"सखे-सोबती" ग्रुप ची पावसाळी सहल, चोंडे गावातील घाटघर धबधबा

नमस्कार मंडळी🙏

सखे सोबती या ग्रुपची सहल दर वर्षी पावसाळ्यात असते, त्यांचे महाविद्यालयातील सगळे मित्र मैत्रिणी यानिमित्ताने वर्षातून एकदा तरी भेटत असतात. आम्ही पण त्यात जसा वेळ मिळेल तसे सहभागी होतो. हे माझे तिसरे वर्ष त्यांच्या सोबत पावसाळी सहल अनुभवायचे.

ही सहल TTMM याच मुद्द्यावर आधारित असते अगदी वाजवी खर्चात सगळ्यांना परवडेल अशा बजेट मध्ये ती आखलेली असते, ही या सहलीईची विशेषता.

आम्ही सकाळी ६ वाजता आमचा प्रवास प्रायव्हेट बसने बोरिवली इथून सुरू केला. प्रवासात आमच्या मनोरंजनाची सोय इस्तंभुत केली होती, आमच्या मित्रमंडळाचे होतकरू गायक आपली गाण्याची लकब कराओके music सोबत गाण्याच्या भेंड्यानसोबत सादर करत होते. त्यातच काही मंडळी गाण्याच्या तालावर डान्सचा ठेका धरत होते. प्रवास एकदम सुखकर होत होता. अशातच वाशिंद ला पोहोचलो कळलेच नाही.

वाटेत वशिंद इथे आम्हाला नाश्ता आणि चहा यांची सोय केली होती. सुंदर हिरवळीने भरलेल्या कुरणा समोर पण रस्त्यालगत गरम गरम चहा आणि कांदापोहे असा फक्कड नाश्ता झाला, जरा नजर वर केली तर क्षितिजावर वजीर सुळका आणि त्यामागे माहुली किल्ला दिसत होता, मनोहारी दृश्य होते ते. असो नाश्ता संपउन पुढचा प्रवास चालू केला.

आमचा सकाळचा नाश्ता, दुपारचे जेवण आणि संध्याकाळचा नाश्ता असे सगळे कॉन्ट्रॅक्ट आम्ही राकेश या व्यक्तीला देतो आणि तो त्याची जिम्मेदारी वाजवी किमतीत चोख पणे पार पाडतो.

पुढे घाटघरला पोहोचलो पण पोलिसांनी पुढे सोडले नाही, तसे या विभागात धबधब्यांची कमी नाही, तरीपण घाटघर धरणाच्या जवळच, उंच डोंगरातून एक धबधबा दिसला, आम्ही आधी पुढे जाऊन शहानिशा केली की काही कठीण घासरण तर नाही ना, कारण सोबत लहान मुले आणि इतर मंडळी जी जास्त डोंगरात फिरत नाहीत अशीच होती, जागा उत्तम होती, हिरवा कंदील मिळताच एका मिनिटामध्ये बस खाली झाली.

ही जागा बघून मला काही वर्षांपूर्वी मार्लेश्वर धबधब्यांची आठवण झाली, कारण इथेपण तसेच मोठाले डोंगर मान वर करून बघावे लागत होते, धबधबा लहान होता पण पुरेसा असा होते.

मधेच पाऊस, थोडे ऊन, तर कधी ढगाळ वातावरण, असा श्रावणातला पाठशिवणीचा खेळ सतत चालू होता. धुके तर एवढे होते की डोंगर माथा गायब झाला होता, ते धुक होते की पावसाचे ढग हेच समजेनासे झाले होते. अशी काही परिस्थिती आम्ही श्री मलंग गडावर गेलो तेंव्हा पाहायला मिळाली होती.

या सगळ्या गोंधळात ऐका मित्राची सोन्याची चैन पाण्यात पडली, कशी, कुठे पडली ते ठाऊक नाही. जेव्हा कळले तेव्हा सगळे पाण्यात शोधत होते, पाणी जोरात वाहत होते, पण ते आरस्पानी होते, ती चैन आमच्यातल्या एका व्यक्तीला मिळाली हे सुदैव. सांगायचे तात्पर्य एवढेच की अशा ठिकाणी कोणतीही मौल्यवान वास्तू घालून येऊ नका.

वेळ कसा गेला ते कळलच नाही, दुपारची जेवणाची वेळ निघून गेली, तरी आम्ही सगळे धबधब्यात मनसोक्त खेळत होतो. दुपारी जेवणात श्रावण चालू असल्यामुळे छोले, भात, तळलेले पापड आणि गोड असा काळा जमून होता, खेळून दमलो असल्यामुळे भरपूर मनसोक्त जेवलो आणि पुन्हा पाण्यात उतरलो, यावेळी जरा चांगलेच दरीत उतरल्यावर चांगला असा धबधब्याची जागा मिळाली, मस्त फोटो काढून घेतले आणि परतीचा प्रवास चालू केला.

