*नाखिंद नेढे दर्शन मोहीम TTMM*

*🚩 सादर जय शिवराय 🚩*

नमस्कार मित्रांनो,

रविवार २७ नोव्हेंबर रोजी मोफत फिरस्तीची मोहीम आखली होती **

हा ट्रेक आम्ही TTMM आधारावर म्हणजे कमीत कमी खर्च आणि स्वतःचा खर्च स्वतः  करण्याच्या आधारावर केला. मोजकीच मंडळी होती कामत परिवार व त्यांची मैत्रीण विरार, मयूर घणसोली आणि संजीव नेरळ वरून आले होते. या सगळ्यांचे आभार कारण या गोड गुलाबी थंडीमध्ये पहाटे उठून येणं म्हणजे काय ते तुम्ही समजू शकता.

ही भटकंती करताना आम्ही बेडिस गावातून सकाळी ८ला सुरू केला आणि दुपारी १२.३० च्या दरम्यान पूर्ण झाली. एकूण १९३०० पावले आणि १४km ची भतकंती झाली.

ट्रेक करताना नाश्ता, जेवण, पाणी, trekking shoes, trekking pole, torch, first aid, electrol, first-aid, टोपी, गॉगल हे सगळे बाळगले होते.

बेडीस गावापर्यंत रिक्षा येते, ऐका फेरीचे १०० रुपये लागतात, त्याच रिक्षावाले भाऊंचा मोबाईल नंबर टिपून ठेवला आणि ट्रेक संपायच्या अर्धा तास आधी फोन केला मग काय बेडीस गावात उतरताच आमच्या स्वागताला समोर हजर होते, अशामुळे वेळ वाचतो आणि आयत्यावेळेस गावात रिक्षा मिळत नाही ह्याची नोंद घ्यावी.

बेडीस गावातून सकाळी गुलाबी वातावरणामध्ये चालत प्रवास सुरू झाला, गाव सुंदर, छोटेखानी, रिक्षा अगदी गावच्या शेवटच्या टोकाला सोडते, म्हणजे पुढचा टप्पा उरतो तो वाघिणीची वाडी, हा रस्ता दमछाक करणारा आहे, सुरवाती पासूनच अगदी ६० ते ७० अंश कोन आहे आणि तो शेवटपर्यंत तसाच राहतो. वाटेत भरपूर पक्षी  चिवचिवाट करत होते. ही वाट १० फुटाची आहे त्यामुळे भटकण्याची चिंता नाही. चढताना चांगलाच घाम फुटला होता. पुढच्या अर्ध्या तासात आम्ही पुढच्या मुक्कामाला पोहोचलो. वाघिणीची वाडी हे एक चांगले पठार सदृश जागा आहे.

गडावर जातानाच गावकऱ्यशी बोलणे केले त्यांचा सल्ला घेतला, पण वाघिणीच्या वाडी पुढे दाट जंगल असल्यामुळे रस्ता आणि वाट समजून येत नव्हती. गावात जेवणाची सोय नाही, जर तुम्ही नवखे आसल तर वाटाड्या मिळत असेल तर तो जरूर घ्या.

गावात एक शाळा ठळक पणे समोरच उभी आहे, शोधण्याची गरज पडत नाही. शाळा व दुकान यांच्या मधून रस्ता जातो तोच सरळ घ्यायचा. पुढे आंब्याची झाडे लागतात, प्रत्येक झाडा नंतर थोडे डाव्या बाजूला वळत जा. ही जागा शेताची असल्यामुळे भरपूर पायवाटा आहेत. पण तुम्हाला पुढील मोठी ३ आंब्याची झाडे हीच मोठी महत्वाची खूण आहे. पुढे डोंगराचा चढ चालू होतो तो ८०-९० अंशामध्ये आहे. फर भयंकर चढ आहे, करणं हा डोंगर फार ठिसूळ मातीने बनला आहे. जसा पाऊस पडतो तशी माती वाहून जाते. वरती जाताना तुम्ही जर बरोबर वाट घेतली तर ती थोडी सोपी आहे. पण जर भरकटला तर कठीण होऊन बसते. समोर डोंगरात एक घळ आहे, माथ्यावर एक भली मोठी खच आहे तिला बघून त्या मार्गाने प्रस्थान करावे.

