प्रवास आयुष्याचा, भाकरीचा चंद्र आणि मित्रांच्या शूभेच्छा
*🚩 सादर जय शिवराय 🚩*
🙏कुलस्वामिनी एकवीरा माता की जय🙏
नमस्कार मित्रांनो,
आज १८ डिसेंबर माझा प्रकट दिवस, आई माऊलीची कृपा आपणा सगळ्यांवर राहो ही ईश्वर चरणी प्रार्थना🙏.
आई माऊलीचा उदो उदो, एकवीरा माता की जय🙏
आपण दिलेल्या शुभेच्छा संदेशाबद्दल मी मित्रपरिवाराचा आभारी आहे.
आयुष्याची सफर ही ऐका नदीच्या प्रवाहा प्रमाणे असते, जन्म झाला की नभातून क्षणात आपण भूतलावर येतो पावसाच्या थेंबाप्रमाणे, मग नशीब चांगले असेल तर मोठ्या पर्वतावर म्हणजे आपल्या आई वडिलांच्या आयुष्यात आपण आनंदाची उधळण करत येतो, नभांगण प्रफुल्लित होते त्या परिवाराचे, सगळी पृथ्वीवरील मरगळ, धुळवड स्वच्छ होते. जणू पृथ्वी हर्ष उल्हासित होते तशीच काही स्थीती आपल्या घरातील मंडळींची असते. मग आपला आयुष्याचा प्रवास ऐका छोट्या झऱ्या प्रमाणे चालू होतो. जसा वेळ जातो तो झरा आणि आपणही वाढत जातो. पुढे आपण आई वडिलांच्या आंगा खांद्यावर खेळतो जसे झरे दऱ्या खोऱ्यातून नाद करत उसळून आयुष्याकडे धाव घेत असतात. हाच तो क्षण जो फक्त आपल्या निरागस पणे आयुष्य जगण्याचा असतो. कारण जसे पुढे जाऊ, तसा काळ घात करायला उभा असतो, मतलबी स्वार्थी, यांत्रिकी आणि असूसंस्कृत दुनिया आपल्या स्वागताला जणू उभीच असते. जर आपले नशीब बलवत्तर असेल तर निस्वार्थी, सुसंस्कृत मनोवृत्तीचे दर्शन ही घडते. पुढे झरे ऐकामेकांना भेटतात म्हणजे आपल्याला शाळेचे मित्र सवंगडी भेटतात हे सवंगडी आपल्याला आयुष्याच्या अशा वळणावर भेटतात की आपला निरागसपणा आताही टिकून असतो आणि आपण त्याचा पुरेपूर आनंद लुटतो आणि आपण ही शिदोरी आवठवणीच्या स्वरूपाचं बांधून घेतो आयुष्यभर पुरावी म्हणून, आता भरपूर झरे मिळून ओढा तयार झालेला असतो, बालपण संपले असले तरी खोड्या मस्ती गेलेली नसते. शाळेची सफर संपून जसे आपण मोठ्या विद्यालयामध्ये प्रवेश घेतो, जसे एखादा ओढा मोठ्या ओढ्याला आणि मग नदीला भेट देतो इथे नदी जशी दुथडी भरून वाहते तसे आपणही आयुष्याच्या भरपूर महत्वाच्या टप्प्यावर उभे असतो मग ते ही दिवस ही सरतात. जगाची हळूहळू ओळख ह्यायला सुरुवात होते. हेवे दावे, स्वार्थी निस्वार्थी, दुसऱ्याला विनाकारण त्रास देणारी माणसे भेटायला लागतात. महाविद्यालयाची सफर संपता संपता आपण आता अती महत्वाच्या टप्प्यावर उभे राहतो. जणू एखादी नदी दुसऱ्या नदीच्या संगमला तयार असते खरे व्यावहारिक आयुष्य समोर उभे असते. जी लोक या पूर्वीच्या आयुष्यात काही व्यवहार ज्ञान आणि अनुभव शिकत नाहीत त्यांची फार गोची होते, इथे त्यांचा फक्त वापर करून घेतला जातो. इथे नदीची खळखळ संपते जणू नदीला शिक्षा केलेली असते. भरपूर आठवणीची आणि अनुभवांची शिदोरी बांधून न कुरकुर करता पुढे आयुष्याच्या मोठ्या संगमसाठी जोडीदाराची तयारी चालू असते. आयुष्य असेच पुढे चालू राहते आणि आपण कधी अथांग समुद्रात येऊन मिळतो ते ही कळत नाही. ह्या अथांग समुदायामध्ये प्रत्येकाची आवड, निवड, स्वभाव वेगळे असतात, तरीपण आता हा आपला शेवटचा टप्पा आहे हे न विसरता आपला आपल्या इच्छा आकांक्षा कृतीत आणण्यासाठी प्रयत्न करत राहिले पाहिजे. आयुष्यात कुणी सफल होते तर कोणी असफल, पण माझे म्हणणे एकच जर आपण सफल आहोत तर त्यांनी जे असफल आहेत त्यांची मदत करावी, आपला आनंद वाटून त्यांचे दुःख कमी करावे हेच जीवनाची सार्थक.
