एक अनवट वाट तांदूळवाडी गडाची
एक अनवट वाट तांदूळवाडी गडाची नमस्कार मंडळी, तांदूळवाडी गड हा तसा आपल्या सगळ्यांच्याच परिचयाचा, मुंबई जवळ, अगदी हाकेच्या अंतरावरच आहे तो, कमी खर्चिक बाब असा अगदी 100 रुपयात आपला प्रवास खर्च भागून जातो. सकाळच्या 5.45 आणि 6 अशा लागोपाठ दोन लोकल गाड्या डहाणू कडे जातात, ज्या सफाळ्याला 7 वाजता पोहोचतात. सफाळा स्टेशन बाहेर पूर्वेकडे एसटी बस उभीच असते, एसटी आपल्याला 20 रुपयात हिरव्यागार छोट्याश्या घाटाची सफर घडऊन थेट गडाच्या पायथ्याशी सोडते. घाटातून गड दिसतो पण तो धुक्यात माखलेल्या अवस्थेत असतो. एक अद्भुत असा नजारा प्रवास करताना दिसतो. तांदूळवाडी स्टॉप वर उतरल्यावर प्रशस्त असा वाहनतळ जिल्हा परिषदेने केला आहे, तिथे पार्किंग फुकट आहे मग चिंता नाही. पार्किंग समोरच काही दुकाने आहेत मग अगदी निर्धास्त पणे गाडी ठेऊन जाऊ शकता. तांदूळवाडी गड तसा लहानच पण चहू बाजूने गर्द अशा सह्याद्रीतील झाडं झुडपांनी वेढलेला आहे. मुख्य गडावर जायला आपल्याला एक दोन छोटे डोंगर पार करावे लागतात. गड परिसरात भरपूर तलाव, धरणे, गर्द झाडी, खाडी परिसर, खाजणाचा परिसर असे सगळे पक्षी आणि वन्य प्राण्यांना उपयुक्त असा पोशिंदा असल्याम...