लिहिण्यास कारण की

लिहिण्यास कारण की, बरेच दिवसांनी नाही बरेच महिन्यानंतर आम्ही आमच्या पालघरमधील गावच्या घराचे दार उघडले. घर बांधून साधारण २१ वर्ष झाली. गावच्या घरात पाली म्हणजे एक सामान्य बाब आहे आमच्यासाठी कारण लहानपणा पासून बघत आलो आहे. पण हीच बाब बायको आणि मुलांसाठी दहशत. कुठेही पाल दिसली की बोंबा बोंब करायची हे नित्याचे झाले आहे. असो, घर उघडले की घरामध्ये पाली ह्या हमखास स्वागताला हजर असतात, घराला कोळाश्ट्के पण असतात पण आजची अजब घडलेली गोष्ट ती अशी की कधी नव्हे त्या पाली, सुतेरे गायब होते. हा एक आश्चर्यजनक धक्का होता. पण घर साफ सुफ होते म्हणून चिंता झाली नाही. घराच्या दोन तिन दिवसांचा वावर झाला तरीही कुठेही पाली दिसल्या नाहीत, हे काही विपरीत आणि अचंबित करणारी बाब होती. अचानक आमच्या सौ. ना एक मोठी पाल दिसली, ती घाबरली आणि तिने सगळ्यांना सांगितले. आमच्यासाठी पाली हा विषय काही नवीन नाही. पण ती बोलली पाल १ फुटाची होती. तेव्हा प्रकाश पडला आणि लगेच डोक्यात वीज चमकली की ती पाल नसून घोरपड आहे. असो पण एक गोष्ट चांगली की तिने घर साफ सूफ ठेवले होते. लगेच घरांच्या खिडक्या खुल्या केल्या आणि तिला घरा बाहेर जायचा मार्ग मोकळा करून दिला. पण तिची दहशत बायको मुलांवर होती. पण जसे खिडक्या उघडल्या तशी तिनेही निःश्वास सोडला असेल आणि ती बाहेर तिच्या विश्र्वामध्ये निघून गेली असेल. आजचा लेख कसा वाटला ते नक्की आपला अभिप्राय कळउन सांगा. कळावे लोभ असावा, आपलाच 🙏

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

एक अनवट वाट तांदूळवाडी गडाची

भला मोठा तांदूळवाडी / लालठाणे धबधबा, तांदूळवाडी गाडाखाली, सफाळे

OFFBEAT Trekers ने TTMM तत्वावर आयोजित केलेली नाणेघाट ते भीमाशंकर ७० Km मधील पहिला टप्पा नाणेघाट ते आंबोली