स्वर्गरुपी धुक्यात हरवलेला श्री मलंग गड, कल्याण
स्वर्गरुपी धुक्यात हरवलेला श्री मलंग गड, कल्याण
🚩🚩जय शिवराय🚩🚩
🙏नमस्कार मंडळी🙏
पावसाळ्यातील आमचा हा पहिलाच ट्रेक तो ही ३२०० फूट उंचीचा.
उन्हाळ्यात फिरस्ती चांगलीच झाली पण उंच आणि लांब पल्ल्याचे गड किल्ले प्रकर्षाने टाळले होते.
आम्ही ऐका ग्रुप बरोबर ताहुलि या डोंगरावर जाणार होतो पण कल्याण मध्ये सकाळी वेळेत ६ वाजता पोहोचून सुध्दा मलंग गडाची बस मिळाली नाही. टॅक्सी मध्ये माणसे नव्हती, ऐकूण KDTC चा सावळा गोंधळ, आमचा दीड तास बस शोधण्यात फुकट गेला, असो.
आम्ही ज्यांच्या बरोबर जाणार होतो त्यांना सांगितले की तुम्ही तुमचा ट्रेक करा, आम्ही बघतो जमले तर तुम्हाला जॉईन करतो.
परंतु उशीर झाल्यामुळे आणि ताहुलीचा रस्ता माहिती नव्हता म्हणून आम्ही कळवले की आम्ही नाही येत आहोत आणि त्याच बस मधून मलंग गडाच्या पायथ्याशी पोहोचलो.
आम्ही ८.३० पर्यंत मलंग गडाच्या पायथ्याशी पोहोचलो.
एसटी डेपोच्या उजव्या बाजूने प्रशस्त पायऱ्यांची वाट सिमेंट काँक्रिट मध्ये बनवली आहे, तिला धरून चाल सुरू केली.
वाटेत चांगल्या पायऱ्या आहेत, वाटेच्या दुतर्फा भरपूर दुकान आहेत.
रस्त्यात माकडे भरपूर आहेत ती नेहमी त्रास देतात, तुम्ही काठी जवळ बाळगा. बॅगा छातीशी घ्या, पाठीवर नको.
माकडे बॅगा खेचतात हे काही नवीन नाही. लहान मुलांना सांभाळा.
आम्ही डेपो जवळ उतरलो तेव्हा पाऊस नव्हता, पण जस जसे वर चढू लागलो पावसाचा जोर वाढला. अर्धा गड चढलो तसा पाऊस, वारा वाढतच गेला आणि त्या बरोबर वाहणारे ते धुक की ढग हा प्रश्न मनाला पडू लागला.
धुक एवढ दाट होते की काही दिसेनासे झाले होते.
पाऊस थांबला, समोरचे ढग वाऱ्याबरोबर धाऊ लागले जणू पाठशिवणीचा खेळ चालू होता.
आता श्री मलंग गडाचा सुळका धूसर असा दिसू लागला नाहीतर तो लुप्त झाला होता धुक्यात.
आता पुढे आम्ही ट्रेन स्टेशन सोडून पुढे चालू लागलो.
जाताना वाटेत दोन देवींची मंदिर लागली. पण मंदिरात गेलो नाही कारण श्री मलंग गड गाठायचा होता.
वातावरण क्षणात बदलत होते, थोड ऊन, भरपूर वारा, भरपूर पाऊस आणि गच्च धुक असे अचानक बदल घडत होते जणू काही हिंदी सिनेमा चालू आहे समोर.
रामसे बंधूंच्या भुताच्या सिनेमांची आठवण झाली.
आता दर्ग्याचा परिसर चालू झाला, चहू बाजूंनी दुकाने, हॉटेल, राहण्याची व्यवस्था, मुल्ला मौलवी सगळे फिरत होते.
दर्गा जिथे दिसायला चालू होतो त्याच्या उजव्या बाजूला एक छोटा बोळ आहे, म्हणजे गल्ली, तिथे पोलिस स्टेशन आहे, बोर्ड ठळक अक्षरात दिसतो.
त्या गल्लीतून वर जायचे, झोपड्या संपल्या की प्रशस्त गड समोर उभा ठाकतो.
त्याला बघून जरा चक्रावलो मी, कारण सकाळ पासूनची मेहनत क्षणात क्षुद्र झाली. एवढे चाललो ते फुकट गेले, कारण भाला मोठा कातळी डोंगर उभा ठाकला होता.
असो, देवाचे नाव घेतले आणि परत चढ चालू केला.
इथे सावधान कारण माकडे सळो की पळो करून सोडतात.
सुरवातीचा रॉक पॅच निसरडा होता, पाऊस नुकताच झाला होता त्यामुळे कातळ भिजला होता. पाय सरकत होते.
तरीही हळू हळू वाट काढली, कातळ संपला मातीचा पॅच अत्यंत कठीण असा भासू लागला, इथेच आरव घाबरला, बोलला, परत जाऊ, कठीण वाटतंय, पण मी त्याला धीर दिला आणि पुढे मार्गस्थ झालो.
परत पावसाची रिपरिप सुरू झाली, झरे जोरात वाहू लागले, धुक, वारा चालू झाला.
