पालघर मधील माहीम किल्ला दीपोत्सव सोहळा
आजचा दिवस झंझावाती होता, फार घाई झाली नाही, तसा निवांतच होता, पण जरा जास्त कार्यक्रम एका दिवसामध्ये उरकले. दिवसाची सांगता पालघरमधील माहीम किल्ल्यावरील दिपोस्तवाने झाली, गावातील सर श्रीयुत विनय पाटील आणि गावातील मात्तबर मंडळी यांनी दरवर्षी प्रमाणे तब्बल ५०० दिवे लावून किल्ला उजळून काढला होता. वेळोवेळी भावेश कडून किल्ल्यावरील हालचालींवर लक्ष ठेऊन होतो. कारण घरातील लक्ष्मीपूजनाच्या कार्यक्रम आटोपून लगबगिने गावातील किल्ल्यावर धाव घेतली. चांगली गोष्ट ही की अगदी वेळेवर कार्यक्रमाला पोहोचलो. किल्ल्याची माहिती सरांनी दिली आणि त्यांच्या बरोबर गड फिरलो. एक अभूतपूर्व आणि अविस्मरणीय आनंद मनाला मिळाला. विशेष आभार Bhavesh Vartak. पाऊस संपला की रान माजलेले असते प्रत्येक किल्ल्यावर पण काळजी घेणारी कोणी नसेल तर स्थानिक मंडळी ती साफसफाई काही अपेक्षा न ठेवता करतात, जेव्हा गडावर पोहोचलो तेव्हा गड विशेषतः साफ सफाई करून झाला होता आणि कायक्रमासाठी सज्ज होता हे विशेष. जास्त माहितीसाठी आमचा YouTube चॅनेल सिंपल Lifestyle Vlogs वर संपूर्ण भाग बघा, कळावे लोभ असावा 🙏
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा