रेल्वे तिकीट खिडकी वरील झगडा, कोण बरोबर कोण चूक?

नमस्कार मित्रांनो, बरेच वर्षानंतर पालघर ते बोरीवली प्रवास करण्याचा मोका मिळाला. सकाळी लवकर ट्रेन पकडावी आणि ट्रेन चुकू नये म्हणून लवकर निघालो, तिकीट काऊंटर वर फार गर्दी होती, स्मार्ट कार्ड घरीच राहिले होते. साधारण माणसा प्रमाणे रांगे मधे उभे राहिलो. पण लगेच डोक्यात आले की नवीन स्मार्ट कार्ड घ्यावे म्हणून गर्दीचे काऊंटर सोडून रिकामी काऊंटर वर गेलो पण असे वाटले की मी माझ्या थोबाडीत मारून घेतली आहे. मी त्या इसमाला विचारले की स्मार्ट कार्ड कुठल्या खिडकी वर मिळते, त्या शुंभाचे उत्तर होते मला माहिती नाही! मी त्याच्या उत्तराने अवाक झालो. सगळ्या खिडक्या एका रांगेत होत्या, सगळे जण एकत्र बसले होतो तरीही हा व्यक्ती सरळ बोलोतो आहे की मला माहिती नाही, हे मला खटकले. मिंपण आवाज वाढवला, पण त्यावर बाजूची तिकीट देणारी बाई सुधा त्याच्याच आवाजात आवाज मिळूनच बोलू लागली. पण माझे बोलणे एवढेच होते की तुम्हाला माहिती नाही तर बाजूला बसलेल्या तुमच्या सहकारी व्यक्तीला विचारा आणि मग उत्तर द्या. एकाच विभागामध्ये काम करणारी माणसे तुम्हाला हे माहिती नाही का कुठच्या खिडकीवर काय काम चालते ते? असो मी परत रांगेत उभा राहिलो आणि तिकीट काढले. नंतर सरळ स्टेशन मास्तर कडे मोर्चा वळवला, पण तो हजर नव्हता. तिथे उपस्थित वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोललो, झालेला प्रकार सांगितला, त्यांना तो पटला व बोलले मी दिवसाला १० काम अशी करतो की ज्यासाठी मी जिम्मेदार नाही पण कुणाचे काम अडवत नाही. मी त्यांना बोललो की मला तक्रार नोंद वाही द्या मला लेखी तक्रार करायची आहे. पण त्यानी चक्क नकार दिला व बोलले की मी त्यांच्याशी बोलतो आणि त्यांना त्यांची चूक सुधारायला सांगतो. माझे नाव व संपर्क क्रमांक लिहून घेतला. माझी ट्रेन आलिंहोटी म्हणून मी ही जास्त हुज्जत करता निघून गेलो. पण एका सरकारी नोकरी तील व्यक्ती असे कसे वागू शकतो. कामाचा ताण मी समजतो, सरकारी चौकट मी समजतो पण असे बेजबाबदार पणे वागणे मला खटकले. जर कोणी रेल्वे मधे काम करत असेल तर मला थोडी माहिती उपलब्ध करून द्या की त्या तिकीट देणाऱ्या करकुनाचे बरोबर आहे की चूक. कारण सरकारी नोकरी आली की कायदा आला, आणि कायदा समजून बोलणं हेच शहाणपणाचे आहे असे मला वाटते. माझे वागणे चुकीचे असेल तर ते सुधारावे लागेल. जाणकारांचा कायदेशीर सल्ला अपेक्षित आहे. कळावे लोभ असावा आपलाच एक फेसबूक मित्र

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

एक अनवट वाट तांदूळवाडी गडाची

भला मोठा तांदूळवाडी / लालठाणे धबधबा, तांदूळवाडी गाडाखाली, सफाळे

OFFBEAT Trekers ने TTMM तत्वावर आयोजित केलेली नाणेघाट ते भीमाशंकर ७० Km मधील पहिला टप्पा नाणेघाट ते आंबोली