झेनिथ धबधबा, खोपोलीच्या कुशीत लपलेला, महाकाय जलप्रपोत ओकणारा आक्राळ विक्राळ धबधबा
नमस्कार मंडळी🙏
महाराष्ट्रातील बहुतेक धबधबे पावसाळ्यात कार्यरत असतात म्हणून त्यांची मजा वेळीस घेतलेली बरी.
आम्ही TTMM तत्वावर खोपोलीतील झेनित धबधब्याला भेट देण्याचे ठरवले.
पहाटे ३ वाजता उठून आम्ही दादर वरून ४.४८ची पहिली खोपोली लोकल पकडली जीने आम्हाला ७.१०ला खोपोलीमध्ये पोहोचवले.
पुढे गावातील लोकांशी पोलिस नाहीत याची खातरजमा केली आणि पुढे मार्गस्थ झालो.
आम्ही कृष्णा व्हॅली या हौसिंग कॉलोनीच्या गेटच्या बाजूंनी अरुंद वाटेने नदीच्या पत्रात येऊन पोहोचलो.
थोडे चालल्यानंतर गावातील स्त्रिया कपडे भांडी धुताना दिसल्या, त्यांच्याकडून रस्त्याची माहिती घेतली आणि पुढे मार्गस्थ झालो.
वाटेत नदि रुपी ओहळ दोन ते तीन ठिकाणी ओलांडावा लागतो.
नंतर दाट असे अरण्य चालू होते, मला भीती होती सापांची पण ऐकाचेही दर्शन झाले नाही. पण इथली वन्य संपदा भरपूर आहे, भरपूर पक्षी शिळ घालत होते आणि माणूस जसा मोठाली शिट्टी मरतो अगदी तस्सा. हिरवाईने नटलेला निसर्ग त्यामागे दिसणारा सह्याद्री आणि त्याच्या खांद्यावरील असंख्य असे धबधबे. हे सगळे बघून मन प्रसन्न झाले.
जसे धबधब्याजवळ जात होतो, जल प्रपोताचा आवाज तीव्र होत होता. जसे जवळ जात होतो तसाच तो आवाज अजूनच तीव्र होत होता आणि अचानक झाडामागुन रुद्रावतार घेतलेला महाकाय असा धबधबा दिसू लागला. आज पणी शुभ्र फेसळणारे होते, वारा तर एवढा की कड्यावरून पणी खाली येताच त्याचे तुषार तयार होत होते. संपूर्ण जागेत अशी कोणतीच जागा नव्हती की आपण निवांत बसून किंवा उभ राहून फोटो काढू शकत होतो. तो अनुभव काही वेगळाच होता. भरपूर धबधबे पाहिले पण या सम एकही नाही. मागच्या वर्षी डिकसळ धबधब्याला गेलो होतो तेव्हा पण असाच थरार अनुभवला होता पण त्याची उंची कमी होती.
धबधब्या खाली उभे राहून फोटो काढण्याचा मोह टाळला, कारण ते शक्य नव्हते. तरीपण आम्ही प्रयत्न करून थोडेफार फोटो काढले.
हा भन्नाट अनुभव शब्दात व्यक्त करता येण्याजोगा नाही, त्यामुळे व्हिडिओची लिंक दिली आहे तो व्हिडिओ एकदा बघून घ्या आणि अनुभवा ही विनंती आणि आपला अभिप्राय नक्की कळवावा ही विनंती.
YouTube video link:
https://youtu.be/DhOMLDa_Cfc
या ट्रेकमध्ये सहभागी झालेल्या समस्त ट्रेकर मंडळीचे आभार, त्यांनी दिलेल्या समर्थनामुळे हा ट्रेक पूर्ण झाला.
जर आपल्याला असे विविधतेने नटलेले किंवा विशेष सहलीची ठिकाण, धबधबे, गुहा लेण्या, किल्ले, ट्रेक, hike किंवा मंदिरांची माहिती असेल तर आम्हाला जरूर कळवा, आम्हाला जरूर आवडेल भेट द्यायला.
मला अपेक्षा आहे आपल्याला माझा अनुभव लेख स्वरुपात आपणाला आवडला असेल. सोबत फोटो फेसबूक लिंक वर ऊपलब्ध आहेत, तरीपण आपणास सध्य परिस्थिती अनुभवायची असेल तर वरील दिलेल्या YouTube लिंकला नक्की क्लिक करून व्हिडिओ पहा, जर व्हीडिओ आवडला तर लाल सबस्क्राइब बटन दाबा, सोबत असलेल्या घंटेला क्लिक करून All हे बटन दाबा म्हणजे आमचे नियमित येणारे व्हिडिओ आपणास पाहण्यासाठी उपलब्ध होतील ते ही काहीही किंमत न मोजता.
Facebook page Simple Lifestyle Vlogs:
https://www.facebook.com/simplelifestylevlogs?mibextid=ZbWKwL
Borivali Hikers:
https://facebook.com/groups/509955217958785/
Instagram:
https://www.instagram.com/simplelifestyle.vlogs/
TTMM Simple Lifestyle Vlogs Facebook Group: https://facebook.com/groups/496676889311754/
माझे सगळे लिखाण Blog स्वरूपात: https://simplelifestylevlogs.blogspot.com/
Whatsapp Number: Nine Nine Six Seven One Five Two Nine Three Eight 99:67:1 5:29:38
जर आपल्याला या जागेची अधिक माहिती हवी असल्यास वरील नंबर वर WhatsApp मेसेज करा.
आपण आमच्या TTMM (कमीत कमी खर्च आणि भरपूर भ्रमंती) या मोफत उपक्रमात सहभागी होऊ इच्छित असाल तर मग दिलेल्या फोन नंबर वर WhatsApp मेसेज करा. फोन करू नका तो DND वर आहे, कोणीही फोन उचलणार नाही ह्याची नोंद घ्यावी. आमचे TTMM वर आधारित भरपूर व्हिडिओ YouTube Playlist वर उपलब्ध आहेत, ते लवकरच बघून घ्या आणि आमच्या फिरस्ती मध्ये सामील व्हा. आम्ही कोणतीही किंमत आकारात नाही ह्याची नोंद घ्या.
आमची टी टी एम एम ट्रेक बद्दलची संकल्पना समजून घेण्यासाठी खालील व्हिडिओ लिंकला क्लिक करून संपुर्ण माहिती मिळवा.
TTMM concept episode link: https://youtu.be/uiUPdLNxjBY
जर आपण स्वतः काही TTMM ट्रेक करत असाल तर मला WhatsApp मेसेज वर कळवा, माझे वेळेचे गणित जुळल्यास मला तुमच्या सोबत सहभाग घ्ययला आवडेल.
कळावे लोभ असावा,
आपलाच मित्र,
सिद्धेश पाटील
Simple Lifestyle Vlogs
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा