किल्ले द्रोणागिरी - उरण, भर उन्ह्याळ्यात देखील जंगल संपदेमुळे आल्हाददायक असे वातावरण ही खासियत आहे या ट्रेकची


🚩🚩 सादर जय शिवराय🚩🚩

नमस्कार मंडळी🙏

तुम्हाला आत्तापर्यंत कळून चुकले असेल की भर उन्ह्याळ्यात आम्ही "ओपन टू स्काय" असे ट्रेक करत नाहीत, आम्ही उन्हाचा त्रास कमी होईल अशा ट्रेक किंवा तत्सम जागेच्या शोधात होतो. तेवढ्यात आमच्या Simple Lifestyle Vlogs ट्रेक ग्रुप वर सौ. अदिती पाटील, पनवेल यांची पोस्ट आली की द्रोणगिरी किल्ला करायचा आहे, मग आम्ही TTMM संकल्पनेच्या आधारावर हा ट्रेक करायचे असे ठरवले.

उरण हे एक छोटेखानी बेट स्वरूपाचे नाही पण तिन्ही बाजूला समुद्राचे पाणी असलेले ठिकाण. अगदी गेट वे ऑफ इंडियाच्या समोर आणि घारापुरी बेटाच्या शेजारी वसलेले गाव तरीपण फार महत्त्वाचा नवी मुंबईचा शेवटचा प्रभाग.

उरण हे तसे मूळ कोळी बांधवांचे गाव, खोल समुद्रामुळे भरपूर मोठ्या आकाराच्या बोटी इथे आहेत, त्यामुळे ताजे आणि मोठे मासे भरपूर प्रमाणात मिळतात अशी या जागेची ओळख आहे, अजून ठळक ओळख म्हणजे न्हावा शेवा गोदी बंदर जिथे जगभरातून समुद्रामार्गे सामानाची आयात आणि निर्यात केली जाते.

उरण बद्दल मला खास प्रचिती होती, भरपूर वर्ष उरण मला खुणावत होते पण भेट देण्याचा योग येत नव्हता, पण आज मौका मिळाला अदिती मॅडमने आयोजित केलेल्या ट्रेक मुळे. चला बकेट लिस्ट मधील एक चिठ्ठी कमी झाली त्यामुळे आनंदही द्विगुणित झाला.

असो, आपण ट्रेक बद्दल सविस्तर बोलू, आम्ही बोरिवली वरून दादर, कुर्ला, पनवेल असे ट्रेनने १.५ तास प्रवास केला, पनवेल डेपोतून पुढे एसटीने आम्ही उरण डेपो पर्यंत ४० मिनिटाचा प्रवास केला. दर २०-३० मिनिटांनी बस दोन्हि बाजूंनी एसटी उपलब्ध आहे.

उरण डेपो समोरच छोटेखानी डोंगर आणि त्यावर किल्ला दिसतो, बाले किल्ल्यावर भगवा फडकताना डेपोतूनपण दिसतो. गावात कुणालाही विचारले तर कोणीही रस्ता दाखवण्यास मदत करतो आणि ५-१० मिनिटातच ऐका गल्लीतून आपण मुख्य चढाईच्या डोंगराच्या पायथ्याशी पोहोचतो.

किल्ल्याचा रस्ता ही मळलेली पायवाट आहे, एखादा नवखा व्यक्ती पण जाऊ शकतो, डोंगर आणि किल्ला दोन्ही स्वच्छ आहे, कुठेही घाण कचरा नाही. काही ठिकाणी माहितीचे बोर्ड सह्याद्री प्रतिष्ठान यांनी लावले आहेत, ते नियमित स्वच्छता मोहीम राबवत असतात. किल्ल्याच्या बाजूला ONGC ची कंपनी आहे त्याचे चित्रीकरण करणे निषिध्द आहे याची नोंद घ्यावी.

डोंगर जरी छोटा असला तरी वाट सरळ नाही, ती किल्ल्याच्या मागच्या बाजूने आहे, करण पुढचा दरवाजा आणि गडाची वाट ही इंग्रजांनी जाता जाता नष्ट केली आहे. सलग ३०-४० अंशाचा चढ आहे. किल्ला समुद्रा बाजूला असल्यामुळे गरमी जाणवत नाही आणि खरे वारे सतत वाहत असतात. डोंगरावर भरपूर जंगली वृक्ष आहेत त्यामुळे बहुतेक रस्ता गर्द झाडांनी आच्छादित आहे ऊनाची झळ अजिबात लागत नाही. पक्षी संपदा देखील भरपूर आहे आणि वेगवेगळ्या ऋतुंमध्ये वेदेशी पाहुणे देखील दिसतात.

३० मिनिटात आपण किल्ल्याच्या मागच्या दरवाज्याने किल्ल्यात पोहोचतो. समोरच पोर्तुगीज कालीन चर्चची वास्तू आहे, बाजूला पाण्याच्या टाक्या देखील आहेत. गडावर काही तोफा आहेत, त्यातल्या एका तोफेला नुकताच गाडा बसवण्यात आला आहे.

चर्चच्या पुढे खाली एक पडकी वास्तू आहे त्यातूनच एक पायरीचा रस्ता किल्ल्याच्या मुख्य द्वारकडे जातो.

थोड्या दूरवर पडझड झालेला मुख्य दरवाज्याचे अवशेष दिसतात. दरवाज्याच्या दोन्ही बाजूला देवड्या आहेत, ऐका देवडीमध्ये गणपतीची मूर्ती ठेवली आहे. ह्या मूर्तीकडे बघून ही मूर्ती मंदिरातली नाही हे ठासून दिसते. कारण ही मूर्ती एकेकाळी मुख्य दरवाज्याच्या कमानिमध्ये स्थापित असावी. नंतर ती भग्न दरवाज्याच्या अवशेषात सापडली असावी आणि नंतर तिची तात्पुरती स्थापना केली असावी.

मुख्य दरवाज्याकडे एक वरच्या हाताला रस्ता जातो तिथून थोडे चालल्यानंतर डावी कडे एक रस्ता जातो, आपण आता द्रोणागिरी किल्ल्याचा डोंगर थोडा दक्षिणेकडे उतरतो आणि दुसऱ्या डोंगरावर चढतो इथे वेताळ देवाचे मंदिर आहे. बाजूलाच झुडपात करवंदाची जाळी होती थोडीफार करवंदे पण खायला मिळाली त्यात समाधान.

हा किल्ला छोटेखानी असला तरी, उन्हाळ्यात, पावसाळ्यात किंवा हिवाळ्यात कधीही करू शकता, कारण वातावरण अधिकच सुंदर आहे.

पावसाळ्यात इथे भरपूर धबधबे वाहतात त्यामुळे ती मजा काही औरच आहे.

या मोहिमेत सहभागी झालेल्या समस्त ट्रेकर मंडळीचे आभार, त्यांनी दिलेल्या समर्थनामुळे ही मोहीम फत्ते झाली.

ह्या व्हिडिओची लिंक खालील प्रमाणे, एकदा जरूर बघून घ्यावी आणि आपला अभिप्राय कळवावा ही विनंती.

YouTube video link:
https://youtu.be/evZSQFUOctI

ह्या मोहिमेत झालेला माणशी खर्च खालील प्रमाणे,

बोरिवली ते पनवेल ट्रेन तिकीट दोन्ही बाजूचे ४० रुपये
पनवेल डेपो ते उरण डेपो तिकीट दोन्ही बाजूचे १०० रुपये
ऐकून खर्च १४० रुपये झाला.

उरण इथे येण्यासाठी सीबीडी बेलापूरवरून पण बसेस उपलब्ध आहेत.

आपण भाऊचा धक्का ते मोरा बंदर असा प्रवास बोटिने ऐका बाजूचे तिकीट ८० रुपये असा देखील करू शकता. फेरी सेवा दर ३० मिनिटाला उपलब्ध आहे.

जर आपल्याला असे विविधतेने नटलेले किंवा विशेष सहलीची ठिकाण, धबधबे, गुहा लेण्या, किल्ले, ट्रेक, hike किंवा मंदिरांची माहिती असेल तर आम्हाला जरूर कळवा, आम्हाला जरूर आवडेल भेट द्यायला.

मला अपेक्षा आहे आपल्याला माझा अनुभव लेख स्वरुपात आपणाला आवडला असेल. सोबत फोटो फेसबूक लिंक वर ऊपलब्ध आहेत, तरीपण आपणास सध्य परिस्थिती अनुभवायची असेल तर वरील दिलेल्या YouTube लिंकला नक्की क्लिक करून व्हिडिओ पहा, जर व्हीडिओ आवडला तर लाल सबस्क्राइब बटन दाबा, सोबत असलेल्या घंटेला क्लिक करून All हे बटन दाबा म्हणजे आमचे नियमित येणारे व्हिडिओ आपणास पाहण्यासाठी उपलब्ध होतील ते ही काहीही किंमत न मोजता.

Facebook page Simple Lifestyle Vlogs:
https://www.facebook.com/simplelifestylevlogs?mibextid=ZbWKwL

Instagram:
https://www.instagram.com/simplelifestyle.vlogs/

TTMM Simple Lifestyle Vlogs Facebook Group: https://facebook.com/groups/496676889311754/

माझे सगळे लिखाण Blog स्वरूपात: https://simplelifestylevlogs.blogspot.com/ 

Whatsapp Number: Nine Nine Six Seven One Five Two Nine Three Eight 99:67:1 5:29:38

जर आपल्याला या जागेची अधिक माहिती हवी असल्यास वरील नंबर वर WhatsApp मेसेज करा. 

आपण आमच्या TTMM (कमीत कमी खर्च आणि भरपूर भ्रमंती) या मोफत उपक्रमात सहभागी होऊ इच्छित असाल तर मग दिलेल्या फोन नंबर वर WhatsApp मेसेज करा. फोन करू नका तो DND वर आहे, कोणीही फोन उचलणार नाही ह्याची नोंद घ्यावी. आमचे TTMM वर आधारित भरपूर व्हिडिओ YouTube Playlist वर उपलब्ध आहेत, ते लवकरच बघून घ्या आणि आमच्या फिरस्ती मध्ये सामील व्हा. आम्ही कोणतीही किंमत आकारात नाही ह्याची नोंद घ्या.

आमची टी टी एम एम ट्रेक बद्दलची संकल्पना समजून घेण्यासाठी खालील व्हिडिओ लिंकला क्लिक करून संपुर्ण माहिती मिळवा.
TTMM concept episode link: https://youtu.be/uiUPdLNxjBY

जर आपण स्वतः काही TTMM ट्रेक करत असाल तर मला WhatsApp मेसेज वर कळवा, माझे वेळेचे गणित जुळल्यास मला तुमच्या सोबत सहभाग घ्ययला आवडेल.

कळावे लोभ असावा,
आपलाच मित्र,
सिद्धेश पाटील
Simple Lifestyle Vlogs

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

रतनगडावर कारवी फुलली, रतनगड एक डोंगर दऱ्यामधे भटकलेला पण शेवटी पूर्ण केलेला मुंबई-रतनवाडी-मुंबई २४ तासाचा खडतर प्रवास.

गोवर्धन इको वीलेज, गलतारे, वाडा, पालघर

हरिहर गड / हर्षगड