श्री केदारनाथ यात्रा भाग 1

नमस्कार मंडळी,


श्री केदारनाथ यात्रा भाग 1


मे महिन्याच्या शेवटीआम्ही केदारनाथ यात्रेला गेलो होतो, त्याचे व्हिडिओ पोस्ट केले होते पण काही कारणास्तव फोटो पोस्ट करायचे राहून गेले होते.


केदारनाथ ही टूर आम्ही श्री दीपक शेळके पुणे आमचे ट्रेकर मित्र यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण केली. टूरची पूर्ण आखणी, नियोजन, एजंट, हॉटेल ही सगळी माहिती त्यांनी पुरविली होती, त्याबद्दल त्यांचे मनस्वी आभार, त्याच माहितीच्या जोरावर आम्ही आमची TTMM टूरची आखणी केली होती.


माहिती मिळाल्या प्रमाणे आम्ही डेहराडून एक्स्प्रेस किंवा हरिद्वार एक्स्प्रेस हीचे तिकीट 4 महिने आधीच बुक केले होते, तरी आमची 2 तिकीट RAC राहिली होती. म्हणूनच आपण सगळ्यात आधी ट्रेन तिकीट बुक करणे गरजेचे आहे. ज्या दिवशी (४ महिने आधी) सकाळी 8 वाजता तिकीट ऑनलाईन irctc च्या वेबसाईट किंवा ॲप वर उघडतात तेव्हा अवघ्या 5 ते 10 मिनिटात सगळी तिकीटे बुक होऊन संपून जातात याची नोंद घ्यावी. त्यामुळेच सगळ्यात आधी ट्रेन तिकीट बुक करा 


बांद्रा ते हरिद्वार हा पल्ला पार करायला ट्रेनला 31 तास लागतात. तेव्हा आपण हा प्रवास ग्रूपने केलेलाच बरा, जर आपण एकटे गोलो तर फार पंचाईत होईल. जर आपला ग्रुप असेल तर आपले बोलून, चालून, खेळून मनोरंजन होइल आणि प्रवास कधी संपला ते कळणार देखील नाही.


प्रवासात लागणाऱ्या सगळ्या खाण्या पिण्याच्या सगळ्या वस्तू आम्ही बरोबर घेतल्या होत्या त्यामुळे काळजी नव्हती. आमचा प्रवास हसत खेळत पार झाला सोबतीला ट्रेन मधून दिसणारे नाझरे होतेच.


हरिद्वारला उतरल्यावर स्टेशन बाहेर आमच्या एजंटने गाडी पाठवली होती. आम्ही आमचा पुढचा प्रवास चालू केला, पण ह्यावर्षी गर्दी भरपूर असल्यामुळे आम्हाला ट्रॅफिक जॅम आणि पोलिस तपासणी यांचा सामना करावा लागला ज्यात फार वेळ दवडला गेला.


हरिद्वार ते फाटा हा प्रवास 211 किलोमीटरचा आहे, सकाळी 9 वाजता चालू केलेला प्रवास आम्ही रात्री 9 वाजता संपवला. वाटेत आम्ही फक्त रुद्रप्रयाग इथे अलखनंदा आणि मंदाकिनी नदीचा संगम बघितला, पुढे संगमानंतर याच नद्यांचे पवित्र गंगा नदी असे नामकरण होते, फक्त 5 मिनिटे थांबून वरूनच दर्शन आणि फोटो काढून पुढे निघालो होतो तरीपण आम्हाला रात्री उशीर झाला. प्रवास ऐकदम छान झाला. वाटेत आम्हाला उत्तुंग असे पर्वत, दऱ्या, नद्या, धरणे आणि विस्तृत असे नजारे बघण्यास मिळाले होते त्यामुळे मन प्रसन्न झाले होते.


दुपारचे जेवण आमच्या बरोबरच होते ते प्रवासात केले, रात्रीचे जेवण आमच्या tour package मध्ये समाविष्ट होते ते आम्ही आमच्या हॉटेल मध्ये घेतले.


आमचे हॉटेल फाटा येथील मेन रोड वर पवन हंस यांच्या हेलिपॅड शेजारीच होते.


मुंबई पासून चालू केलेल्या प्रवासात आम्ही  थकलो होतो आणि पुढच्या दिवशी पहाटे लवकर उठून पुढचा प्रवास चालू करायचा होता म्हणून लगेचच झोपलो.


जर आपल्याला टूर/ ट्रेक बद्दल काही प्रश्न असतील तर व्हॉट्सॲप मेसेज करून जरूर विचारू शकता.


पुढील प्रवासाचा भाग क्रमशः


आमचा हा प्रवास व्हिडिओ स्वरूपात बघायचा असल्यास खालील केदारनाथ यात्रेच्या व्हिडिओची लिंक देत आहे, ती क्लिक करून सगळे भाग बघून घ्यावे, व्हिडिओ आवडल्यास आमच्या चॅनलला सबस्क्राईब करावे ही विनंती.


Kedarnath Yatra TTMM Tour Organized by Borivali Hikers/ Simple Lifestyle Vlogs: https://www.youtube.com/playlist?list=PL_bA5qimfsWiBC1qWaRUCMtptSPhEpyUJ


पुढील लिंक आमच्या TTMM Trek/ Tour whatsapp ग्रुपची आहे, आपल्याला जर आमच्या ट्रेक मध्ये सामील व्हायचे असल्यास तुम्ही खालील लिंक क्लिक करून ग्रुप मध्ये सामील होऊ शकता.


https://chat.whatsapp.com/COawAF4287QA9KAvzJSEFI


आपलाच,

सिद्धेश विजय पाटील 

Simple Lifestyle Vlogs

Borivali Hikers

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

रतनगडावर कारवी फुलली, रतनगड एक डोंगर दऱ्यामधे भटकलेला पण शेवटी पूर्ण केलेला मुंबई-रतनवाडी-मुंबई २४ तासाचा खडतर प्रवास.

गोवर्धन इको वीलेज, गलतारे, वाडा, पालघर

हरिहर गड / हर्षगड