*केळवा पाणकोट किल्ला आणि रम्य संध्याकाळ*
*🚩 सादर जय शिवराय 🚩*
नमस्कार मित्रांनो,
आम्ही आमच्याच पालघर गावातील मौजे केळवा आणि सफाळा या गावांच्या सरहद्दीवरील असलेल्या पाणकोट किल्ल्याला भेट दिली, हा किल्ला दांडा खाडीच्या मुखावर स्थित आहे, जिथे समुद्र आणि खाडी मिळते तिथे. किल्ल्याच्या बाजूला खाजणाचा भाग आहे. किल्ला पाण्यातच असतो पण ओहटीच्या वेळी आपण जवळ आणि किल्ल्यात जाऊ शकतो. किल्ल्यात जाण धोकादायक असू शकते कारण तिथे साफ सफाई केली नाही आहे. गावकरी बोलले की आत साप विंचू असण्याची शक्यता आहे म्हणून जाऊ नका. किल्ल्यावर पाण्याची टाकी आहे. किल्ला बघितल्यावर वाटते की हा किल्ला बहु मजली असावा. किल्ल्याला दोन दरवाजे आहे एक पूर्वेला गावाकडून तर दुसरा दक्षिणेला बोटिंसाठी आहे. सध्य स्थितीमध्ये पायऱ्या नाही आहेत किंवा त्याचे झीज झाली असावी. किल्ल्यात दगडावर चढून जाऊ शकता पण ते धोका दायक आहे.
हा किल्ला पोर्तुगीजानी बांधला, गडावर तेव्हा १५ तोफा होत्या. हा किल्ला समुद्रावरील हालचाली बघण्यासाठी बांधला होता. चिमाजी अप्पांनी वसई किल्ल्याला वेढा घातल्यानंतर १० जानेवारी १७३९ रोजी मराठा सैन्याने हा किल्ला ताब्यात घेतला. १८१८ मध्ये ब्रिटिश सैन्याने हा किल्ला ताब्यात घेतला. वालुकामय मातीत गाडलेला अर्धा किल्ला २००८-०९ मध्ये उघडकीस आला होता.
ही जागा केळवा रेल्वे स्थानकापासून १२ कम अंतरावर आहे, डमडम किंवा एसटी बस यांनी आपण इथे पोहचू शकता.
किल्ल्यामध्ये जाण्यापूर्वी गावकऱ्यांशी भरती आणि ओहटीच्या वेळा जाणून घ्या, पाणी जर वर चढले तर बाहेर ८ तासानंतर येऊ शकता, दुसरा पर्याय नाही. जमीन खाजणाची असल्यामुळे चिखलात पाय रुतून बसणार नाहीत याची काळजी घ्या.
हा किल्ला संवर्धन करणे गरजेचे आहे, करणं किल्ल्याची वास्तू पाण्याचा मारा खाऊन जीर्ण झालि आहे ती कधीही कोसळू शकते.
जर तुमच्याकडे गाडी असेल तर तुम्ही सहज ७ ते ८ किल्ले ऐका दिवसात पूर्ण करू शकता, जसे एडवणचा कोट, भवनगड, केळवा पाणकोट, केळवा भुईकोट किल्ला, माहिम किल्ला, शिरगाव किल्ला, हे सगळे ऐका रांगेत समुद्रा लगत आहेत. हे सगळे एपिसोड आपल्या चॅनलवर उपलब्ध आहेत. जर काही माहिती हवी असल्यास मला WhatsApp मेसेज करू शकता.
मला अपेक्षा आहे आपल्याला माझा अनुभव लेख स्वरुपात आवडला असेल. सोबत फोटो सुधा आहेत, पण खरी परिस्थिती अनुभवायची असेल तर नक्की खालील दिलेल्या YouTube लिंक ला क्लिक करून व्हिडिओ पाहा आणि जर व्हीडिओ आवडला तर लाल सबस्क्राइब बटन दाबा, आणि सोबत असलेल्या घंटेला क्लिक करून All हे बटन दाबा म्हणजे आमचे नियमित व्हिडिओ पाहण्यासाठी मिळतील ते ही काही किंमत न मोजता.
जर आपण आमच्या TTMM (कमीत कमी खर्च आणि भरपूर भ्रमंती) या उपक्रमात सहभागी होऊ इच्छिता तर मग खालील दिलेल्या फोन नंबर वर WhatsApp मेसेज करा. फोन करू नका तो DND वर आहे, कोणीही फोन उचलणार नाही ह्याची नोंद घ्यावी.
मी कोणतेही अभियान किंवा मोहीम आखतो तेव्हा १०० वेळा विचार आणि अभ्यास केलेला असतो, चुका होत नाहीत पण, वेळ कुणावर आणि कशी येईल ते सांगता येत नाही. म्हणून माझ्या बरोबर येताना तुम्ही पण अभ्यास करा, आपल्याला सगळ्यांना त्याचा फायदा निश्चितच होईल ही विनंती.
YouTube: https://youtu.be/x-zmawQHj0c
Facebook:
https://www.facebook.com/simplelifestylevlogs?mibextid=ZbWKwL
Instagram:
https://www.instagram.com/simplelifestyle.vlogs/
माझे लिखाण Blog स्वरूपात: https://simplelifestylevlogs.blogspot.com/
Whatsapp number: ९९६७१५२९३८
कळावे लोभ असावा, आपलाच मित्र, सिद्धेश पाटील Simple Lifestyle Vlogs
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा