बहुचर्चित असा KP धबधबा, खोपोलीच्या डोंगरात रेल्वे ब्रीज पल्याड आपल्याला उघड्या डोळ्यांनीसुद्धा दिसतो.


नमस्कार मंडळी🙏

KP धबधबा हा फार कमी वेळातच प्रसीद्धिच्या झोतात आला आहे. मला पण तो खुणावत होता.

आपण कधी ना कधी काही कारणास्तव लोणावळा, खंडाळा, पुणे, सोलापूर, कोल्हापूर किंवा त्यापलीकडील प्रभगास रेल्वेने भेट देतो तेव्हा खोपोली मधील या धबधब्याचे दर्शन परतीच्या प्रवासात अगदी जवळून होते. तसा तो खोपोली लोकल मधून पण अगदी ठळकपणे समोरच्या डोंगरात आपल्याला दिसतो.

दिमागात उभा असलेला हा धबधबा असंख्य मंडळींना वेड लाऊन जातो नुसतेच मुंबईतून नाही तर संपूर्ण भारतातून पर्यटक इथला रस्ता शोधून पावसाळ्यात भेट देत असतात.

या धबधब्याला भेट देण्यापूर्वी आमच्या TTMM ग्रुपला सक्त तकित दिली होती की ट्रेकिंग शूज आणि फुल पँट सक्तीचे आहे. कारण इथले जंगल घनदाट आहे अगदी झाडे, झुडपे आणि गवत सारखे अंगाला घासून जाते, थेट १० ते १५ फूट पर्यंत वाढलेलं आहे. काही ठिकाणी चालण्याची वाट सुधा दिसत नाही. अशा ठिकाणी साप असल्याची शक्यता अधिकच बळावते.

आम्ही पहाटेची पहिली खोपोली लोकल पकडुन खोपोली गाठून पायथ्याचे गाव ठाकूरवाडी मधील दत्त मंदिर या ठिकाणी भेटलो.

आमचे ट्रेकर मित्र काही मुंबईतून, तर काही थेट पुण्यातून आले होतो, आमची पुण्याची दुसरी टीम रेल्वे मार्गाने आम्हाला थेट धबधब्यावर भेटणार होती.

आम्ही ट्रेक चालू केला, मंदिराच्या समोर वडाचे झाड आहे, तिथून पायवाट धरली. लगेचच एक लहानसा ओहळ वाटेत लागला.

पुढे सगळे सागाच्या झाडांच बन आहे, मध्येच झुडपे आहेत. पायवाटा तर असंख्य आहेत, हे सगळे जरा संभ्रमात टाकणारेच आहे. आम्ही हळू हळू मार्गक्रमण करत होतो.

गर्द झाडी अंगाला ओरखडा पाडेल अशी वाटेत खेटून उभी आहेत. पायवाट बघू, जंगल बघू की दबा धरून बसलेल्या सापाला बघू अशी आमची अवस्था झाली होती. तरीपण त्याचा सामना करत करत चाल पुढे कायम ठेवली.

पुढे जंगल संपून खडा पहाड उभा दिसतो, हा डोंगर विशेष आहे, इथे खडी चढाई आहे, इथे कातळात कोरलेल्या थोड्या पायऱ्या आपल्याला दिसतात. पावसाची रिपरिप मध्येच चालू होतीच, वाट निसरडी होती. अगदी अर्धा फूट एवढीच वाट जेमतेम आपण पाय ठेऊन उभे राहू शकतो एवढी.

पाऊस जोरात असेल तर या स्थानाला भेट देऊ नका, जीवाला धोका संभऊ शकतो.

पुढे थोडेफार कुरणाचे गवताळ माळरान आणि वरतून दिसणारा खोपोली गावाचा अदभुत नजारा अगदी खंडाळा पण नजरेच्या टप्प्यात येतो.

थोड पुढे गेलो की परत जंगली पट्टा चालू होतो, इथे जंगली पक्षी सतत शीळ घालत असतात अगदी मन मोहून जाते.

लगेचच पुढे लांबवर असलेल्या रेल्वे ब्रिजचे दर्शन घडते, इथे भरपूर धबधबे दिसतात, तो नजारा देखील अदभुत आहे.

पुढे एक छोटा धबधबा लागतो तो ओलांडून आपल्याला पुढे जायचे आहे. त्या पुढे सगळा गवताळ भाग अगदी १०-१५ फूट वाढलेल आहे. इथे सांभाळून चला कारण खालील जमीन भुसभुशीत आहे, काही ठिकाणी जमीन धासलेली सुध्दा आहे. तेव्हा जरा जपून आणि लक्ष देऊन चला.