संध्याकाळी वाशींदला गरम गरम वडे पाव आणि चहा असा बेत होता. नाश्ता झाला प्रवास चालू केला, गर्दी कमी असल्यामुळे आम्ही सगळे वेळेत घरी पोहोचलो.

आमची पावसाळी सहल ऐकदम मस्त झाली.

ह्या अनुभवरुपी व्हिडिओची लिंक खालील प्रमाणे दिली आहे, एकदा जरूर बघून घ्यावी आणि आपला अभिप्राय कळवावा ही विनंती.

YouTube video link:
https://youtu.be/4VLjvaIybjc

या सहलीत सहभागी झालेल्या समस्त मंडळीचे आभार, त्यांनी दिलेल्या समर्थनामुळे ही सहल पूर्ण झाली.

जर आपल्याला असे विविधतेने नटलेले किंवा विशेष सहलीची ठिकाण, धबधबे, गुहा लेण्या, किल्ले, ट्रेक, hike किंवा मंदिरांची माहिती असेल तर आम्हाला जरूर कळवा, आम्हाला जरूर आवडेल भेट द्यायला.

मला अपेक्षा आहे आपल्याला माझा अनुभव लेख स्वरुपात आपणाला आवडला असेल. सोबत फोटो फेसबूक लिंक वर ऊपलब्ध आहेत, तरीपण आपणास सध्य परिस्थिती अनुभवायची असेल तर वरील दिलेल्या YouTube लिंकला नक्की क्लिक करून व्हिडिओ पहा, जर व्हीडिओ आवडला तर लाल सबस्क्राइब बटन दाबा, सोबत असलेल्या घंटेला क्लिक करून All हे बटन दाबा म्हणजे आमचे नियमित येणारे व्हिडिओ आपणास पाहण्यासाठी उपलब्ध होतील ते ही काहीही किंमत न मोजता.

Facebook page Simple Lifestyle Vlogs:
https://www.facebook.com/simplelifestylevlogs?mibextid=ZbWKwL

Borivali Hikers:
https://facebook.com/groups/509955217958785/

Instagram:
https://www.instagram.com/simplelifestyle.vlogs/

TTMM Simple Lifestyle Vlogs Facebook Group: https://facebook.com/groups/496676889311754/

माझे सगळे लिखाण Blog स्वरूपात: https://simplelifestylevlogs.blogspot.com/

Whatsapp Number: Nine Nine Six Seven One Five Two Nine Three Eight 99:67:1 5:29:38

जर आपल्याला या जागेची अधिक माहिती हवी असल्यास वरील नंबर वर WhatsApp मेसेज करा.

आपण आमच्या TTMM (कमीत कमी खर्च आणि भरपूर भ्रमंती) या मोफत उपक्रमात सहभागी होऊ इच्छित असाल तर मग दिलेल्या फोन नंबर वर WhatsApp मेसेज करा. फोन करू नका तो DND वर आहे, कोणीही फोन उचलणार नाही ह्याची नोंद घ्यावी. आमचे TTMM वर आधारित भरपूर व्हिडिओ YouTube Playlist वर उपलब्ध आहेत, ते लवकरच बघून घ्या आणि आमच्या फिरस्ती मध्ये सामील व्हा. आम्ही कोणतीही किंमत आकारात नाही ह्याची नोंद घ्या.

आमची टी टी एम एम ट्रेक बद्दलची संकल्पना समजून घेण्यासाठी खालील व्हिडिओ लिंकला क्लिक करून संपुर्ण माहिती मिळवा.
TTMM concept episode link: https://youtu.be/uiUPdLNxjBY

जर आपण स्वतः काही TTMM ट्रेक करत असाल तर मला WhatsApp मेसेज वर कळवा, माझे वेळेचे गणित जुळल्यास मला तुमच्या सोबत सहभाग घ्ययला आवडेल.

कळावे लोभ असावा,
आपलाच मित्र,
सिद्धेश पाटील
Simple Lifestyle Vlogs

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

एक अनवट वाट तांदूळवाडी गडाची

भला मोठा तांदूळवाडी / लालठाणे धबधबा, तांदूळवाडी गाडाखाली, सफाळे

OFFBEAT Trekers ने TTMM तत्वावर आयोजित केलेली नाणेघाट ते भीमाशंकर ७० Km मधील पहिला टप्पा नाणेघाट ते आंबोली