आम्ही कसे बसे गुहे पर्यंत पोहोचलो.
बरेच दिवसांनी लाँग ट्रेक केला म्हणून, थकवा जाणवत होता.
पाऊस जोरात पडत होता, सगळीकडे धुकेच धुके जमले होते.
आम्ही आमचा खुरक खाल्ला, थोडी तरतरी आली. पण आरव गडावर जायला तयार नव्हता, बाले किल्ला दिसत होता, गणेश दरवाजा दिसत होता, पण पायऱ्या दिसत नव्हत्या.
मग आम्ही तिघांनी मिळून ठरवले की धुक कमी झालं की खाली उतरू.
वरती सगळ काही स्वप्नवत वाटत होते. अगदी स्वर्गात आल्या सारखे भासत होते.
मनाला प्रश्न पडत होता, हाच का तो स्वर्ग?
पाऊस थांबला, धुक ओसरले, आम्ही खाली उतरायला सुरुवात केली.
असा झाला अपूर्ण श्री मलंग गडाचा धुक्यात हरवलेला स्वप्नवत प्रवास.
कल्याण ते मलंग गड एसटी मुबलक प्रमाणात आहेत, दर ३० मिनिटांनी बस आहे.
आमचा हा ट्रेक वाजवी खर्चात झाला.
बोरिवली ते कल्याण परतिचे तिकीट ४० रुपये
कल्याण ते मलंग गड जाऊन येऊन ४० रुपये.
आमचा ऐकूण खर्च ८० रुपये झाला.
ही भटकंती आम्ही वाजवी खर्चात केला होता.
ह्या व्हिडिओची लिंक खालील प्रमाणे, एकदा जरूर बघून घ्यावी आणि आपला अभिप्राय कळवावा ही विनंती.
YouTube video link:
https://youtu.be/SZinaQc3Ttg
या मोहिमेत सहभागी झालेल्या समस्त ट्रेकर मंडळीचे आभार, त्यांनी दिलेल्या समर्थनामुळे ही मोहीम फत्ते झाली.
जर आपल्याला असे विविधतेने नटलेले किंवा विशेष सहलीची ठिकाण, धबधबे, गुहा लेण्या, किल्ले, ट्रेक, hike किंवा मंदिरांची माहिती असेल तर आम्हाला जरूर कळवा, आम्हाला जरूर आवडेल भेट द्यायला.
मला अपेक्षा आहे आपल्याला माझा अनुभव लेख स्वरुपात आपणाला आवडला असेल. सोबत फोटो फेसबूक लिंक वर ऊपलब्ध आहेत, तरीपण आपणास सध्य परिस्थिती अनुभवायची असेल तर वरील दिलेल्या YouTube लिंकला नक्की क्लिक करून व्हिडिओ पहा, जर व्हीडिओ आवडला तर लाल सबस्क्राइब बटन दाबा, सोबत असलेल्या घंटेला क्लिक करून All हे बटन दाबा म्हणजे आमचे नियमित येणारे व्हिडिओ आपणास पाहण्यासाठी उपलब्ध होतील ते ही काहीही किंमत न मोजता.
Facebook page Simple Lifestyle Vlogs:
https://www.facebook.com/simplelifestylevlogs?mibextid=ZbWKwL
Instagram:
https://www.instagram.com/simplelifestyle.vlogs/
TTMM Simple Lifestyle Vlogs Facebook Group: https://facebook.com/groups/496676889311754/
माझे सगळे लिखाण Blog स्वरूपात: https://simplelifestylevlogs.blogspot.com/
Whatsapp Number: Nine Nine Six Seven One Five Two Nine Three Eight 99:67:1 5:29:38
जर आपल्याला या जागेची अधिक माहिती हवी असल्यास वरील नंबर वर WhatsApp मेसेज करा.
आपण आमच्या TTMM (कमीत कमी खर्च आणि भरपूर भ्रमंती) या मोफत उपक्रमात सहभागी होऊ इच्छित असाल तर मग दिलेल्या फोन नंबर वर WhatsApp मेसेज करा. फोन करू नका तो DND वर आहे, कोणीही फोन उचलणार नाही ह्याची नोंद घ्यावी. आमचे TTMM वर आधारित भरपूर व्हिडिओ YouTube Playlist वर उपलब्ध आहेत, ते लवकरच बघून घ्या आणि आमच्या फिरस्ती मध्ये सामील व्हा. आम्ही कोणतीही किंमत आकारात नाही ह्याची नोंद घ्या.
आमची टी टी एम एम ट्रेक बद्दलची संकल्पना समजून घेण्यासाठी खालील व्हिडिओ लिंकला क्लिक करून संपुर्ण माहिती मिळवा.
TTMM concept episode link: https://youtu.be/uiUPdLNxjBY
जर आपण स्वतः काही TTMM ट्रेक करत असाल तर मला WhatsApp मेसेज वर कळवा, माझे वेळेचे गणित जुळल्यास मला तुमच्या सोबत सहभाग घ्ययला आवडेल.
कळावे लोभ असावा,
आपलाच मित्र,
सिद्धेश पाटील
Simple Lifestyle Vlogs
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा