भर उन्ह्याळ्यात गर्द झाडांमध्ये लपलेला असा श्री महालक्ष्मी गड सुळका आणि त्यावरील महालक्ष्मी मातेचे स्वयंभू मंदिर, डहाणू

नमस्कार मंडळी🙏

तुम्हाला आत्तापर्यंत कळून चुकले असेल की भर उन्ह्याळ्यात आम्ही "ओपन टू स्काय" असे  ट्रेक करत नाहीत, आम्ही उन्हाचा त्रास कमी होईल अशा ट्रेक किंवा तत्सम जागेच्या शोधात नेहमीच असतो. जर आपल्याकडे काही जागा असतील तर त्याचा तपशील आम्हाला खालील दिलेल्या मोबाईलवर व्हॉटस् अप मेसेजद्वारे कळवावा.

भरपूर अभ्यास केल्यानंतर आम्हाला गर्द झाडांमध्ये लपलेला असा श्री महालक्ष्मी गड सुळका आणि त्यावरील मूळ मंदिर यांचा शोध लागला. आमच्या Simple Lifestyle Vlogs ट्रेकिंग ग्रुपचे सहकारी श्री संदीप महाले हे डहाणूचे स्थानिक आहेत, यांनी इस्थंभूत माहिती पुरवली, मग सगळी आखणी करून आम्ही TTMM संकल्पनेच्या आधारावर हा ट्रेक करायचा असे ठरवले.

महालक्ष्मी गड हा डहाणू स्थित रानशेत या गावात स्थित आहे. इथे पोहोचण्यासाठी आम्ही मुंबईवरून डहाणूची पहिली लोकल पकडली आणि डहाणूला पोहोचलो. पुढे थोड्या दुरीवरील डहाणू एसटी डेपो आहे, तिथून चारोटी नाक्यावर जाण्यासाठी भरपूर बस आहेत. बस पकडुन आम्ही रानशेत, महालक्ष्मी गड या थांब्यावर उतरलो.

रानशेत थांब्यावरून चालत चालत आम्ही गडाचा पायथा गाठला. वाटेतच आम्हाला ताडीचा पट्टा दिसला, गरमी पासुन सुटकरा म्हणून आम्ही ताडीचा आस्वाद घेतला आणि पुढील मार्गक्रमण केले. गडाखाली भरपूर मोठ वाहनतळ आहे, त्यामुळे तुम्ही जर खाजगी गाडीने येत असाल तरी चिंता नाही.

गड हा छोटेखानी पण गर्द झाडीत लपलेले आहे, उन्हाळ्यात पण अशी जागा मिळणे कठीण आहे. पायथ्या पासूनच ४०-४५ अंशाचा चढ कायम स्वरुपाचा आहे. सुरुवातीला थोडा काँक्रिटचा रस्ता आहे आणि नंतर मातीची मळलेली वाट, चुकण्याची काही चिंता नाही कारण एकच रस्ता आहे.

जवळ जवळ अर्धा गड चढल्यानंतर पायऱ्या चालू होतात. इथे विविध प्रकारची जंगली झाडे आणि अगणित प्रमाणात पक्षी संपदा आहे. गड चढताना विविध पक्षांचे आवाज जणू आपले स्वागतच करतात.

पायरी भागात भरपूर माकडे आहेत तेव्हा सांभाळून.

गडावर रानमेवा विकणारे वाजवी दरात जिन्नस विकत असतात त्याचा लाभ घ्या.

गडावर भरपूर प्रमाणत दुकाने आहेत तिथे हलका फुलका आहार होऊ शकतो.

थोड्याच वेळात आपण गडावरील पठारावर पोहोचतो. इथून मनमोहक सुळका दिसण्यात सुरुवात होते. इथून डहाणू डोंगररांग आणि समुद्रापर्यंतचा विस्तृत नजारा दीसायला सुरुवात होते.

इथेच दोन वाटा फुटतात, एक मंदिराकडे जाते आणि दुसरी वाट ही सुळक्यावर जाते.
सुळक्याची चढाई फार कठीण आहे. आमचे लक्ष्य मंदिर होते म्हणून आम्ही जवळच मंदिरात गेलो, मंदिर हे गुहा सदृश्य जागेत आहे.

मंदिरातील मनसोक्त देवीचे दर्शन घेतले आणि परतिचा प्रवास सुरू केला.

या जागेची नियमित स्वच्छ्ता आणि निगराणी ठेवली जाते. त्यामुळे इथे कमालीची स्वच्छता आहे. गडावरील वातावरण इतके प्रसन्न आहे आणि उन्हाचा त्रास अजिबात झाला नाही.

तर मग अशा सुंदर जागी तुम्ही कधी भेट देणार.

ह्या व्हिडिओची लिंक खालील प्रमाणे, एकदा जरूर बघून घ्यावी आणि आपला अभिप्राय कळवावा ही विनंती.

YouTube video link:
https://youtu.be/491uXd2K72I

या मोहिमेत सहभागी झालेल्या समस्त पर्यटक मंडळीचे आभार, त्यांनी दिलेल्या समर्थनामुळे ही मोहीम फत्ते झाली.

ह्या मोहिमेत झालेला माणशी खर्च खालील प्रमाणे,

बोरिवली ते डहाणू ट्रेन तिकीट दोन्ही बाजूचे ५० रुपये
डहाणू डेपो ते रानशेत एसटी बस दोन्ही बाजूचे ५० रुपये
ऐकून खर्च १०० रुपये झाला.

जर आपल्याला असे विविधतेने नटलेले किंवा विशेष सहलीची ठिकाण, धबधबे, गुहा लेण्या, किल्ले, ट्रेक, hike किंवा मंदिरांची माहिती असेल तर आम्हाला जरूर कळवा, आम्हाला जरूर आवडेल भेट द्यायला.

मला अपेक्षा आहे आपल्याला माझा अनुभव लेख स्वरुपात आपणाला आवडला असेल. सोबत फोटो फेसबूक लिंक वर ऊपलब्ध आहेत, तरीपण आपणास सध्य परिस्थिती अनुभवायची असेल तर वरील दिलेल्या YouTube लिंकला नक्की क्लिक करून व्हिडिओ पहा, जर व्हीडिओ आवडला तर लाल सबस्क्राइब बटन दाबा, सोबत असलेल्या घंटेला क्लिक करून All हे बटन दाबा म्हणजे आमचे नियमित येणारे व्हिडिओ आपणास पाहण्यासाठी उपलब्ध होतील ते ही काहीही किंमत न मोजता.

Facebook page Simple Lifestyle Vlogs:
https://www.facebook.com/simplelifestylevlogs?mibextid=ZbWKwL

Instagram:
https://www.instagram.com/simplelifestyle.vlogs/

TTMM Simple Lifestyle Vlogs Facebook Group: https://facebook.com/groups/496676889311754/

माझे सगळे लिखाण Blog स्वरूपात: https://simplelifestylevlogs.blogspot.com/

Whatsapp Number: Nine Nine Six Seven One Five Two Nine Three Eight 99:67:1 5:29:38

जर आपल्याला या जागेची अधिक माहिती हवी असल्यास वरील नंबर वर WhatsApp मेसेज करा.

आपण आमच्या TTMM (कमीत कमी खर्च आणि भरपूर भ्रमंती) या मोफत उपक्रमात सहभागी होऊ इच्छित असाल तर मग दिलेल्या फोन नंबर वर WhatsApp मेसेज करा. फोन करू नका तो DND वर आहे, कोणीही फोन उचलणार नाही ह्याची नोंद घ्यावी. आमचे TTMM वर आधारित भरपूर व्हिडिओ YouTube Playlist वर उपलब्ध आहेत, ते लवकरच बघून घ्या आणि आमच्या फिरस्ती मध्ये सामील व्हा. आम्ही कोणतीही किंमत आकारात नाही ह्याची नोंद घ्या.

आमची टी टी एम एम ट्रेक बद्दलची संकल्पना समजून घेण्यासाठी खालील व्हिडिओ लिंकला क्लिक करून संपुर्ण माहिती मिळवा.
TTMM concept episode link: https://youtu.be/uiUPdLNxjBY

जर आपण स्वतः काही TTMM ट्रेक करत असाल तर मला WhatsApp मेसेज वर कळवा, माझे वेळेचे गणित जुळल्यास मला तुमच्या सोबत सहभाग घ्ययला आवडेल.

कळावे लोभ असावा,
आपलाच मित्र,
सिद्धेश पाटील
Simple Lifestyle Vlogs

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

रतनगडावर कारवी फुलली, रतनगड एक डोंगर दऱ्यामधे भटकलेला पण शेवटी पूर्ण केलेला मुंबई-रतनवाडी-मुंबई २४ तासाचा खडतर प्रवास.

गोवर्धन इको वीलेज, गलतारे, वाडा, पालघर

हरिहर गड / हर्षगड