सरते शेवटी आम्ही एकदाचे धबधब्याजवळ पोहोचलो.

महाकाय असा सुंदर धबधबा कोसळत होता तो न्याहाळताना वेळ कसा जातो ते कळतच नाही. त्यावर लगेचच ऐका मागोमाग ट्रेन यायला सुरुवात होते.

समोरच्या कपारीतून रेल्वेचे दृश्य बघण्यात जी मज्जा आहे ती शब्दात सांगता येणार नाही.

हा भन्नाट अनुभव शब्दात व्यक्त करता येण्याजोगा नाही, त्यामुळे व्हिडिओची लिंक दिली आहे तो व्हिडिओ एकदा बघून घ्या आणि अनुभवा ही विनंती आणि आपला अभिप्राय नक्की कळवावा ही विनंती.

YouTube video link:
https://youtu.be/I_A1ADZquio

या सहलीत सहभागी झालेल्या समस्त मंडळीचे आभार, त्यांनी दिलेल्या समर्थनामुळे हा ट्रेक पूर्ण झाला.

जर आपल्याला असे विविधतेने नटलेले किंवा विशेष सहलीची ठिकाण, धबधबे, गुहा लेण्या, किल्ले, ट्रेक, hike किंवा मंदिरांची माहिती असेल तर आम्हाला जरूर कळवा, आम्हाला जरूर आवडेल भेट द्यायला.

मला अपेक्षा आहे आपल्याला माझा अनुभव लेख स्वरुपात आपणाला आवडला असेल. सोबत फोटो फेसबूक लिंक वर ऊपलब्ध आहेत, तरीपण आपणास सध्य परिस्थिती अनुभवायची असेल तर वरील दिलेल्या YouTube लिंकला नक्की क्लिक करून व्हिडिओ पहा, जर व्हीडिओ आवडला तर लाल सबस्क्राइब बटन दाबा, सोबत असलेल्या घंटेला क्लिक करून All हे बटन दाबा म्हणजे आमचे नियमित येणारे व्हिडिओ आपणास पाहण्यासाठी उपलब्ध होतील ते ही काहीही किंमत न मोजता.

Facebook page Simple Lifestyle Vlogs:
https://www.facebook.com/simplelifestylevlogs?mibextid=ZbWKwL

Borivali Hikers:
https://facebook.com/groups/509955217958785/

Instagram:
https://www.instagram.com/simplelifestyle.vlogs/

TTMM Simple Lifestyle Vlogs Facebook Group: https://facebook.com/groups/496676889311754/

माझे सगळे लिखाण Blog स्वरूपात: https://simplelifestylevlogs.blogspot.com/

Whatsapp Number: Nine Nine Six Seven One Five Two Nine Three Eight 99:67:1 5:29:38

जर आपल्याला या जागेची अधिक माहिती हवी असल्यास वरील नंबर वर WhatsApp मेसेज करा.

आपण आमच्या TTMM (कमीत कमी खर्च आणि भरपूर भ्रमंती) या मोफत उपक्रमात सहभागी होऊ इच्छित असाल तर मग दिलेल्या फोन नंबर वर WhatsApp मेसेज करा. फोन करू नका तो DND वर आहे, कोणीही फोन उचलणार नाही ह्याची नोंद घ्यावी. आमचे TTMM वर आधारित भरपूर व्हिडिओ YouTube Playlist वर उपलब्ध आहेत, ते लवकरच बघून घ्या आणि आमच्या फिरस्ती मध्ये सामील व्हा. आम्ही कोणतीही किंमत आकारात नाही ह्याची नोंद घ्या.

आमची टी टी एम एम ट्रेक बद्दलची संकल्पना समजून घेण्यासाठी खालील व्हिडिओ लिंकला क्लिक करून संपुर्ण माहिती मिळवा.
TTMM concept episode link: https://youtu.be/uiUPdLNxjBY

जर आपण स्वतः काही TTMM ट्रेक करत असाल तर मला WhatsApp मेसेज वर कळवा, माझे वेळेचे गणित जुळल्यास मला तुमच्या सोबत सहभाग घ्ययला आवडेल.

कळावे लोभ असावा,
आपलाच मित्र,
सिद्धेश पाटील
Simple Lifestyle Vlogs

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

एक अनवट वाट तांदूळवाडी गडाची

भला मोठा तांदूळवाडी / लालठाणे धबधबा, तांदूळवाडी गाडाखाली, सफाळे

OFFBEAT Trekers ने TTMM तत्वावर आयोजित केलेली नाणेघाट ते भीमाशंकर ७० Km मधील पहिला टप्पा नाणेघाट ते आंबोली