पोस्ट्स

सप्टेंबर, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

बहुचर्चित असा KP धबधबा, खोपोलीच्या डोंगरात रेल्वे ब्रीज पल्याड आपल्याला उघड्या डोळ्यांनीसुद्धा दिसतो.

नमस्कार मंडळी🙏 KP धबधबा हा फार कमी वेळातच प्रसीद्धिच्या झोतात आला आहे. मला पण तो खुणावत होता. आपण कधी ना कधी काही कारणास्तव लोणावळा, खंडाळा, पुणे, सोलापूर, कोल्हापूर किंवा त्यापलीकडील प्रभगास रेल्वेने भेट देतो तेव्हा खोपोली मधील या धबधब्याचे दर्शन परतीच्या प्रवासात अगदी जवळून होते. तसा तो खोपोली लोकल मधून पण अगदी ठळकपणे समोरच्या डोंगरात आपल्याला दिसतो. दिमागात उभा असलेला हा धबधबा असंख्य मंडळींना वेड लाऊन जातो नुसतेच मुंबईतून नाही तर संपूर्ण भारतातून पर्यटक इथला रस्ता शोधून पावसाळ्यात भेट देत असतात. या धबधब्याला भेट देण्यापूर्वी आमच्या TTMM ग्रुपला सक्त तकित दिली होती की ट्रेकिंग शूज आणि फुल पँट सक्तीचे आहे. कारण इथले जंगल घनदाट आहे अगदी झाडे, झुडपे आणि गवत सारखे अंगाला घासून जाते, थेट १० ते १५ फूट पर्यंत वाढलेलं आहे. काही ठिकाणी चालण्याची वाट सुधा दिसत नाही. अशा ठिकाणी साप असल्याची शक्यता अधिकच बळावते. आम्ही पहाटेची पहिली खोपोली लोकल पकडुन खोपोली गाठून पायथ्याचे गाव ठाकूरवाडी मधील दत्त मंदिर या ठिकाणी भेटलो. आमचे ट्रेकर मित्र काही मुंबईतून, तर काही थेट पुण्यातून आले होतो, आमची...

झेनिथ धबधबा, खोपोलीच्या कुशीत लपलेला, महाकाय जलप्रपोत ओकणारा आक्राळ विक्राळ धबधबा

नमस्कार मंडळी🙏 महाराष्ट्रातील बहुतेक धबधबे पावसाळ्यात कार्यरत असतात म्हणून त्यांची मजा वेळीस घेतलेली बरी. आम्ही TTMM तत्वावर खोपोलीतील झेनित धबधब्याला भेट देण्याचे ठरवले. पहाटे ३ वाजता उठून आम्ही दादर वरून ४.४८ची पहिली खोपोली लोकल पकडली जीने आम्हाला ७.१०ला खोपोलीमध्ये पोहोचवले. पुढे गावातील लोकांशी पोलिस नाहीत याची खातरजमा केली आणि पुढे मार्गस्थ झालो. आम्ही कृष्णा व्हॅली या हौसिंग कॉलोनीच्या गेटच्या बाजूंनी अरुंद वाटेने नदीच्या पत्रात येऊन पोहोचलो. थोडे चालल्यानंतर गावातील स्त्रिया कपडे भांडी धुताना दिसल्या, त्यांच्याकडून रस्त्याची माहिती घेतली आणि पुढे मार्गस्थ झालो. वाटेत नदि रुपी ओहळ दोन ते तीन ठिकाणी ओलांडावा लागतो. नंतर दाट असे अरण्य चालू होते, मला भीती होती सापांची पण ऐकाचेही दर्शन झाले नाही. पण इथली वन्य संपदा भरपूर आहे, भरपूर पक्षी शिळ घालत होते आणि माणूस जसा मोठाली शिट्टी मरतो अगदी तस्सा. हिरवाईने नटलेला निसर्ग त्यामागे दिसणारा सह्याद्री आणि त्याच्या खांद्यावरील असंख्य असे धबधबे. हे सगळे बघून मन प्रसन्न झाले. जसे धबधब्याजवळ जात होतो, जल प्रपोताचा आवाज तीव्र होत होता...

"सखे-सोबती" ग्रुप ची पावसाळी सहल, चोंडे गावातील घाटघर धबधबा

नमस्कार मंडळी🙏 सखे सोबती या ग्रुपची सहल दर वर्षी पावसाळ्यात असते, त्यांचे महाविद्यालयातील सगळे मित्र मैत्रिणी यानिमित्ताने वर्षातून एकदा तरी भेटत असतात. आम्ही पण त्यात जसा वेळ मिळेल तसे सहभागी होतो. हे माझे तिसरे वर्ष त्यांच्या सोबत पावसाळी सहल अनुभवायचे. ही सहल TTMM याच मुद्द्यावर आधारित असते अगदी वाजवी खर्चात सगळ्यांना परवडेल अशा बजेट मध्ये ती आखलेली असते, ही या सहलीईची विशेषता. आम्ही सकाळी ६ वाजता आमचा प्रवास प्रायव्हेट बसने बोरिवली इथून सुरू केला. प्रवासात आमच्या मनोरंजनाची सोय इस्तंभुत केली होती, आमच्या मित्रमंडळाचे होतकरू गायक आपली गाण्याची लकब कराओके music सोबत गाण्याच्या भेंड्यानसोबत सादर करत होते. त्यातच काही मंडळी गाण्याच्या तालावर डान्सचा ठेका धरत होते. प्रवास एकदम सुखकर होत होता. अशातच वाशिंद ला पोहोचलो कळलेच नाही. वाटेत वशिंद इथे आम्हाला नाश्ता आणि चहा यांची सोय केली होती. सुंदर हिरवळीने भरलेल्या कुरणा समोर पण रस्त्यालगत गरम गरम चहा आणि कांदापोहे असा फक्कड नाश्ता झाला, जरा नजर वर केली तर क्षितिजावर वजीर सुळका आणि त्यामागे माहुली किल्ला दिसत होता, मनोहारी दृश्य होते ते...