इच्छाशक्ती दुर्दम्य असेल तर कठीणात कठीण ध्येय गाठता येते अशी एका गृहिणीची कहाणी, किल्ले इर्शाळगड
🚩🚩 सादर जय शिवराय🚩🚩
नमस्कार मंडळी🙏
मागील महिन्यात कलावंतीण प्रबळगड आणि इर्षाळगड असा एक दिवसीय रेंज ट्रेक केला पण मोहीम सरता सरता गर्भगळीत झालो, अगदी किल्ल्याच्या पायथ्याला इर्षाळवाडीतून परत फिरलो असो.
हार न मानता परत पुढल्या रविवारी ठरवले की पुन्हा हुकलेली संधी परत मिळवायची.
मी एकटा जाणार होतो, पण तेवढ्यात कामत कुटुंब येण्याकरता तयार झाले. त्यांना ट्रेक बद्दल संपूर्ण माहिती दिली आणि अवघड अशा थोड्या कठीण जगेबद्दल पण इशारा दिला, पण ते सगळे ठाम होते येणार म्हणजे येणार, ह्यालाच बोलतात दुर्दम्य इच्छाशक्ती. तसे कामत फॅमिली बरोबर बहुदा हा तिसरा ट्रेक असावा, पण कामत मॅडमने अशी चढाई आधी केली नव्हती म्हणून मी साशंक होतो.
दिल्या वेळे प्रमाणे आम्ही चौक इथून ८ वाजता ट्रेक चालू केला, वातावरण सुंदर होते, ऊन हलकेच होते, अधून मधून वाऱ्याची झुळूक येत होती. चालताना मजा वाटत होती वेळ कसा गेला कळलाच नाही. रमत गमत इर्शाळवाडी गाठून शेवटचा चढ चालू केला. मधून मधून मी मॅडमना विचारणा केली, पण त्यापण धीट होत्या, ट्स मस् झाल्या नाहीत, ध्येय गाठायचे हे मनात ठासून आल्या होत्या.
हळू हळू करत न डगमगता सुळक्याच्या पठारावर पोहचलो, थोडा दम घेत परत चढाई सुरु केली.
आता ऊन चढत चालले होते, पण भौगोलिक परिस्थितीमुळे सुळक्याच्या मागे सूर्याच्या विरुद्ध बाजूला गर्द सावली असल्याने जीव सुखात पडला होता.
कातळातला खडा चढ चालू झाला होता, मधे मधे ९० अंशची कठीण अशी चढाई आणि संपूर्ण पाय ताणून वर चढणे भाग होते. परत एकदा खडा टाकून बघीतला, मॅडमना सल्ला दिला जर जमत नसेल तर इथेच सावलीत थांबा आम्ही पटकन वर नेढ्यात जाऊन येतो. पण माऊली तयार नव्हती, येणार म्हणजे येणार, हळू हळू करत का होईना पण न डगमगता त्यांनी नेढं गाठले.
त्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. एखादी कठीण गोष्ट केल्याचे समाधान दिसत होते.
जी मंडळी नियमित ट्रेक करतात त्यांच्यासाठी इर्षाळगड चढाई म्हणजे काहीच नाही, पण नवख्या व्यक्तीला त्याचे अप्रूप भारी असते एव्हरेस्ट सर केल्याचे.
आम्ही नेढ्यावरच्या सुळक्याच्या आजू बाजूच्या पाण्याच्या टाक्या, माथेरान, प्रबळगडाची डोंगर रांग आणि मोर्बे धरणाचा विस्तृत नजरा बघितला आणि प्रसन्न होऊन परतीचा प्रवास सुखा सुखी केला.
आम्ही ट्रेक या साठी २३२२३ पावले चालून १६.४ किलोमीटर असा प्रवास पायी चालत केला.
हा ट्रेक 'उमंग' ह्या कौटुंबिक TTMM संकल्पनेतून केला होता. हा नवीन प्रकार आपण आपल्या ट्रेक मध्ये जोडत आहोत. ह्यात फक्त एकच कुटुंब ट्रेक करणार. ह्या मोहिमेत झालेला माणशी खर्च खालील प्रमाणे,
बोरिवली ते पनवेल ट्रेन तिकीट दोन्ही बाजूचे ४० रुपये
पनवेल ते चौक रेल्वे स्थानक तिकीट दोन्ही बाजूचे ४० रुपये
ऐकून खर्च ८० रुपये झाला.
इथे कसे पोहोचायचे,
कर्जत किंवा पनवेल पासून दर ३० मिनिटांनी दोन्ही बाजूला कर्जत पनवेल अशा गाड्या उपलब्ध आहेत. चौक रेल्वे स्थानक हा बस थांबा घ्यावा आणि पुढे सरळ चालत यावे, जर काही अडचण आलीच तर गावकरी आहेत मदतीला.
जर आपण स्वतःची गाडी आणत असाल तर पायथ्यापाशी वाहानस्थळ उपलब्ध आहे ह्याची नोंद घ्यावी.
जर आपल्याला असे विविधतेने नटलेले किंवा विशेष सहलीची ठिकाण, धबधबे, गुहा लेण्या, किल्ले, ट्रेक, hike किंवा मंदिरांची माहिती असेल तर आम्हाला जरूर कळवा, आम्हाला आवडेल भेट द्यायला.
मला अपेक्षा आहे आपल्याला माझा अनुभव लेख स्वरुपात आवडला असेल. सोबत फोटो फेसबूक लिंक वर ऊपलब्ध आहेत, तरीपण आपणास साध्य परिस्थिती अनुभवायची असेल तर खालील दिलेल्या YouTube लिंकला नक्की क्लिक करून व्हिडिओ पहा, जर व्हीडिओ आवडला तर लाल सबस्क्राइब बटन दाबा, सोबत असलेल्या घंटेला क्लिक करून All हे बटन दाबा म्हणजे आमचे नियमित येणारे व्हिडिओ आपणास पाहण्यासाठी उपलब्ध होतील ते ही काहीही किंमत न मोजता.
हा व्हिडिओची लिंक खालील प्रमाणे, एकदा जरूर बघून घ्यावी आणि आपला अभिप्राय कळवावा ही विनंती.
YouTube video link:
https://youtu.be/Zh26MKXfWI8
Facebook page Simple Lifestyle Vlogs:
https://www.facebook.com/simplelifestylevlogs?mibextid=ZbWKwL
Instagram:
https://www.instagram.com/simplelifestyle.vlogs/
TTMM Simple Lifestyle Vlogs Facebook Group: https://facebook.com/groups/496676889311754/
माझे सगळे लिखाण Blog स्वरूपात: https://simplelifestylevlogs.blogspot.com/
Whatsapp Number: Nine Nine Six Seven One Five Two Nine Three Eight 99:67:1 5:29:38
जर आपल्याला या जागेची अधिक माहिती हवी असल्यास वरील नंबर वर WhatsApp मेसेज करा.
आपण आमच्या TTMM (कमीत कमी खर्च आणि भरपूर भ्रमंती) या मोफत उपक्रमात सहभागी होऊ इच्छित असाल तर मग दिलेल्या फोन नंबर वर WhatsApp मेसेज करा. फोन करू नका तो DND वर आहे, कोणीही फोन उचलणार नाही ह्याची नोंद घ्यावी. आमचे TTMM वर आधारित भरपूर व्हिडिओ YouTube Playlist वर उपलब्ध आहेत, ते लवकरच बघून घ्या आणि आमच्या फिरस्ती मध्ये सामील व्हा. आम्ही कोणतीही किंमत आकारात नाही ह्याची नोंद घ्या.
आमची टी टी एम एम ट्रेक बद्दलची संकल्पना समजून घेण्यासाठी खालील व्हिडिओ लिंकला क्लिक करून संपुर्ण माहिती मिळवा.
TTMM concept episode link: https://youtu.be/uiUPdLNxjBY
जर आपण स्वतः काही TTMM ट्रेक करत असाल तर मला WhatsApp मेसेज वर कळवा, मला वेळेचे गणित जुळल्यास मी सुध्दा जरूर सहभागी होईन.
कळावे लोभ असावा,
आपलाच मित्र,
सिद्धेश पाटील
Simple Lifestyle Vlogs
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा