कुलस्वामिनी आई माऊलीचा उदो उदो, आई एकवीरा माता की जय🙏

*🚩 सादर जय शिवराय 🚩*

नमस्कार मित्रांनो,

११ डिसेंबर आंतर राष्ट्रीय पर्वत दिन, त्याबद्दल हार्दिक शुभेच्छा, आजची फिरस्ति जरा वेगळी कौटुंबिक होती, सह्याद्रीच्या कुशीत आमची कुलस्वामिनी आई वसलेली आहे, तिचा महिमा अगाध. तिला सगळेच पूजतात कोळी, आग्री, वाडवळ बांधव हे सगळे भक्त नेहमी आईने बोलावणं पाठवले कीच देवीला भेटायला येतात, तसे तुम्ही कितीही योजा पण ती जोपर्यंत बोलवत नाही तोपर्यंत तुम्ही तिथे जाऊ शकत नाही ह्यालाच म्हणतात देवीची लीला अगाध आहे.

लोणावळ्यातील कार्ला बौध्द लेण्यांना, मळवली इथे जायला भरपूर मार्ग आहेत, ट्रेन, एसटी बस, खाजगी गाडी पण ह्यावेळी आमची आई बरोबर होती म्हणून आम्ही खाजगी गाडीचा पर्याय निवडला.

सकाळी ३.३० ला गजर लावून, ४.३० ला घराबाहेर पडलो, साधारण बोरिवली पासून ११५ km आहे, आम्ही ७वाजता गाडा खाली वाहन तळात गाडी ठेवली. ७.१५ मिनिटांनी गड माथा गाठला. मंदिर तसे छोटेखानी पण शोभेल असे, अशी अख्यायिका आहे की हे देऊळ पांडवांनी स्थापन केले होते.

लोकांची गर्दी फार होती जवळ जवळ १ तास आम्ही रांगेत उभे राहून मनासारखे दर्शन घेतले.

गडाखाली आलो, अगदी पायथ्याला मोक्याची जागा बघून चहा, नाष्टा करून घेतला तो ही, आपण नेलेल्या गोष्टी वापरून. पोर्टेबल गॅस बरोबर असल्यामुळे सगळ्या गोष्टी शक्य होतात अगदी शुल्लक खर्चामध्ये.

पुढे आम्ही स्वयंभू कोंडेश्वर शिवमंदिरात जायचे ठरवले होते, रस्त्यात आम्हाला मस्त नदी पात्र, धरणाचे पात्र बघण्यास मिळाले, सगळ्यात शेवटी धरण सुधा बघण्यास मिळाले, अगदी धरणाच्या भिंतीवर पण जाऊन आलो. धरणावरील पाण्यात दगड मारण्याचा कार्यक्रम सुधा केला. हा रस्ता साधारण अर्धा km कच्चा आहे, सांभाळून गाडी हका.

पुढे मस्त डोंगरांची रांग बघत आम्ही डोंगरांच्या कुशीत कोंडेश्र्वरला कधी पोहोचलो कळलेच नाही, इथेही वाहनतळ होते, गाडी थेट मंदिरापाशी जाते म्हणजे चिंता नको. भगवान शंकराच्या पिंडीच्या दर्शनाने मंन प्रसन्न झाले.

मंदिराच्या आवारातील भले भले मोठे डोंगर मन मोहून घेतात, त्यातच ढाकचा डोंगर उठून दिसत असतो. मंदिराच्या आवारात झाडाच्या सावलीमध्ये दुपारच्या जेवणाचा घाट मांडला होता. सगळे साहित्य बरोबर होते, मस्त चविष्ट बासमती तांदळाचा पुलाव लगेच तयार झाला, पनीर तळले, दह्याची कोशिंबीर बनवली, छोटेखानी जेवणाचा कार्यक्रम उरकून घेतला, मन तृप्त झाले अशा मंगल वातावरणामध्ये आनंद द्िगुणित झाला होता. लागलीच झोप लागू नये म्हणून सामान उरकून गाडी मुंबईच्या दिशेने हाकायला सुरवात केली पण सुखद धक्का, गाडी चालवताना मला एक polyhouse दिसले, लहानशा दरवाज्यामधून मला फुलांचा खजाना दिसला, गाडी थांबवली शेतकरी काकांची परवांगी घेतली आणि जरबेरा फुलांचा बहर बघितला, काकांकडे सगळ्या रंगाची फुले होती, मन प्रसन्न झाले. जणू आपण एखाद्या विदेशात आलो आहोत असे भासू लागले होते. काकांचे आभार प्रदर्शन केले आणि पुढच्या रस्त्याला लागलो.

परत मन प्रसन्न करणारे दृश्य दिसले, समोर डोंगरावरून १५ -२० लोक पॅरासेलिंग करत होती, हे पहीलांदाच बघितले छान वाटले.

पुढे खोपोली फूड कोर्टला गाडी थांबउन आइस्क्रीमचा आस्वाद घेतला, पुढे गाडी थेट घरी येई पर्यंत थांबवली नाही.

सगळा दिवस कारणी लागला होता, देवदर्शन आणि सोबतीला असे सगळे नाजारे बघून मन प्रसन्न झाले होते. आई माऊलीची कृपा.

आई माऊलीचा उदो उदो, एकवीरा माता की जय🙏

जर आपल्याला अधिक माहिती हवी असल्यास मला WhatsApp मेसेज करू शकता.

जर आपल्याकडे अशाच नवीन जागा, ठिकाण, असतील तर मला नक्की कळवा, मला भेट देणं नक्की आवडेल.

मला अपेक्षा आहे आपल्याला माझा अनुभव लेख स्वरुपात आवडला असेल. सोबत फोटो सुधा आहेत, पण खरी परिस्थिती अनुभवायची असेल तर नक्की खालील दिलेल्या YouTube लिंक ला क्लिक करून व्हिडिओ पाहा आणि जर व्हीडिओ आवडला तर लाल सबस्क्राइब बटन दाबा, आणि सोबत असलेल्या घंटेला क्लिक करून All हे बटन दाबा म्हणजे आमचे नियमित व्हिडिओ पाहण्यासाठी मिळतील ते ही काही किंमत न मोजता.

जर आपण आमच्या TTMM (कमीत कमी खर्च आणि भरपूर भ्रमंती) या उपक्रमात सहभागी होऊ इच्छिता तर मग खालील दिलेल्या फोन नंबर वर WhatsApp मेसेज करा. फोन करू नका तो DND वर आहे, कोणीही फोन उचलणार नाही ह्याची नोंद घ्यावी.

मी कोणतेही अभियान किंवा मोहीम आखतो तेव्हा १०० वेळा विचार आणि अभ्यास केलेला असतो, चुका होत नाहीत पण, वेळ कुणावर आणि कशी येईल ते सांगता येत नाही. म्हणून माझ्या बरोबर येताना तुम्ही पण अभ्यास करा, आपल्याला सगळ्यांना त्याचा फायदा निश्चितच होईल ही विनंती.

YouTube: https://youtu.be/CW0XZAvtnnM  

Facebook:
https://www.facebook.com/simplelifestylevlogs?mibextid=ZbWKwL

Instagram:
https://www.instagram.com/simplelifestyle.vlogs/

माझे लिखाण Blog स्वरूपात: https://simplelifestylevlogs.blogspot.com/ 

Whatsapp number: ९९६७१५२९३८

कळावे लोभ असावा, आपलाच मित्र, सिद्धेश पाटील Simple Lifestyle Vlogs

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

एक अनवट वाट तांदूळवाडी गडाची

भला मोठा तांदूळवाडी / लालठाणे धबधबा, तांदूळवाडी गाडाखाली, सफाळे

OFFBEAT Trekers ने TTMM तत्वावर आयोजित केलेली नाणेघाट ते भीमाशंकर ७० Km मधील पहिला टप्पा नाणेघाट ते आंबोली