सह्याद्री मधील एक अपरिचित वाघबीळ, वाघ/ बिबळ्याची गुहा

*🚩 सादर जय शिवराय 🚩*

नमस्कार मित्रांनो,

आजची फिरस्ति जरा वेगळीच आहे, काही दिवसापूर्वी मला व्हॉटसअप वर मेसेज आला, त्यांनी सांगितले की तुम्हाला काही वेगळे बघायची इच्छा आहे का, मला काही समजले नाही, मी विषय सोडून दिला कारण तो निनावी नवीन नंबर होता. दुसऱ्या दिवशी परत त्यांनी फोटो पाठवला, सहसा मी unknown नंबरशी जास्त बोलणे करत नाही पण तो फोटो बघितला आणि सररर करून डोक्यात वीज चमकली, मी त्यांच्याशी सविस्तर बोललो, आभार प्रदर्शन केले, विषय संपला त्यांनी सांगितले माझे नाव कुठेही आले नाही पाहिजे. मी सहमती दर्शवली. तेव्हा पासून मनात उत्सुकता उचंभळत होती.

मी आमच्या काही ट्रेकिंग ग्रपबरोबर सल्ला मसलत केली पण भीतीमुळे जास्त कुणीही यायला तयार नव्हते. मग काय जास्त माहिती गोळा केली आणि तब्बल १३ जण मोठे छोटे असा लावजमा तयार झाला. तारीख ठरली नव्हती करणं आखणी आणि योजना तयार नव्हती. पण तिकडे जायची ओढ लागली होती. येत्या रविवारीच जायचे हे पक्के केले.

सगळ ठरल्या प्रमाणे २.४० चा गजर, पण यावेळी मुले बरोबर होती. वेळेच्या आधीच बोरिवली स्टेशन गाठले ३.५० ची ट्रेन पकडली, पुढे दादर वरून पहिली ४.४२ ची खोपोली लोकल मिळाली, ६.३५ ला बदलापूर गाठले. सगळे दूरचे मेंबर वेळेत आले होते आणि नेहमीप्रमाणे बदलापूर मधे राहणारे उशिरा आले, असो सकाळी ७ला रिक्षा मिळाली रू २०० मधे ७.३० वाजता सावरोली गावात पोहोचलो. रिक्षा चालकांचा नंबर लिहून घेतला. पुढे गावातच वाटाड्या मिळतो का ते बघितले पण काका जरा जास्तच किंमत मागू लागले. मी एकटा असतो तर बहुदा नसते दिले, सगळ्यांशी सल्ला मसलत केली आणि किंमत ठरवली.

सकाळीं ८ला ट्रेकला सुरुवात केली, सगळे जोश मधे होते, पटा पट दीड तासामध्ये ठिकाण गाठले, गावातून जाणारा रस्ता पुढे दाट जंगलातून जातो, काही ठिकाणी वाट आहे तर काही ठिकाणी नाही. शेवटी डोंगरात उभा चड आहे. म्हणून वाटाड्या घेणं उत्तम.

गुहा आणि आजू बाजूचा परिसर फार भयावह होता. सकाळी सकाळी काही जंगली श्र्वापद असण्याची संभावना टाळू शकत नाही, करत गुहेमध्ये पाण्याचा झरा आहे. खातर जमा केली आणि आतमध्ये गेलो. गुहा तोंडावर मोठी आणि शेवटी निमुळती होते, साधारण ५०-६० फूट असावी. छान वाटले, आतमध्ये पाण्याचा झरा वाहतो म्हणून संभळून जाणे, थोडी निळ बाजली आहे.

सगळे खुश झाले गुहा बघून साधारण अर्धातास आराम करून १२ पर्यंत परत फिरलो. रिक्षचालकाला आधीच परतीचा फोन केला आणि तो ही जागेवर हजार होता. १२.३० ला बदलापूर गाठले.

एक नवीनच आनंद होता, काहीतरी नवीन बघितल्याचा. मेहनतीचे चीज होते जेव्हा मनासारखे स्वप्नवत जागेची अनुभूती मिळते.

जर आपल्याला अधिक माहिती हवी असल्यास मला WhatsApp मेसेज करू शकता.

जर आपल्याकडे अशाच नवीन जागा, ठिकाण, असतील तर मला नक्की कळवा, मला भेट देणं नक्की आवडेल.

मला अपेक्षा आहे आपल्याला माझा अनुभव लेख स्वरुपात आवडला असेल. सोबत फेसबुकवर फोटो सुधा आहेत, पण खरी परिस्थिती अनुभवायची असेल तर नक्की खालील दिलेल्या YouTube लिंकला क्लिक करून व्हिडिओ पाहा आणि जर व्हीडिओ आवडला तर लाल सबस्क्राइब बटन दाबा, आणि सोबत असलेल्या घंटेला क्लिक करून All हे बटन दाबा म्हणजे आमचे नियमित व्हिडिओ पाहण्यासाठी मिळतील ते ही काही किंमत न मोजता.

जर आपण आमच्या TTMM (कमीत कमी खर्च आणि भरपूर भ्रमंती) या उपक्रमात सहभागी होऊ इच्छित असाल तर मग खालील दिलेल्या फोन नंबर वर WhatsApp मेसेज करा. फोन करू नका तो DND वर आहे, कोणीही फोन उचलणार नाही ह्याची नोंद घ्यावी.

मी कोणतेही अभियान किंवा मोहीम आखतो तेव्हा १०० वेळा विचार आणि अभ्यास केलेला असतो, चुका होत नाहीत पण, वेळ कुणावर आणि कशी येईल ते सांगता येत नाही. म्हणून माझ्या बरोबर येताना तुम्ही पण अभ्यास करा, आपल्याला सगळ्यांना त्याचा फायदा निश्चितच होईल ही विनंती.

YouTube: https://youtu.be/2MqH22G9_G8  

Facebook:
https://www.facebook.com/simplelifestylevlogs?mibextid=ZbWKwL

Instagram:
https://www.instagram.com/simplelifestyle.vlogs/

माझे लिखाण Blog स्वरूपात: https://simplelifestylevlogs.blogspot.com/ 

Whatsapp number: ००९१ ९९६७१५२९३८

कळावे लोभ असावा, आपलाच मित्र, सिद्धेश पाटील, Simple Lifestyle Vlogs

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

एक अनवट वाट तांदूळवाडी गडाची

भला मोठा तांदूळवाडी / लालठाणे धबधबा, तांदूळवाडी गाडाखाली, सफाळे

OFFBEAT Trekers ने TTMM तत्वावर आयोजित केलेली नाणेघाट ते भीमाशंकर ७० Km मधील पहिला टप्पा नाणेघाट ते आंबोली