शेवटी कसा बसा माथा गाठला, इथून जर धुक नसेल तर सगळे गड एका रांगेत दिसतात. आम्हाला धुक लागले फोटो पहीजे तेवढे चांगले आले नाहीत तरीपण निसर्गापुढे आपण काय बोलणार. त्यातच आनंद मानून नेढ्या कडे निघालो. वाटेत काही ट्रेकर मंडळी भेटली, थोडे बोलणे झाले ते कांदिवली मधून आले होते, त्यांनी मला ओळखले व बोलले तुम्हीच फॅमिली trekking करता ना, कानाल बरे वाटले कोणीतरी आपल्याला ओळखले. त्याच्या शी एफबी ची ओळख पण निघाली. पुढील ट्रेक कधी वेळ मिळाला तर एकत्र करू असे बोलणे झाले, त्यांना पेबला जायचे होते शूभेच्छा देऊन निरोप घेतला. पुढेची वाट फार अरुंद आहे, दोन्ही बाजूला दरी आणि आपण डोंगर माथ्यावरून जातो. इथे सांभाळून जावे. पुढे कातळ चालू होतो पण तो ही फार ठिसूळ आहे, भरपूर भेगा पडल्या आहेत, कधी कुठचा दगड खाली पडेल याचा भरवसा नाही. आता नेढ्यात पोहोचलो, हे माझे दुसरे नेढे दर्शन होते, मंद हवा होती. थोडा विसावा घेतला परत नेढ्याच्या वरती जायची तयारी केली, रस्ता फर बिकट आहे ९० अंशी सरळ खाली उतरून परत चढायचे आहे. कसे बसे एकदाचे डोंगर माथ्यावर पोहोचलो. चला परत एकदा न चुकता कमी वेळामध्ये मोहीम फत्ते झाली याचा आनंद झाला. परत खाली आलो थोडे जेवलो आणि परतीचा प्रवास चालू केला कारण आमचे २ मेंबर खाली गावात थांबले होते.

आम्ही १२.३० पर्यंत बेडीस गावात परतलो.

मला अपेक्षा आहे आपल्याला माझा अनुभव लेख स्वरुपात आवडला असेल. सोबत फोटो सुधा आहेत, पण थरार अनुभवायचा असेल तर नक्की खालील दिलेल्या YouTube लिंक ला क्लिक करून व्हिडिओ पाहा आणि आवडला तर लाल सबस्क्राइब बटन दाबा, आणि सोबत असलेल्या घंटेला क्लिक करून All हे बटन दाबा म्हणजे आमचे नियमित व्हिडिओ पाहण्यासाठी मिळतील ते ही काही किंमत न मोजता.

जर आपण आमच्या TTMM उपक्रमात सहभागी होऊ इच्छित तर मग खालील दिलेल्या फोन नंबर वर WhatsApp मेसेज करा. फोन करू नका तो DND वर आहे, कोणीही फोन उचलणार नाही ह्याची नोंद घ्यावी.

YouTube: https://youtu.be/SnwADB9DhK8

Facebook:
https://www.facebook.com/simplelifestylevlogs?mibextid=ZbWKwL

Instagram:
https://www.instagram.com/simplelifestyle.vlogs/

Whatsapp number: ९९६७१५२९३८

कळावे लोभ असावा, आपलाच मित्र, सिद्धेश पाटील Simple Lifestyle Vlogs

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

एक अनवट वाट तांदूळवाडी गडाची

भला मोठा तांदूळवाडी / लालठाणे धबधबा, तांदूळवाडी गाडाखाली, सफाळे

OFFBEAT Trekers ने TTMM तत्वावर आयोजित केलेली नाणेघाट ते भीमाशंकर ७० Km मधील पहिला टप्पा नाणेघाट ते आंबोली