*शिवराजस्य प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य आयोजित* *किल्ले चंदेरी दुर्गदर्शन मोहीम*
*🚩 सादर जय शिवराय 🚩* नमस्कार मित्रांनो, आजच्या फिरस्तीचे आयोजन हे शिवराजस्य प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य यांच्या तर्फे होते. मोहीम होती *किल्ले चंदेरी दुर्गदर्शन* मला सुरुवातीलाच संपूर्ण संस्थेचे आणि त्यांच्या सभासदांचे आभार मानावे लागतील, प्रकर्षाने मला श्री केतन धुरी ज्यांनी आम्हा सगळ्यांना वारंवार संपर्क करून एकत्र आणण्याचे काम केले, आमच्या मोहिमेची धुरा संभळणारे श्री दर्शन गाडे ज्यांनी सगळ्यांना सांभाळून वेळोवेळी सगळ्यांचे मनोबल वाढवले आणि सगळ्यात शेवटी अजिंक्य हायकरचे श्री रत्नाकर थत्ते काका ज्यांनी हा गड २०० पेक्षा जास्त वेळा सर केला आहे, विशेष म्हणजे कठीण जगेंवर स्वतः अवघड जागी उभ राहून आम्हाला सूचना देत होते की कसे पुढे जावे, आम्हाला गड उतरायला रात्र झाली पण त्यांना घाट वटांची इत्थंभूत माहिती त्यांना आहे त्यामुळे आम्ही सुखरुप परतीचा प्रवास केला, या सगळ्यांचे आभार मानू तेवढे कमीच. आम्ही सकाळी बदलापुर स्थानकात सकाळीं ६ वाजता ठरवले, आदल्या दिवशी नातेवाईकांकडे काही कौटुंबिक कार्यक्रम होता म्हणून घरी रात्री उशिरा १२ वाजता पोहोचलो. सकाळी २.३० चा गजर लावून झोपलो, पण झोप काही लागत नव्...