आपण आयुष्यात विशितून तिशीत आणि तिशितून चाळिशीत प्रवेश करतो जसे आपले वय वाढते तशी विचार करण्याची शक्ती, प्रगल्भता, अनुभव वाढत असतो. आयुष्याची खळखळ संपून आपण संथपणा अनुभवत असतो. या वळणंवर "अभी नाही तो कभी नाही" हे माझ्या आयुष्याचे ब्रीद वाक्य सगळ्यांनी हृदयामध्ये कोरून ठेवावे अशी माझी विनंती आहे, हे फार समर्पक आहे. आयुष्य जगा, इच्छा पूर्ण करा, आठवणींचा खजिना घेऊन पुढील आयुष्याची वाटचाल करत रहा. आता पुढे काय मांडून ठेवले आहे ते कुणालाही माहिती नाही वेळेत सावध व्हा आणि जागून घ्या, आनंद द्विगुणित करा आणि आपल्या संपर्कात असलेल्या आप्तेष्टांना आपली किंमत आणि महत्त्व पटवून द्या नाहीतर.....
दोन दिवस वाट पाहण्यात गेले, दोन दुःखात गेले
हिशोब करतो आहे आता किती राहिलेत डोईवर उन्हाळे
शेकडो वेळा चंद्र आला, तारे फुलले, रात्र धुंद झाली
भाकरीचा चंद्र शोधण्यातच जिंदगी बर्बाद झाली....
- नारायण सुर्वे
मला गेल्या काही वर्षामध्ये सोशल मीडिया मुळे भरपूर काही नवीन प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष गुरू, मित्र, मैत्रिणी, बरोबर अनुभव आणि शिकायला मिळाले त्या सगळ्यांचे मनापासुन आभार.
मला काही नवीन शिकायला आवडते आणि जर ते आवडीचे आणि जोडीला कठीण असेल तर माझी रुची अजूनच उचंभळून येत पण प्रयत्न करून उंची गाठायची हा प्रयास नेहमी चालू असतो त्याच प्रत्यय मला सध्या येत आहे.
आपले आयुष्य फार यांत्रिकी झाले आहे, म्हणून मी रोजच्या जीवनातून बाहेर पडायचे ठरवले आणि त्यात थोडे यश प्राप्त केले, मनुष्य हा सामाजिक प्राणी आहे, मलापण असे वाटले की आपण एकटे फिरण्यापेक्षा ज्यांची आवड सारखी आहे अशा लोकांत मिसळून आनंद द्विगुणित करूया याने यांत्रिकीकरण, चिडचिड, एकटेपणा, वैचारिक आदन प्रदान, मानसिक बंध या सगळ्या गोष्टी शक्य आहेत, म्हणून हा माझा कयास आहे.
आपण चांगल्या आठवणी फोटो, व्हिडिओ स्वरूपात म्हातारपणी पाहण्यासाठी किंवा आपल्या पुढच्या पिढीला दिसाव्या ह्यासाठी केलेली धडपड. अशीच धडपड आमच्या वडिलांनी सुधा केली होती आणि त्याच्याकडे आज फोटो स्वरूपात २ सुटकेस भरतील एवढे जुने फोटो अल्बम सुस्थितीत आहेत.
असो लेख वाढत चालला आहे, म्हणून आटोपता घेत आहे.
जर आपल्याला अधिक माहिती हवी असल्यास मला WhatsApp मेसेज करू शकता.
जर आपल्याकडे काही नवीन जागा, ठिकाण, असतील तर मला नक्की कळवा, मला भेट देणं नक्की आवडेल.
मला अपेक्षा आहे आपल्याला माझा अनुभव लेख स्वरुपात आवडला असेल. सोबत फोटो सुधा आहेत, पण खरी परिस्थिती अनुभवायची असेल तर नक्की खालील दिलेल्या YouTube लिंक ला क्लिक करून व्हिडिओ पाहा आणि जर व्हीडिओ आवडला तर लाल सबस्क्राइब बटन दाबा, आणि सोबत असलेल्या घंटेला क्लिक करून All हे बटन दाबा म्हणजे आमचे नियमित व्हिडिओ पाहण्यासाठी मिळतील ते ही काही किंमत न मोजता.
जर आपण आमच्या TTMM (कमीत कमी खर्च आणि भरपूर भ्रमंती) या उपक्रमात सहभागी होऊ इच्छिता तर मग खालील दिलेल्या फोन नंबर वर WhatsApp मेसेज करा. फोन करू नका तो DND वर आहे, कोणीही फोन उचलणार नाही ह्याची नोंद घ्यावी.
मी कोणतेही अभियान किंवा मोहीम आखतो तेव्हा १०० वेळा विचार आणि अभ्यास केलेला असतो, चुका होत नाहीत पण, वेळ कुणावर आणि कशी येईल ते सांगता येत नाही. म्हणून माझ्या बरोबर येताना तुम्ही पण अभ्यास करा, आपल्याला सगळ्यांना त्याचा फायदा निश्चितच होईल ही विनंती.
YouTube: https://youtube.com/@SimpleLifestyleVlogs
Facebook:
https://www.facebook.com/simplelifestylevlogs?mibextid=ZbWKwL
Instagram:
https://www.instagram.com/simplelifestyle.vlogs/
माझे लिखाण Blog स्वरूपात: https://simplelifestylevlogs.blogspot.com/
Whatsapp number: ९९६७१५२९३८
कळावे लोभ असावा, आपलाच मित्र, सिद्धेश पाटील Simple Lifestyle Vlogs
अप्रतिम लेख, शब्द नी शब्द एक एक गोष्ट सांगत असल्याचा आभास झाला. 👌🏻👌🏻
उत्तर द्याहटवाआपल्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद 🙏
उत्तर द्याहटवा