहकारी श्री संदीप महाले हे डहाणूचे स्थानिक आहेत, यांनी इस्थंभूत माहिती पुरवली, मग सगळी आखणी करून आम्ही TTMM संकल्पनेच्या आधारावर हा ट्रेक करायचा असे ठरवले. महालक्ष्मी गड हा डहाणू स्थित रानशेत या गावात स्थित आहे. इथे पोहोचण्यासाठी आम्ही मुंबईवरून डहाणूची पहिली लोकल पकडली आणि डहाणूला पोहोचलो. पुढे थोड्या दुरीवरील डहाणू एसटी डेपो आहे, तिथून चारोटी नाक्यावर जाण्यासाठी भरपूर बस आहेत. बस पकडुन आम्ही रानशेत, महालक्ष्मी गड या थांब्यावर उतरलो. रानशेत थांब्यावरून चालत चालत आम्ही गडाचा पायथा गाठला. वाटेतच आम्हाला ताडीच...

किल्ले द्रोणागिरी - उरण, भर उन्ह्याळ्यात देखील जंगल संपदेमुळे आल्हाददायक असे वातावरण ही खासियत आहे या ट्रेकची

🚩🚩 सादर जय शिवराय🚩🚩 नमस्कार मंडळी🙏 तुम्हाला आत्तापर्यंत कळून चुकले असेल की भर उन्ह्याळ्यात आम्ही "ओपन टू स्काय" असे ट्रेक करत नाहीत, आम्ही उन्हाचा त्रास कमी होईल अशा ट्रेक किंवा तत्सम जागेच्या शोधात होतो. तेवढ्यात आमच्या Simple Lifestyle Vlogs ट्रेक ग्रुप वर सौ. अदिती पाटील, पनवेल यांची पोस्ट आली की द्रोणगिरी किल्ला करायचा आहे, मग आम्ही TTMM संकल्पनेच्या आधारावर हा ट्रेक करायचे असे ठरवले. उरण हे एक छोटेखानी बेट स्वरूपाचे नाही पण तिन्ही बाजूला समुद्राचे पाणी असलेले ठिकाण. अगदी गेट वे ऑफ इंडियाच्या समोर आणि घारापुरी बेटाच्या शेजारी वसलेले गाव तरीपण फार महत्त्वाचा नवी मुंबईचा शेवटचा प्रभाग. उरण हे तसे मूळ कोळी बांधवांचे गाव, खोल समुद्रामुळे भरपूर मोठ्या आकाराच्या बोटी इथे आहेत, त्यामुळे ताजे आणि मोठे मासे भरपूर प्रमाणात मिळतात अशी या जागेची ओळख आहे, अजून ठळक ओळख म्हणजे न्हावा शेवा गोदी बंदर जिथे जगभरातून समुद्रामार्गे सामानाची आयात आणि निर्यात केली जाते. उरण बद्दल मला खास प्रचिती होती, भरपूर वर्ष उरण मला खुणावत होते पण भेट देण्याचा योग येत नव्हता, पण आज मौका मिळाला अदिती ...

इच्छाशक्ती दुर्दम्य असेल तर कठीणात कठीण ध्येय गाठता येते अशी एका गृहिणीची कहाणी, किल्ले इर्शाळगड

🚩🚩 सादर जय शिवराय🚩🚩 नमस्कार मंडळी🙏 मागील महिन्यात कलावंतीण प्रबळगड आणि इर्षाळगड असा एक दिवसीय रेंज ट्रेक केला पण मोहीम सरता सरता गर्भगळीत झालो, अगदी किल्ल्याच्या पायथ्याला इर्षाळवाडीतून परत फिरलो असो. हार न मानता परत पुढल्या रविवारी ठरवले की पुन्हा हुकलेली संधी परत मिळवायची. मी एकटा जाणार होतो, पण तेवढ्यात कामत कुटुंब येण्याकरता तयार झाले. त्यांना ट्रेक बद्दल संपूर्ण माहिती दिली आणि अवघड अशा थोड्या कठीण जगेबद्दल पण इशारा दिला, पण ते सगळे ठाम होते येणार म्हणजे येणार, ह्यालाच बोलतात दुर्दम्य इच्छाशक्ती. तसे कामत फॅमिली बरोबर बहुदा हा तिसरा ट्रेक असावा, पण कामत मॅडमने अशी चढाई आधी केली नव्हती म्हणून मी साशंक होतो. दिल्या वेळे प्रमाणे आम्ही चौक इथून ८ वाजता ट्रेक चालू केला, वातावरण सुंदर होते, ऊन हलकेच होते, अधून मधून वाऱ्याची झुळूक येत होती. चालताना मजा वाटत होती वेळ कसा गेला कळलाच नाही. रमत गमत इर्शाळवाडी गाठून शेवटचा चढ चालू केला. मधून मधून मी मॅडमना विचारणा केली, पण त्यापण धीट होत्या, ट्स मस् झाल्या नाहीत, ध्येय गाठायचे हे मनात ठासून आल्या होत्या. हळू हळू करत न डगमगता सुळक्याच्या ...